श्रीयंत्र किंवा श्री चक्र (इंग्रजी: Shri Yantra) श्रीविद्यामध्ये वापरले जाणारे एक साधन आहे.त्याला ‘श्रीयंत्र’, ‘नवचक्र’ आणि ‘महामेरु’ असेही म्हणतात. सर्व यंत्रामधील ही शिरोमणी आहे [१]आणि त्याला 'यंत्रराज' असे म्हणतात.एक भूमितीय आकृति आहे.या यंत्राची अधिष्ठात्री देवी त्रिपुरसुंदरी(षोडशी) जी वैदिक श्रीदेवी महालक्ष्मी आहेत. श्रीयंत्राची स्थापना आणि पूजा केल्याने श्रीलक्ष्मी व संपत्ती, ऐश्वर्याची प्रत्येक सिद्धि प्राप्ती होते.[२]

श्रीयंत्र
श्रीयंत्राची द्विमितीय संरचना

आदिशंकराचार्य व पुष्पदन्त [३]यांनी रचलेल्या “सौदर्यं लहरी” नावाचा या संस्कृत भाषेतील ग्रंथात “श्री यंत्र” उपासनेविषयी सांगितले आहे .

हिंदू व्रतवैकल्यांमध्ये श्रीलक्ष्मी पूजनातील एक आकृती आहे. हा एक तांत्रिक पूजेचा किंवा कर्मकांडाचा भाग आहे. हे यंत्र कागदावर द्विमितीय आकृती स्वरूपात किंवा सोने किंवा पंचधातू यांपासून त्रिमितीय स्वरूपात तयार केले जाते. याचे विशिष्ट प्रकारचे निश्चित असे मोजमाप असते. भारतातील अनेक मंदिरांत प्राचीन काळापासून श्रीयंत्र स्थापित केलेले दिसून येते.

श्री यंत्राच्या मध्यभागी एक बिंदु असून त्याच्याभोवती चारही बाजूंनी एकातएक गुंतलेले नऊ त्रिकोण असतात. हे नऊ त्रिकोण नऊ शक्तीचे प्रतीक असल्याचे सांगितले जाते. या नऊ त्रिकोणांच्या अंतरभाजनाने एकूण त्रेचाळीस त्रिकोण तयार होतात. या आकृतीभोवती आठ कमळांच्या दलांचे एक वलय असते. त्याभोवती दुसरे सोळा कमळाच्या पाकळ्यांचे अजून एक वलय असते. यांच्या चारी बाजूंभोवती प्रत्येकी तीन वर्तुळाकार पायऱ्या असतात. आणि त्यांच्याही खाली विशिष्ट आकारमानाच्या तीन चौकोनी पायऱ्या असतात. असे मानले जाते की या सर्व विविध ठिकाणी देवीची एकूण साठ रूपे विराजमान आहेत.

श्री यंत्र असलेले काही मंदिरे[२] संपादन

  • कोल्हापूर महाराष्ट्र येथिल महालक्ष्मी मंदिरात आदि शंकराचार्य यांनी स्थापन केलेले गंडकी शिलेवर उत्कीर्णित श्रीयंत्र आहे. मंदिराचा आकार ही मेरुपृष्ठ श्रीयंत्राप्रमाणे आहे

श्री कल्याणिका डोळ आश्रमात १६०० किलोग्रॅमपेक्षा जास्त वजनाचे जगातील सर्वात मोठे श्रीयंत्र आहे. हे उत्तर भारतातील उत्तराखंडमधील अलमोडा जिल्ह्यातील लमगड़ा भागात आहे.[४]

संदर्भ यादी संपादन

  1. ^ a b "Shri Yantra". Wikipedia (इंग्रजी भाषेत). 2020-01-12.
  2. ^ a b "श्री चक्र". विकिपीडिया (हिंदी भाषेत). 2020-01-05.
  3. ^ "Saundarya Lahari". Wikipedia (इंग्रजी भाषेत). 2019-10-16.
  4. ^ Team, UT Web. "अल्मोड़ा के डोल आश्रम में स्थापित दुनिया का सबसे बड़ा श्री यंत्रउत्तरांचल टुडे" (इंग्रजी भाषेत). Archived from the original on 2020-01-14. 2020-01-14 रोजी पाहिले.

बाह्य दुवा संपादन