सोनार समाज

बाली बेटांवरील पारंपरिक पद्धतीने काम करणारा सोनार (इ.स. १९००-१९४० सालांदरम्यानचे चित्र)


(इंग्लिश: Goldsmith, गोल्डस्मिथ) म्हणजे सोने व अन्य मौल्यवान धातूंच्या वस्तू तयार करणारा कारागीर सुवर्णकार होय. सोनार हा दागिने, सणा-समारंभांत वापरल्या जाणाऱ्या चीजवस्तू, भांडी इत्यादी जिनसा घडवतात. आज सोन्याचा व्यवसाय हा सोनार वर्गा पुरता मर्यादित नाही इतर सर्व समाजाचे लोक कारागिरी व सराफा करत आहेत.

पारंपारिक व्यवसायात हातोडी, एरण, पकड, फुंकणी, इ. हत्यारे व बागेश्वरी वापरली जात असत.

अत्यंत प्राचीन व सनातन असणारा हा समाज, विविध ग्रंथात, पुराणात याचा उल्लेख सापडतो. अनेक संत महात्मे या समाजात होऊन गेले. अत्यंत शांत प्रिय व कर्मनिष्ठ समाज म्हणून ओळख आहे. सोनार समाजात अनेक उप पोटशाखा आहेत उदा. दैवज्ञ, अहिर, लाड, वैश्य, पांचाळ (पाच गोत्रांचा) विश्वब्राह्मण, बंजारा, टाक, मारवाडी अस्या १२५ गोत्र व विविध पोटजाती आहेत. पुर्वी हा समाज एकच होता आज ही एकमेकांची गोत्र एकमेकांशी जुळतात. दैवज्ञातील गोत्रे पांचाळ, लाड, अहिर मध्ये सापडतात.

भटकंती करत राज दरबारी आश्रय मिळाला आणि चाली रिती, खान पान, भाषा, संस्कार, गोत्र, दैवत यात बदल झाला. त्यावरून वर्ण व्यवस्था निर्माण झाली. पांचाळ व दैवज्ञा मध्ये उपनयनादी सर्व संस्कार केले जातात पुर्वी हा समाज शाखाहारी होता. सोनार समाजातील आचार्य असून. लाड व आयर (अहिर) हे क्षत्रीय समाज संबोधले जातात. वैश्य व इतर व्यापारी मध्ये शाखा मोडतात. काळाप्रमाने लिंगायत, जैन आदि इतर धर्म स्वीकारल्या मुळे त्यांची नावे व संस्कार या मध्ये बराच फरक पडला.[ संदर्भ हवा ]

सोनार समाज हा मूळ हिंदू धर्म आहे. विश्वकर्मा पासून हा समाज उत्पन्न झाला. बागेश्वरी मुळ कालीका असल्यामुळे कालीका व विश्वकर्मा समाजाचे मुख्य दैवत असून. महादेव, खंडोबा, भैरोबा, विठ्ठल, बालाजी हे कुलस्वामी आणि तुळजाभवानी, रेणुका, योगेश्वरी, शिरसिंगी कालीका आदि कुलदेवता आहेत.[ संदर्भ हवा ]

सोनार समाजामधील एकूण पोटजाती संपादन

सोनार समाजातील पोटजाती [ संदर्भ हवा ]

१) पांचाळ (विश्वब्राह्मण) सोनार समाज

२) लाड सोनार समाज

३) दैवज्ञ सोनार समाज

४) वैश्य सोनार समाज

५) माळवी सोनार समाज

६) आहिर सोनार समाज

७) झाडी सोनार समाज

८) देशस्थ सोनार समाज

९) अझरे सोनार समाज

१०) देशी(मराठी) सोनार समाज

११) परदेशी सोनार समाज

१२) शिलावत सोनार समाज

१३) विश्वब्राह्मण सोनार समाज

१४) गढवी भटके सोनार समाज

१५) टाकसाळे सोनार समाज

१६) कन्नड़(कानडी) सोनार समाज

१७) कडु(दासीपुत्र) सोनार समाज

१८) सोनी सोनार समाज

१९) लिंगायत सोनार समाज

मध्यप्रदेशातील सोनार संपादन

ग्वारे, भटेल, मदबरिया, महिलबार, नागवंशी, शांडिल्य,छिबहा, नरबरिया, अखिलहा, जडिया, सड़िया, धेबला पितरिया, बंगरमौआ, पलिया, झंकखर, भड़ेले, कदीमी, नेगपुरिया, सन्तानपुरिया, देखालन्तिया, मुण्डहा, भुइगइयाँ, समुहिया, चिल्लिया, कटारिया, नौबस्तवाल, व शाहपुरिया, सुरजनवार, खजवाणिया, डसाणिया, मायछ, लावट , कड़ैल, दैवाल, ढल्ला, कुकरा, डांवर, मौसूण, जौड़ा, जवडा, माहर, रोडा, बुटण, तित्तवारि, भदलिया, भोमा, अग्रोयाआदि-आदि।


पांचाळ (विश्वब्राह्मण) समाजातील गोत्र आणि कुळे संपादन

 

१) महामुनी - सनातनस.

