सुधीर जोशी

भारतीय अभिनेता

सुधीर जोशी (इ.स. १९४८ - १४ डिसेंबर, इ.स. २००५) हे विनोदी ढंगातील भूमिकांसाठी नावाजले जाणारे मराठी अभिनेते होते. यांनी मराठी चित्रपट, नाटके, तसेच दूरचित्रवाणी मालिकांतून अभिनय केला.

सुधीर जोशी
जन्म इ.स. १९४८
मृत्यू १४ डिसेंबर, इ.स. २००५
मुंबई, महाराष्ट्र
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय
भाषा मराठी

जीवन संपादन

सुधीर जोशी यांचा जन्म मुंबईत दादर येथे झाला. मुंबईच्या कीर्ती कॉलेजातून त्यांनी अर्थशास्त्रात बी.ए. पदवी मिळवली. मुंबईतल्या ब्लॅकी अँड सन्स या प्रकाशन संस्थेत विपणन अधिकारी [१] होते. कालांतराने नोकरी सोडून जोशी पूर्ण वेळ अभिनय क्षेत्राकडे वळले.

कारकीर्द संपादन

चित्रपट-कारकीर्द संपादन

वर्ष (इ.स.) चित्रपट भाषा भूमिका टिप्पणी
इ.स. १९८५ अनंतयात्रा हिंदी गोडबोले
इ.स. १९८७ गंमत जम्मत मराठी
प्रेमासाठी वाट्टेल ते मराठी
इ.स. १९८९ भुताचा भाऊ मराठी
बाळाचे बाप ब्रह्मचारी मराठी
आत्मविश्वास मराठी डॉ. बाळासाहेब सरपोतदार
इ.स. १९८८ अशी ही बनवाबनवी मराठी सरपोतदार
इ.स. १९९१ आयत्या घरात घरोबा मराठी
इ.स. १९९४ वझीर मराठी
इ.स. १९९५ लिमिटेड माणुसकी मराठी ॲड्व्होकेट भास्करराव
इ.स. २००६ मातीच्या चुली मराठी श्रीपाद दांडेकर

नाट्य-कारकीर्द संपादन

वर्ष (इ.स.) चित्रपट भाषा भूमिका टिप्पणी
टुर टुर मराठी
हसता हसता मराठी

दूरचित्रवाणी-कारकीर्द संपादन

वर्ष (इ.स.) कार्यक्रम भाषा भूमिका/सहभाग टिप्पणी
कॉमेडी डॉट कॉम मराठी

मृत्यू संपादन

नोव्हेंबर, इ.स. २००५ मध्ये "हसता हसता" या नाटकाच्या बँकॉक दौऱ्यादरम्यान जोशी यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यांच्यावर बँकॉक येथेच बायपास शस्त्रक्रिया करण्यात आली [२]. तेथून मुंबईत परतल्यानंतर १४ डिसेंबर, इ.स. २००५ रोजी दुपारी त्यांना पुन्हा हृदयविकाराचा झटका आला. शिवाजी पार्क येथील शुश्रूषा इस्पितळात नेले जात असताना त्यांचे निधन झाले [२].

या सुमारास "मातीच्या चुली" या जोशी यांचा अभिनय असलेल्या चित्रपटाचे चित्रीकरण चालू होते. सुधीर जोशी यांच्या निधनानंतर त्या भूमिकेचे उरलेले काम अभिनेते आनंद अभ्यंकर यांनी पुरे केले [३].

संदर्भ व नोंदी संपादन

  1. ^ विपणन अधिकारी (इंग्लिश: Marketing Executive, मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह).
  2. ^ a b "अभिनेते सुधीर जोशी यांचे निधन". Archived from the original on १३ ऑगस्ट २०१४. १५ ऑगस्ट, इ.स. २०१३ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  3. ^ "मराठी मनोरंजन क्षेत्रातील "अक्षय-आनंद' हरपला". Archived from the original on 2016-03-05. १५ ऑगस्ट, इ.स. २०१३ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)

बाह्य दुवे संपादन