जनचित्ताचे रंजन कणाऱ्या स्वर आणि वर्ण यांच्या व्यवस्थेला हिंदुस्तानी शास्त्रीय संगीतात राग असे म्हणतात.

स्वरांचा सुंदर प्रभाव पडतो. शास्त्रीय गायनात अथवा कोणत्याही प्रकारच्या गायनात सुस्वरता, स्वरबद्धता, आरोह, अवरोह, तालबद्धता, नजाकत[मराठी शब्द सुचवा] व रंगत आणावयासाठी करण्यात आलेल्या विशिष्ट सांगीतिक रचनांना संगीतातील राग असे म्हणतात.[ संदर्भ हवा ]

प्रस्तावना संपादन

रञ्जयति इति राग:| जो श्रोत्यांच्या मनाचे रंजन करतो तो राग होय. राग हे थाटातून उत्पन्न झाले आहेत. प्रत्येक थाटाच्या वैशिष्ट्यानुसार त्या त्या रागाची मांडणी केली जाते. जीवन म्हणजे एक संगीत आहे .

रागगायनाचे समयचक्र संपादन

भारतीय शास्त्रीय संगीताचा पाया समयचक्रावर आधारित आहे. विशिष्ट राग गाण्याची एक ठरावीक वेळ सांगितली गेली आहे. राग गायनासाठी ८ प्रहर आहेत. पहाटे, दिवसाच्या प्रथम प्रहरी, दुसऱ्या प्रहरी, दुपारी, रात्रीच्या पहिल्या, दुसऱ्या प्रहरी गावयाचे राग आणि त्यांच्या विशिष्ट वेळा ठरलेल्या आहेत. संधिप्रकाशात गाण्याचे रागही आहेत. प्रातःकालीन आणि सायंकालीन संधिप्रकाश राग वैशिष्ट्यपूर्ण आहेत.

रागाचे स्वरूप संपादन

प्रत्येक रागाचे स्वरूप भिन्न असते. रागातील स्वर, त्यातील शुद्ध, कोमल स्वर, त्याचे वादी-संवादी, आरोह-अवरोह, पकड आणि विस्ताराची पद्धत या सर्व गोष्टी प्रत्येक रागासाठी वेगवेगळ्या असतात.

रागात वादी स्वर हा राजाप्रमाणे, संंवादी हा मंंत्र्याप्रमाणे, विवादी स्वर हा शत्रूप्रमाणे तर अनुवादी स्वर हा सेवकाप्रमाणे असतो असे संंगीतशास्त्र मानते.

हिंदुस्तानी शास्त्रीय संगीतातील विविध रागांची नावे संपादन

हिंदुस्तानी शास्त्रीय संगीतावरील हिंदी-मराठी पुस्तके संपादन

  • मधुर स्वरलिपि संग्रह भाग १ ते ३ (हिंदी; लेखक हरिश्चंद्र श्रीवास्तव, २०१४)
  • संगीत विशारद (हिंदी; लेखक वसंत; संपादक डाॅ. लक्ष्मीनारायण गर्ग, १९९४)
  • संगीत शास्त्र पराग (गॊविंदराव राजुरकर)
  • संगीत-सरिता : राग कसे ओळखावेत? (लेखक डाॅ. विठ्ठल श्री ठाकुर २०१६). १२३ राग आणि त्यावर आधारित २६०० हिंदी/मराठी गाणी)

हे सुद्धा पहा संपादन