२) वेदपाठक - सुपर्णस्य.

३) दिक्षीत - सानकस्य.

४) धर्माधिकारी - प्रत्नस्य.

५) पंडीत - अहभुनस्य.

पांचाळ विश्व ब्राह्मणानं मध्ये वरील फक्त आणि फक्त ५ गोत्रे असतात म्हणून त्यांना पांचाळ असे म्हणाले जाते

विश्व ब्राह्मण समाजाचे सोलापूर स्तीथ कालिका देवी मंदिर (१९०५-१९१४) (मंदिरावर तसा उल्लेख सुद्धा आहे), या मंदिराचे विश्वस्थ मंडळी विश्व ब्राह्मण समाजाचे वेदपाठक, दीक्षित, धर्माधिकारी, पंडित व महामुनी आहेत >>>>>>>>>>>>>>>>

आहिर शाखेतील ३६ गोत्र आणि कुळे संपादन

1)कुळ - विसपुते (महाले) गोत्रऋषी – कौंडण्य कुलस्वामिनी - एकविरा (मांडवगड)

2)कुळ - दुसाने (शिंदे) गोत्रऋषी – विश्वामित्र कुलस्वामिनी - विंध्यवासिनी (चित्रगड)

3)कुळ - अहिरराव (इखनकर) गोत्रऋषी – विभांडिक कुलस्वामिनी - विंध्यवासिनी (दसाहुरी)

4)कुळ – खरोटे गोत्रऋषी – कात्यायन कुलस्वामिनी - विंध्यवासिनी (चितळगड)

5)कुळ – बिरारी गोत्रऋषी – विष्णूचरण कुलस्वामिनी - म्हाळसा (चितळगड)

6)कुळ - दंडगव्हाळ (पगार) गोत्रऋषी – दधिची कुलस्वामिनी - विंध्यवासिनी (चितळगड)

7)कुळ – देवरे गोत्रऋषी – जगदिश कुलस्वामिनी - एकविरा (दासावरी)

8)कुळ - मैंद (बहिरट) गोत्रऋषी – जमदग्नि कुलस्वामिनी - विंध्यवासिनी (माहुरगड)

9)कुळ – भामरे गोत्रऋषी – अत्री कुलस्वामिनी - विंध्यवासिनी (चित्रकोट)

10)कुळ – जगताप गोत्रऋषी – अगस्ती कुलस्वामिनी - म्हाळसा (चितळगड)

11)कुळ - निकुंभ / निकुंब गोत्रऋषी – अगस्ती कुलस्वामिनी - म्हाळसा (चितळगड)

12)कुळ – भालेराव गोत्रऋषी – मार्कंडेय कुलस्वामिनी - म्हाळसा (चितळगड)

13)कुळ - बाविसकर / बाविस्कर गोत्रऋषी – गर्ग कुलस्वामिनी - विंध्यवासिनी (चितळगड)

14)कुळ – मोरे गोत्रऋषी - कृष्णाजन / कृष्णाजल कुलस्वामिनी - म्हाळसा (दसावरी)

15)कुळ - वानखडे / वानखेडे गोत्रऋषी – भारद्वज कुलस्वामिनी - विंध्यवासिनी (चितळगड)

16)कुळ - थोरात (वझरकर) गोत्रऋषी - तालभ्य / तालक कुलस्वामिनी - म्हाळसा (काश्मीर)

17)कुळ – राजधर गोत्रऋषी – अगस्ती कुलस्वामिनी - एकविरा (चितळगड)

18)कुळ - सोनावणे / सोनवणी गोत्रऋषी - गवत्स / गवच्छ कुलस्वामिनी - म्हाळसा (महादंती)

19)कुळ – घोडके गोत्रऋषी – वत्स कुलस्वामिनी - एकविरा (मांडवगड)

20)कुळ – गिरे / सोनगिरे गोत्रऋषी – शृंगराज / भ्रांगी कुलस्वामिनी - विंध्यवासिनी (चित्रकोट)

21)कुळ – गायकवाड गोत्रऋषी – भारद्वाज कुलस्वामिनी - रेणुका (चितळगड)

22)कुळ – रणधीर गोत्रऋषी – वसिष्ट कुलस्वामिनी – एकविरा [रेणुका] (दसावरी)

23)कुळ – बागुल (कुवरसा) गोत्रऋषी – गौतम कुलस्वामिनी - धनाई पुनाई (चितळगड)

24)कुळ – वाघ गोत्रऋषी – मैत्रेय / मैत्रेण कुलस्वामिनी - विंध्यवासिनी (चित्रकोट)

25)कुळ – चव्हाण गोत्रऋषी – दालभ्य कुलस्वामिनी - आशापुरी (महादंती)

26)कुळ – जगदाळे गोत्रऋषी – मंदाझत कुलस्वामिनी - विंध्यवासिनी (मांडवगड)

27)कुळ – दाभाडे (सोळंखे) गोत्रऋषी – भृगु कुलस्वामिनी - आशापुरी (मांडवगड)

