विकिपीडिया:चावडी/वादनिवारण/जुनी चर्चा १

(सर्व चावड्यातील बदल | मुख्य चावडीतील अलीकडील बदल | सर्व चावड्या एकत्र पहा)
चावडी विभागवार:

चर्चा
(विपी इतर चर्चा)

इतर विभागात समाविष्ट न होणारे चर्चा विषय नवी चर्चा जोडा | वाचा

वादनिवारण
वादांवर उहापोह करण्यासाठी नवीन विषय जोडा | वाचा

साहाय्य | मदतकेंद्र
नवागतांसाठी मदतकेंद्रनवाप्रश्न जोडा | वाचा

दूतावास
(Embassy)

नवी चर्चा जोडा
(Start new discussion)

प्रचालकांना निवेदन
प्रचालकांना निवेदन देण्यासाठीनिवेदन जोडा | वाचा


प्रचालकांचे मूल्यांकन
प्रचालकांचे कार्य आणि कृतींबद्दल उहापोह करण्यासाठीनवीन विषय जोडा | वाचा


तांत्रिक
तांत्रिक मुद्दयांवर चर्चा.
विपी आज्ञावलीच्या त्रुटी अहवाला साठी बगझीला वापरा.
नवीचर्चा जोडा | वाचा

ध्येय आणि धोरणे
सद्द आणि प्रस्तावित ध्येय आणि धोरणे, नीती-संकेत इत्यादींबाबत चर्चेसाठी नवीचर्चा जोडा | वाचा

प्रगती
मराठी विकिपीडियाच्या प्रगती बाबत चर्चा
नवीचर्चा जोडा | वाचा


सोशल मीडिया
मराठी विकिपीडियाचे सोशल मीडिया बाबत नवीन विषय जोडा | वाचा
चावडी (सुचालन)

स्थापना
___

स्वागत आणि साहाय्य चमू ,आलेले सदस्य,विकिभेट,कळपट हवा,सुलभीकरण,लेख/मजकुराची दखल पात्रता? चर्चा









राम राम घ्यावा आमचा संपादन

लिखाण बंद करत आहे असे जाहीर करत आहे.

कोणतीही चर्चा न करता केवळ हुकुम शाही चालू असल्याप्रमाणे लेख वगळले आहेत.

आणि मला जमल्यास केलेले सर्व लिखाण पुसून टाकण्यास मदत करावी.

संकल्प आपण कोणाच्या विचाराने लेख वगळले याची पुष्टी द्याल तर उपकार होतील माझ्यावर आणि मराठी विकी वर

नातू साहेब ! तुम्ही सांगितल्या प्रमाणे माहिती भरणे चालू केले होते आणि (अयोग्य शीर्षक: मजकूर होता) असे कारण देण्यात आले आहे आणि हे समजण्या पलीकडे आहे सागर:मराठी सेवक १७:३२, ८ ऑक्टोबर २०११ (UTC)

