शहादा विधानसभा मतदारसंघ

महाराष्ट्रातील एक विधानसभा मतदारसंघ

शहादा विधानसभा मतदारसंघ - २ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार, केलेल्या मतदारसंघाच्या रचणेनुसार, शहादा मतदारसंघात नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा तालुका आणि शहादा तालुक्यातील म्हसावद, ब्राह्मणपुरी, असलोद, शहादा ही महसूल मंडळे आणि शहादा नगरपालिका यांचा समावेश होतो. शहादा हा विधानसभा मतदारसंघ नंदुरबार लोकसभा मतदारसंघात मोडतो आणि हा मतदारसंघ अनुसूचित जमातीच्या (ST) उमेदवारांसाठी राखीव आहे.[१]

भारतीय जनता पक्षाचे राजेश पाडवी हे शहादा विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[२]

शहादा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार संपादन

वर्ष आमदार[३][४] पक्ष
२०१९ राजेश पाडवी भारतीय जनता पक्ष
२०१४ उदेसिंग कोचरु पाडवी
२००९ पद्माकर विजयसिंग वळवी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
२००४ जयकुमार जितेंद्रसिंह रावल भारतीय जनता पक्ष
१९९९ डॉ. हेमंत भास्कर देशमुख राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
१९९५ अण्णासाहेब पी.के. पाटील भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
१९९० डॉ. हेमंत भास्कर देशमुख
१९८५ अण्णासाहेब पी.के. पाटील जनता पक्ष
१९८० अण्णासाहेब पी.के. पाटील
१९७८ जयदेवसिंह जयसिंह रावळ भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
१९७२ चानुरसिंग डी. भंडारी
१९६७ एस.बी. पवार

निकाल संपादन

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९ संपादन

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९:शहादा
पक्ष उमेदवार मते % ±%
भाजप राजेश पाडवी ९४,९३१ ०.४५
काँग्रेस पद्माकर विजयसिंग वळवी ८६,९४० ०.४१
अपक्ष इंजि.जेलसिंग बिजला पावरा २१,०१३ ०.१०
माकप माझी जयसिंग देवचंद ४,०६० ०.०२
नोटा नोटा ३,४४९ ०.०२
बहुमत ७,९९१ ०.०४
मतदान २,१०,३९३ ०.६६
एकूण नोंदणीकृत मतदार ३,२०,५५५

२०१४ महाराष्ट्र विधानसभा निवडणुका संपादन

विजयी संपादन

संदर्भ संपादन

  1. ^ "Wayback Machine" (PDF). web.archive.org. 2009-02-19. Archived from the original on 2009-02-19. 2022-10-28 रोजी पाहिले.CS1 maint: BOT: original-url status unknown (link)
  2. ^ "१४ वी महाराष्ट्र विधानसभा २०१९ सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय" (PDF).
  3. ^ "STATISTICAL REPORTS OF GENERAL ELECTION TO STATE LEGISLATIVE ASSEMBLY (VIDHANSABHA)".
  4. ^ "Shahada (Maharashtra) Assembly Constituency Elections". Archived from the original on 2022-11-08. 2022-11-08 रोजी पाहिले.

बाह्य दुवे संपादन