संगमेश्वरच्याच जवळ १२ किलोमीटरवर शृंगारपूर या नावाचं गाव आहे.शृंगारपूर हे येसूबाईंचे माहेर. त्या प्रदेशाच्या कारभाराची जबाबदारी छत्रपतींनी संभाजीराजांकडे सोपविली. संगमेश्वराच्याच जवळ १२ किलोमीटरवर शृंगारपूर या नावाचं गाव आहे. हे गाव महाराजांनी जिंकलं. जिंकण्यासाठी युद्ध करायची वेळच आली नाही. तेथील शाही जहागीरदार महाराजांच्या दहशतीने पळूनच गेला. त्यामुळे शृंगारपूर बिनविरोध महाराजांना मिळाले.तो जहागीरदार म्हणजे येसुबाई महाराणी यांचे आजोबा सूर्यराव सुर्वे. त्यांच्या जहागिरीत दाभोळ आणि संगमेश्वर ही मोठी बंदरे होती. सुमारे जवळपास 100 मोठी जहाजे सूर्यरावांनी बांधून घेतली होती.श्रीशंभूराजांनी निर्माण केलेले येथील घोडदळ शृंगारपूरी अश्वदौलत म्हणून प्रसिद्ध होते

प्रचितगड संपादन

गावाच्या पूवेर्ला सहा किलोमीटरवर एक प्रचंड डोंगरी किल्ला होता. त्याचं नाव प्रचितगड. गडावर आदिलशाही सत्ता होती. तानाजी मालुसऱ्यांनी या गडावर हल्ला चढवून एकाच छाप्यात किल्ला घेतला.प्रचीतगडची ही तानाजीची मोहिम इ. १६६१ च्या पावसाळ्याच्या पूर्वी झाली. महाराजपालखीतून प्रचीतगडावर निघाले.

दरवाज्यातून आत प्रवेशले. महाराजांच्या अंगावरचा शेला फडफडत होता. नकळत शेल्याचा फलकावा पालखीबाहेर लोंबत होता. तो वाऱ्याने उडत होता. मिरवणूक चालली होती. एवढ्यात गचकन कुणीतरी मागे खेचावं असा महाराजांच्या पालखीला जरा हिसका बसला. शेला खेचला गेला. ते पाहू लागले. भोई थांबले. काय झालं तरी काय ? पाहतात तो महाराजांच्या शेल्याचं पालखीबाहेर पडलेलं टोक एका बोरीच्या झुडपाला वाऱ्याने अटकलं गेलं होतं. बोरीला काटे असतात. शेला अटकला. महाराज बघत होते. त्यांना गंमत वाटली.

मावळे काट्यात अटकलेला शेला अलगद काढू लागले. शेला निघाला. पण महाराज म्हणाले , ' या बोरीनं मजला थांबविले. येथे खणा ' मावळ्यांनी पहारी , फावडी आणली आणि त्यांनी बोरीखालची जमीन खणावयास सुरुवात केली. केवळ गंमत म्हणून महाराज बोलले. . खणताखणता पहारी लगेच अडखळल्या. माती दूर केली. सोन्यानाण्यांनी भरलेला हंडा! हा केवळ योगायोग होता. महाराजांना भूमीगत धन मिळाले. हे सर्व धन स्वराज्याच्या खजिन्यात जमा झाले.

महाराजांना एकूण तीन ठिकाणी असे भूमीगत धन मिळाले. तोरणगडावर , कल्याणच्या दुर्गाडी किल्ल्यावर आणि हे असं प्रचीतगडावर.

पूवीर् महाराजांच्या आजोबांना , म्हणजे मालोजीराव भोसल्यांना वेरूळच्या त्यांच्या शेतातच भूमीगत धन मिळाले. ते मालोजींनी श्रीधृष्णेश्वराचे मंदिर , शिखर शिंगणापूरचा तलाव , एक यात्रेकरूंच्यासाठी धर्मशाळेसारखी म्हणा किंवा मठासारखी म्हणा इमारत अन् अशाच लोकोपयोगी कार्यासाठी खर्च केलं.[१]

संदर्भ संपादन

  1. ^ महाराष्ट्र टाईम्स पान जसे ९ नोव्हे.०९ सायं सात वाजता दिसले