विजय चव्हाण

मराठी रंगभूमीवरचे एक कलाकार

विजय चव्हाण हे मराठी रंगभूमीवरचे कलाकार होते. त्यांनी अनेक नाटकांत आणि चित्रपटांत कामे केलेली असून, प्रल्हाद केशव अत्रे यांनी लिहिलेल्या मोरूची मावशी या नाटकातील मावशीच्या स्त्री-भूमिकेसाठी ते विशेष ओळखले जातात. या नाटकाचे जवळ जवळ दोन हजार प्रयोग झाले. त्यानंतर मालिका आणि चित्रपटात बिझी असलेल्या या कलावंताने एकाच नाटकात चौदा भूमिका करण्याचाही विक्रम केला.[ संदर्भ हवा ][१]

विजय चव्हाण
जन्म 2मे१९५५
मृत्यू 24ऑगस्ट२०१८
फोर्टीस हॉस्पिटल मुलुंड, मुंबई
इतर नावे विजू मामा
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र मराठी चित्रपट, मराठी रंगभूमी, मराठी दूरचित्रवाणी
भाषा मराठी, हिंदी
प्रमुख नाटके मोरूची मावशी
अपत्ये वरद चव्हाण

शिक्षण संपादन

विजय चव्हाण यांचे बालपण करीरोडच्या गिरणगाव भागात गेले. शालेय शिक्षण दादरच्या इंग्लिश स्कूलमध्ये झाल्यावर त्यांनी रुपारेल कॉलेजमधून बी.ए.ची पदवी घेतली.[ संदर्भ हवा ]

अभिनय क्षेत्रात प्रवेश संपादन

कॉलेजच्या नाटकात काम करणारा एक कलाकार आजारी पडला म्हणून ऐनवेळी विजय चव्हाण यांना नाटकात काम करायला सांगितले गेलेादस आणि एक-दोन दिवसांच्या तालमीनंतर त्यांनी रंगमंचावर अभिनय केला. नाटक यशस्वी झाले आणि विजय चव्हाण यांना आपण रंगमंचावर काम करू शकतो याची खात्री पटली. अर्थात करियरसाठी हाच प्रांत निवडायचा असे त्यांनी काही ठरवले नव्हते. कारण हे काम त्यांनी कॉलेजमधील नाटकात केवळ गरज म्हणून केले होते. कॉलेजचे सुवर्णमहोत्सवी वर्ष म्हणून हे नाटक बसविले होते. त्यामुळे विजय चव्हाण यांनी कलाक्षेत्र गंभीरपणे घेतले नव्हते. मात्र त्यानंतर पुन्हा एकदा कॉलेजच्यावतीने एका यूथ फेस्टिवलमध्ये विजय चव्हाण यांनी एकांकिकेत भाग घेतला आणि बक्षीसही मिळवले. त्यानंतर मात्र त्यांनी या क्षेत्राकडे गंभीरपणे बघण्याचा निर्णय घेतला.[ संदर्भ हवा ]

अभिनेते विजय कदम हे विजय चव्हाण यांचे वर्गमित्र होते. विजय कदम, चव्हाण आणि अन्य एक मित्र या तिघांनी मिळून "रंगतरंग' नावाची नाट्यसंस्था सुरू केली. त्यानंतर त्यांची लक्ष्मीकांत बेर्डेशी ओळख झाली. त्या वेळी पुरुषोत्तम बेर्डे "टुरटूर' नाटक बसवत होते. लक्ष्याने त्यांना विजय चव्हाण यांचे नाव सुचवले. त्यामुळे त्यांचा टुरटूरमध्ये प्रवेश झाला. या नाटकातूनच त्यांना "हयवदन' हे नाटक मिळाले. या नाटकाचे भारतात आणि भारताबाहेर प्रयोग झाले. हे नाटक बघूनच त्यांना सुधीर भट यांच्याकडून "मोरूची मावशी'साठी निमंत्रण आले. त्या वेळी चव्हाण मफतलाल कंपनीत नोकरी करत होते. ही नोकरी सांभाळून त्यांनी या नाटकाचे प्रयोग सुरू केले. या नाटकाने मराठी रंगभूमीवर इतिहास घडवला. एका दिवशी दोन-तीन प्रयोग केले गेले. स्त्री वेशातील अर्थात मावशीची भूमिका करून विजय चव्हाण यांनी विक्रम केला.[ संदर्भ हवा ]

जीवन संपादन

चव्हाण यांचे शुक्रवार दिनांक २४ अॉगष्ट २०१८ रोजी दीर्घ आजाराने आजाराने निधन झाले.[ संदर्भ हवा ] त्यांना फुफ्फुसाचा आजार होता. मुंबईतल्या मुलुंडमधील फोर्टिस रुग्णालयात वयाच्या ६३व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ==उल्लेखनीय== त्यांची भरत जाधव,रविंद्र बेर्डे, विजय पाटकर संजय नार्वेकर आणि अशोक सराफांबरोबर जोडी प्रसिद्ध होती. त्यांचं डोळा मारतेलं विनोदी दृश्य प्रसिद्ध आहे.

कार्य संपादन

नाटके संपादन

  • कशात काय लफड्यात पाय
  • कशी मी राहू तशीच
  • कार्टी प्रेमात पडली
  • खोली नं. ५
  • झिलग्यांची खोली
  • जाऊ बाई हळू
  • टुरटूर
  • देखणी बायको दुसऱ्याची
  • बाबांची गर्लफ्रेंड
  • मोरूची मावशी
  • हयवदन
  • श्रीमंत दामोदरपंत

चित्रपट संपादन

  • अशी असावी सासू
  • आली लहर केला कहर
  • घोळात घोळ
  • झपाटलेला
  • धुमाकूळ
  • जत्रा

दूरचित्रवाणी मालिका संपादन

  • असे पाहुणे येती
  • माहेरची साडी
  • येऊ का घरात
  • रानफूल
  • लाइफ मेंबर

पुरस्कार संपादन

  • 'अशी असावी सासू'मधील भूमिकेसाठी महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार आणि स्क्रीन पुरस्कार.
  • संस्कृती कलादर्पणचा जीवनगौरव पुरस्कार (२०१७)
  • चित्रपती व्ही.शांताराम जीवनगौरव पुरस्कार(2018)

संदर्भ संपादन

  1. ^ ठाकूर, दिलीप. विवेक आधुनिक महाराष्ट्राची जडणघडण शिल्पकार चरित्रकोश. मुंबई: साप्ताहिक विवेक(हिंदुस्थान प्रकाशन संस्था).

बाह्य दुवे संपादन