सागर, मला वाटते वगळलेल्या लेखात लेखाचे नाव सोडून काहिही मजकूर नाहि. असे लेख महिनोन महिने ठेवण्यात काही अर्थ नाही. अनेक लेखात पान काढा विनंत्याही लावलेल्या होत्या. बर्याच लेखांना speedy deletion request होत्या असे दिसते. मग हे लेख काढण्याअगोदर या सगळ्या विनंत्यांचा आपल्यासारख्या (म्हणजे विकिपिडीयाचे सर्व सदस्य) सदस्यांनी विचार करून ही पाने वाढवायला किंवा त्यात भर घालायला पाहिजे होती. आपल्या रागयुक्त संदेशातून असे जाणवते आहे की आपण ही पाने वाढवायच्या विचारात होता पण अजूनही काही बिघडलेले नाही या नावांनीच तुम्ही परत पाने तयार करू शकता फक्त पान मोकळे नको काय मजकूर पानाला जोडायचा आहे ते मनाशी आधी पक्के ठरवूनच पान बनवले म्हणजे ते मोकळे राहणार नाही व येथे फेरफटका मारणार्यांना निराशा होणार नाही (जी निराशा वगळलेल्या लेखांबाबतीत आजवर अनेकांची झाली असेल.) आपल्या योगदानाची विकिपिडीयाला गरज आहे. विचार कराल अशी अपेक्षा. संतोष दहिवळ १७:५३, ८ ऑक्टोबर २०११ (UTC)
>>> महिनोन महिने ठेवण्यात काही अर्थ नाही... संतोष महाराज, मी साचा लावून लेख भरण्यास चालू केले होते आणि हे सगळे मी आताच तयार केलेले होते
>>> लेख काढण्याअगोदर या सगळ्या विनंत्यांचा आपल्यासारख्या (म्हणजे विकिपिडीयाचे सर्व सदस्य) सदस्यांनी विचार करून ही पाने वाढवायला...कुठे केली आहे जरा दाखवून द्यावेत
>>> वगळलेल्या लेखांबाबतीत आजवर अनेकांची झाली असेल... हि दुसरी वेळ आहे... आणि मी हवे असल्यास भरपूर लेखांचे पाने दाखवून देवू शकतो जे कित्येक महिने रिकामेच पडले आहेत आणि काही तासा पूर्वीचे लेख कसे काय वगळले ???
>>> नावांनीच तुम्ही परत पाने तयार करू शकता.........माझ्या कडे २४ तासांचे घड्याळ आहे. परत परत तेच करत बसायला सवड नाही आहे
>>>विचार कराल अशी अपेक्षा............ आणि विचार करा असे मला सांगण्यापेक्षा जुन्या जाणत्या सदस्यांना जरा धीराने काम करण्याची गरज आहे. हा मुक्त ध्यान कोश आहे. त्यांच्या मार्गदर्शनाची गरज आहे.नुसत्या उंटावरून शेळ्या हाकाण्याने काही साध्य होणार नाही आहे

सागर:मराठी सेवक १८:१३, ८ ऑक्टोबर २०११ (UTC)

>>> महिनोन महिने ठेवण्यात काही अर्थ नाही... संतोष महाराज, मी साचा लावून लेख भरण्यास चालू केले होते आणि हे सगळे मी आताच तयार केलेले होते
गेल्या चोवीस तासात वगळलेल्या लेखांची सांख्यिकी पाहिली असता २४९ लेख वगळल्याचे दिसते मला नाही वाटत हे सगळे लेख आपण आत्ताच तयार केले असतील. कारण बर्याच लेखांची शीर्षके इंग्रजी दिसली. आणि मी जेव्हापासून इथे बघतोय इंग्रजी शीर्षकाने नवीन लेख विकिपिडीयावर तयार झाल्याचे स्मरत नाही. त्यामूळे आत्ताच लेख बबनवले होते या तुमच्या मताशी मी सहमतच नाही. त्यामुळे आपल्या पुढच्या मुद्द्यांचा मी विचारच केला नाही.
संतोष दहिवळ १८:३०, ८ ऑक्टोबर २०११ (UTC)


संतोष,जमत असेल तरच लक्ष घालावे! मी ४ ते ५ तासापूर्वी पाने तयार केली होतीत
                           # मराठी चित्रपट : असला नवरा नको ग बाई
                           # मराठी चित्रपट : मुंबईचा फौजदार
                           # मराठी चित्रपट : झुंज
                           # मराठी चित्रपट : एक डाव भुताचा
                           # मराठी चित्रपट : चंदनाची चोळी अंग अंग जाळी
                           अशी त्यांची नवे आहेत. आणि ती वगळल्यावर तुम्ही कोठे त्याचा इतिहास बघितला कोणास ठावूक!
                           असो !
                           चर्चेस पूर्णविराम 
                           राम राम !!  सागर:मराठी सेवक  १८:३९, ८ ऑक्टोबर २०११ (UTC)
मार्कळ साहेब,
नातू साहेब ! तुम्ही सांगितल्या प्रमाणे माहिती भरणे चालू केले होते आणि (अयोग्य शीर्षक: मजकूर होता) असे कारण देण्यात आले आहे आणि हे समजण्या पलीकडे
मी नुसते तुम्हाला सांगून थांबलो नाही तर तुम्हाला मदतही करणे सुरू केले होते. तुम्ही तयार केलेले दोन लेख जे अयोग्य शीर्षक म्हणून काढले, त्यांच्या शीर्षकात शुद्धलेखन चुका असल्यामुळे ती काढले. त्याआधी ती पाने योग्य ठिकाणी हलवली होती आणि काढलेली ती पुनर्निर्देशने होती.
वर दिलेली शीर्षके चुकीची आहेत हे प्रथमदर्शनीच ध्यानात येईल. त्यातील (थोडी तरी) मी योग्य ठिकाणी हलवली आणि उरलेली कदाचित काढली असतील.
अभय नातू २२:४२, ८ ऑक्टोबर २०११ (UTC)
सागर, तुम्ही 'मराठी चित्रपट : XXXXXXXX' अश्या नावांनी पाने बनवली होती; जी विकिपीडियावरील शीर्षकलेखनसंकेतांनुसार अभयने योग्य नावांकडे पुनर्निर्देशित केली. त्यानंतर आधीच्या नावांच्या नोंदी अयोग्य असल्यामुळे, मी ती पुनर्निर्देशित नावे वगळली. चित्रपटाचे मूळ लेख अजूनही अबाधित आहेत.
>>> आणि मी हवे असल्यास भरपूर लेखांचे पाने दाखवून देवू शकतो जे कित्येक महिने रिकामेच पडले आहेत आणि काही तासा पूर्वीचे लेख कसे काय वगळले ??? <<<
कित्येक महिन्यांपासून पडून असलेल्या निरुपयोगी पानांची साफसफाईदेखील चालू असते; तसेच नजीकच्या काळात घडलेल्या काही चुकांची दुरुस्ती किंवा साफसफाई करणेदेखील चालू असते. काही लोकांना कल्पना नसेल, की ही कामे किती वेळखाऊ, तरीही अटळ असतात. अश्या कामांची जबाबदारी प्रामुख्याने वगळण्याची सुविधा उपलब्ध असलेल्या सदस्यांवर असते; त्यात उपलब्ध वेळेनुसार संबंधित सदस्य भूतकाळातल्या आणि अगदी अलीकडल्या संपादनांमध्ये दुरुस्त्या किंवा साफसफाई करत असतात. किंबहुना मंदार कुलकर्णी, प्रबोध यांच्यासारखे सक्रिय सदस्यदेखील दुरुस्त्यांसाठी गस्त घालत असतात, साफसफाई करण्याजोग्या लेखांवर सूचना लावून या कामास त्यांच्या उपलब्ध वेळेनुसार हातभार लावत असतात. यात कुठल्याही व्यक्तीवर वैयक्तिक आकस असण्याचा काही मामला नाही. खुद्द मी पूर्वी बनवलेल्या लेखांमधील चुका लक्षात आल्यावर, स्वतः बनवलेले लेखही वगळले आहेत.
या दैनंदिन कामांमध्ये मराठी विकिपीडियाची गुणवत्ता टिकवण्यासाठीच तुमच्या-माझ्यासारखे सर्व सदस्य काम करत असतात. यात सदस्यानुरूप डावे-उजवे करण्याचा प्रसंग उद्भवत नाही - कारण ज्या काही दुरुस्त्या/साफसफाया चालतात, त्या सर्व त्या-त्या लेखांच्या तत्कालीन गुणवत्तेनुसार/कमतरतांनुसार चालतात. या क्रियांमागील हेतू तुम्ही समजून घ्यावा, अशी विनंती आहे. व्यक्तिशः तुम्ही यापूर्वीही काही लेखांमध्ये माहितीची चांगली भर घातली आहे, तशीच उत्साहवर्धक कामगिरी करत राहाल, अशी आशा आहे.
--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) ०३:०७, ९ ऑक्टोबर २०११ (UTC)
नमस्कार मंडळी, 'मी मागेही चावडीवर या संदर्भात लेख लिहिण्यासंबंधी काही ठोस आचार संहिता लगोलग तयार करता येईल का? असे लिहिले आहे. या संदर्भात "इंग्रजी" चे Benchmarking करावे असे वाटते. माझे आधी सांगितलेले मुद्दे असे -
      1. नवीन लेखामध्ये कमीतकमी चार ओळी किंवा दोन परिच्छेद असावेत
      2. नवीन लेखामध्ये कमीतकमी एक किंवा दोन संदर्भ असायला हवे
      3. नवीन लेख कमीतकमी एका वर्गा मध्ये समाविष्ट करण्यात यावा
      4. याच लेखाचा इतर भाषांमध्ये लेख असेल तर आठवणीने त्या भाषेची लिंक देणे आणि मराठी लेखाची लिंक त्या भाषेत देणे. कंटाळा करू नये.
      5. नवीन लेख लिहिताना जर त्या संदर्भातील छायाचित्र (प्रताधिकाराचा भंग न होणारे) लेखकाकडे असेल तर लगेचच Commons वर टाकून मुख्य लेखात आणि इतर भाषिक लेखात डकवणे.
यामुळे छोट्या लेखांची होणारी भरमसाठ वाढ आटोक्यात येईल. आणि अभय म्हणतात त्याप्रमाणे लेख परिपूर्ण होण्यास सुरुवातीपासून हातभार लागेल आणि वेळ कमी लागेल. या विषयी इतर संपादकांनी आपले मत होय/ नाही प्रकारे देऊन पुढील कार्यवाहीस आग्रही राहावे. प्रचालक अशी आचार संहिता तातडीने लागू करण्यासाठी मदत करतीलच याची मला खात्री आहे. प्रचालक यावर काम करीत आहेत हे पण मला ज्ञात आहे . आता राहिला प्रश्न साफसफाईचा. तर ते आपण करायलाच हवे. आपणही आपले घर अधून मधून करतोच की. घरातील निरोपयोगी, न लागणारे सामान, अयोग्य, अनावश्यक वस्तू बाहेर टाकतोच की. सर्वांनी शांततेने आणि थंड डोक्याने येथे काम करण्याची गरज आहे. लेख नुसता तयार करण्यापेक्षा तो भरला जाणे आणि आणि वाचकांना कसा उयोगी पडेल हे आपण सारे पाहूया. ...मंदार कुलकर्णी (चर्चा | योगदान)

