वॉल स्ट्रीट जर्नल

व्यापार आणि वाणिज्य विषयक वृत्तपत्र

वॉल स्ट्रीट जर्नल तथा डब्ल्यूएसजे हे अमेरिकेच्या न्यू यॉर्क शहरातून तसेच आशिया आणि युरोपमधून प्रसिद्ध होणारे व्यापार आणि वाणिज्य विषयक वृत्तपत्र आहे. हे वृत्तपत्र आठवड्यातून सहा दिवस प्रकाशित होते. याची पहिली आवृत्ती ८ जुलै, १८८९ रोजी छापली गेली.

न्यूझ कॉर्प कंपनीच्या डाऊ जोन्स अँड कंपनी या उपकंपनीद्वारे हे वृत्तपत्र छापील तसेच ऑनलाइन स्वरूपात प्रकाशित होते. याचे १२ लाख ७० हजार ऑनलाइन गिऱ्हाइकांसह एकूण २२ लाख २८ हजार गिऱ्हाइक आहेत. यापरत्वे हे वृत्तपत्र अमेरिकेतील सर्वाधिक खपाचे वृत्तपत्र आहे.

वॉल स्ट्रीट जर्नलला २०१७पर्यंत ४० पुलित्झर पारितोषिके मिळाली आहेत.