28)कुळ – पिंगळे / पिंगळकर गोत्रऋषी – तक्षक कुलस्वामिनी - नागाई (दसाहुरी)

29)कुळ – बोरसे / बोरसा गोत्रऋषी – माडण्य कुलस्वामिनी - म्हाळसा (चितळगड)

30)कुळ – जाधव (ढवळे) गोत्रऋषी – भार्गव कुलस्वामिनी - रेणुका (माहुरगड)

31)कुळ – यादव गोत्रऋषी – जमदग्नि कुलस्वामिनी - म्हाळसा (चित्रकोट)

32)कुळ – पवार गोत्रऋषी – पाराशर कुलस्वामिनी - विंध्यवासिनी (प्रयाग)

33)कुळ – विवलंदकार / विवलंदगिरे गोत्रऋषी – भृगराज कुलस्वामिनी - येडकाई (चितळगड)

34) कूळ – अधिकार / अधिकारी गोत्रऋषी – भारद्वाज कुलस्वामिनी - पेडकाई (माहुरगड)

35) कूळ – वडनेरे (सेंदासे) गोत्रऋषी – पौलस्ती कुलस्वामिनी - मनुबाई (मांडवगड)

36) कूळ – सोनारगण (अहिरराव) गोत्रऋषी – विभांडीक कुलस्वामिनी - विंध्यवासिनी (बद्रिकेश्वर)

लाड सोनार शाखेतील गोत्र आणि कुळे संपादन

१)वामन - नागरे, अंबेकर, निफाडकर

२)पराशर - मिसाळ, पावटेकर, अदापुरे

३)भारद्वाज - बोकन, काजळे, पोतदार, बुर्हाडे, मैड, शहाणे, मुंडलिक, माळवी, खेडकर, निफाडकर, माळवे, चिंतामणी, बेद्रे, डहाळे, बनसोड, मंडलिक, जार्वेकर, दहिवाळ, जामखेडकर, पल्लिवाळ- पवार

४)कश्यप - माणिकजडे, देडगांवकर, बोकण, कुलथे, बेद्रे, उदावंत, सोनार, मयूर, खडके, मिसाळ, शहरकर, महालकर

५)वशिष्ट - शहाणे, बहिवाळ, अंबिलवादे, उडणशीव, विंचुरकर, माळवे, लोळगे, कपिले, बुट्टे, पितळे, टेहरे, बागडे, बोराडे, उडंछु, कपोते, टाक, तुकडे, जवळेकर

६)अंग्रात - खोर, जोजारे

७)नावंत्री - सुर्यवंशी, मुंडके

८)मांडव्य - बोर्हाडे, बोंदरे, बोंद्रे, बोंदरवाळे

९)दधिंची - दहिवाळ, पोद्दार, उदावंत, बोरकर

१०)भार्गव - मैड, बेलापुरकर, दोंडेकर

११)गौतम - शहाणे, हुजवंत

१२)भ्रंग - शहाणे, अष्टेकर, कुलथे

१३)कौंडिल्य - चित्रे, डहाळे

१४)शांडिल्य - चव्हाण

१५)जमादग्णी - देवज्ञ

१६)गंगा - अडाणे, टेंबुर्णीकर, वरवडकर, अकलूजकर

१७)श्रंग - तळेगावकर, कुलथे

१८)कौशिक - पोतदार, तरटे, डहाळे

१९)मार्कंडेय - डहाळे

२०)अगस्ती - जोजारे

२१)अत्री -बनाईत शहाणे

२२)अंगीराज - माळवे

२३)मार्तंड - डहाळे

२४)अंगीरस - शहाणे, कळमकर, करमाळकर

२५)अंगारी - महाले, माळवे

सोनार समाजातील महाराष्ट्रातील संत संपादन

१) संत शिरोमणी नरहरी सोनार, पंढरपुर

२) संत विसोबा खेचर, बार्शी

३) संत दानलिंग स्वामी, उमाळवाड

४) शरणी दानम्मा, गुड्डापुर

५) संत देवाजी बुआ धर्माधिकारी, रामलिंग मुदगड

६) संत सोनार महाराज, मुंगशी

७) संत व्यंकोबा दिक्षीत, वैराग

८) संत प्रल्हादबुआ खोगरे, धारूर

९) संत मुक्ताईनाथ, नाथ मठ धारूर

१०) संत क्षेत्रोजी, आटपाडी

११) संत गोपाळ सोनार, वैजापूर

१२) संत तुका ब्रह्मानंद स्वामी, माहुली

१३) संत अंबरनाथ, पनोरी, ता. राधानगरी

१५) संत रंगनाथ महाराज सोनार, वैजापूर

१६) संत गोपाळ सोनार, वैजापूर

१७) संत अवधुत, वडवळ ता. मोहोळ

१८) संत अच्युत व सावित्री समाधी कोर्टी

१९) संत अनंत स्वामी, बार्शी

२०) शरण हविनळ कलैय्या सोलापुर

२१) शरण किन्नरी बोमय्या

बाह्य दुवे संपादन

 
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत