संयुक्त राष्ट्रे आर्थिक व सामाजिक परिषद

संयुक्त राष्ट्रे आर्थिक व सामाजिक परिषद (इंग्लिश: United Nations Economic and Social Council) हे संयुक्त राष्ट्रसंघाच्या प्रमुख ६ अंगांपैकी एक आहे. ही परिषद संयुक्त राष्टांच्या १४ महत्त्वाच्या समित्यांच्या आर्थिक व इतर कामकाजांचे सुचालन करते. ५४ सदस्य असलेल्या ह्या परिषदेची सभा दरवर्षी जुलै महिन्यात चार आठवडे चालते.


संयुक्त राष्ट्रे आर्थिक व सामाजिक परिषद
आर्थिक व सामाजिक परिषदेचे भवन
प्रकार मुख्य अंग
स्थिती कार्यरत
स्थापना इ.स. १९४५
मुख्यालय न्यू यॉर्क शहर
संकेतस्थळ www.un.org/ecosoc

जगातील आर्थिक समस्या व धोरणांवर चर्चा करण्यासाठी ही परिषद हा एक प्रमुख मंच आहे. १९९८ सालापासून ह्या परिषदेमार्फत अनेक देशांचे अर्थमंत्री, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी, जागतिक बँक ह्यांदरम्यान संवाद घडवून आणला जातो. सध्याच्या घडीला स्लोव्हाकिया देशाचे राजदूत मिलोस कोतेरेक हे आर्थिक व सामाजिक परिषदेचे प्रमुख आहेत.

सदस्य संपादन

आर्थिक व सामाजिक परिषदेमधील ५४ सदस्य देश आमसभेतून निवडले जातात.

आफ्रिका (१४) आशिया (११) पूर्व युरोप (६) लॅटिन अमेरिकाकॅरिबियन (१०) पश्चिम युरोप व इतर (१३)
  कामेरून   बांगलादेश   एस्टोनिया   आर्जेन्टिना   ऑस्ट्रेलिया
  कोमोरोस   चीन   मोल्दोव्हा   बहामास   बेल्जियम
  कोत द'ईवोआर   भारत   पोलंड   ब्राझील   कॅनडा
  इजिप्त   इराक   रशिया   चिली   फिनलंड
  गॅबन   जपान   स्लोव्हाकिया   ग्वातेमाला   फ्रान्स
  घाना   मंगोलिया   युक्रेन   पेरू   जर्मनी
  गिनी-बिसाउ   पाकिस्तान   सेंट किट्स आणि नेव्हिस   इटली
  मॉरिशस   फिलिपिन्स   सेंट लुसिया   लिश्टनस्टाइन
  मलावी   कतार   उरुग्वे   माल्टा
  मोरोक्को   दक्षिण कोरिया   व्हेनेझुएला   नॉर्वे
  नामिबिया   सौदी अरेबिया   तुर्कस्तान
  रवांडा   युनायटेड किंग्डम
  सेनेगाल   अमेरिका
  झांबिया

विशेष संस्था संपादन

संयुक्त राष्ट्रांच्या खालील विशेष संस्था आर्थिक व सामाजिक परिषदेमार्फत चालवल्या जातात.

बाह्य दुवे संपादन

  • "संयुक्त राष्ट्रे आर्थिक व सामाजिक परिषद - अधिकृत संकेतस्थळ" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)