सांची हे भारतातल्या मध्य प्रदेश राज्यातील रायसेन जिल्ह्यातले एक छोटेसे खेडेगाव आहे. हे गाव भोपाळच्या ईशान्य दिशेला ४६ कि.मी. अंतरावर वसलेले आहे. तर बेसनगर आणि विदिशापासून सांची हे अवघे १० किमी अंतरावर आहे. इ.स.पू. ३ ऱ्या शतकापासून पुढे १२ व्या शतकापर्यंत उभारली गेलेली अनेक बौद्ध स्मारके - स्तूप सांची येथे आहेत आणि बौद्ध तीर्थक्षेत्रांपैकी हे एक महत्त्वाचे स्थान मानले जाते. येथील स्तूपाच्या बाहेर तोरणे उभारलेली आहेत आणि त्यातील प्रत्येक तोरण म्हणजे प्रेम, शांती, विश्वासधैर्य यांचे प्रतीक आहे.

  ?सांची

मध्य प्रदेश • भारत
—  गाव  —
Map

२३° २८′ ५०.५२″ N, ७७° ४४′ १०.६८″ E

प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
लोकसंख्या ६,७८५ (२००१)
भाषा हिंदी
सांची गाव – सांची टेकडी

सांची येथील पवित्र स्तूप महान सम्राट अशोक यांनी इ.स.पू. तिसऱ्या शतकात सर्वप्रथम उभारला होता.

हे सुद्धा पहा संपादन

संदर्भ आणि नोंदी संपादन

बाह्य दुवे संपादन