सांवर किंवा काटेसांवर ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे.हा ज्येष्ठा नक्षत्राचा आराध्यवृक्ष आहे. हे एक मोठे झाड असूनही याचे खोडास काटे असतात. हे काटे जनावरांच्या पाठ घासण्यापासून वाचण्यासाठी असावेत. झाडाचे खोड बघून असे वाटते की यापासून चांगले लाकूड मिळू शकेल. परंतु, याचे लाकूड फारच नरम असते.

सांवर
सांवर/ काटेसावरीची पाने

वर्णन संपादन

सांवर बॉम्बॅक्स कुळातील इतर झाडांप्रमाणेच,कापसाचे झाड म्हणूनच ओळखले जाते. या झाडाचे खोड सरळ व उंच असते.५ पाकळ्यांची लाल फुले लागणारे हे झाड आहे. हिवाळ्यात याची पाने गळतात व वसंत ऋतूमध्ये नव्या पालवीपूर्वी याला आधी फुले येतात, व नंतर फळे. पिकलेल्या फळांमध्ये कापसासारखे तंतू असतात.

लागवड संपादन

हे झाड मलाया देशात लावले जाते. इंडोनेशिया, दक्षिणचीन, हाँगकाँगतैवान इत्यादी ठिकाणी हे आढळते. भारतात बंगालमध्ये आणि हिंदी भाषा भागात याला सेमल म्हणून ओळखतात. याच्या सुंदर दिसणाऱ्या फुलांमुळे हे अनेक ठिकाणी लावतात. हा वृक्ष ६० मीटर उंचीपर्यंतसुद्धा वाढू शकतो.

वापर संपादन

यातून निघणारा कापूस हा साध्या कापसास पर्याय म्हणून वापरता येतो. तो अत्यंत मऊ असतो. या झाडापासून काडेपेट्या तयार केल्या जातात. या झाडाचे संस्कृत नाव "शाल्मली" आहे. ऋग्वेदात, (ऋग्वेद-१०.८५.२०) यापासून रथ बनवीत असत असा उल्लेख आहे.

चित्रदालन संपादन

बाह्य दुवे संपादन

हे सुद्धा पहा संपादन