धिंगाणा थांबवा मराठी विकिपीडिया वाचवा संपादन

मराठी सेवकाचे लेख बनवत असतांनाच वगळले जाणे (पान काढा साचा, कारणे, चर्चा आदी पद्धती सोडुन ) हि कृती अतिशय लाजिरवाणी आहे. त्याचा जाहीर निषेध. ह्या कृती मागे व्यक्तिगत द्वेषाचे कारण नाकारता येत नाही. काही काळा पूर्वीच ह्याचे मध्ये झालेला विवाद सर्वश्रुत आहे त्या धर्तीवर हि कृती अक्षम्य आहे. व्यक्तिगत द्वेष आणि भांडणे ह्या साठी मराठी विकिपीडियाचा वापर करणे दुर्दैवी आणि चीड आणणारे आहे.

संकल्प द्रविड या विवादीत सदस्याच्या बेधुंद वागण्याला आवर घाला !!! सदस्यांना प्रक्षोभक भाषेत लिहणे, अपमान करणे, वाद घालणे, आपणच मराठी विकीचे मालक आणि इतर सारे फुकटचे नौकर अशा तोर्यात वागणे अशा एक न अनेक घटना आणि तक्रारी फक्त ह्याच सदस्या बाबत होत आहेत. त्यामुळे मराठी विकीची प्रतिमा डागाळत आहे. नवीन सदस्यांना ह्यातून काय संदेश जातो आहे ? सदस्यांना समजून घेणे त्यांना प्रोत्साहन देणे सोडून त्यांचेशी वारंवार वाद घालणे अपशब्द वापरणे हा दखलपात्र आणि गंभीर अपराध आहे. अनेक सदस्य चूक आणि द्रविड तो बरोबर, तेही नेहमीच? आणि विवाद फक्त ह्याचेच का व्हावे बाकी लोक का नाही भांडत ?

संकल्पला योग्य समज देण्याचे सोडून येथील प्रचालक मंडळी राजकीय पक्षाच्या प्रवक्त्या प्रमाणे त्यावर फाटके पांघरूण टाकण्याचा अयशस्वी प्रयोग नेहमी करतांना दिसतात . संकल्पचे कसे बरोबर आणि बाकी कसे मूर्ख हे समजवण्याचा पुन्हा प्रयत्न हि मंडळी हे पोस्टिंग आल्या नंतर करणारच त्याची मजा सर्वांनी पहावी आणि विवादास्पद सदस्य संकल्पवर कारवाई नझाल्यास इतरांनीही लवकरच राम राम ठोकायचा का ते ठरवावे - मेघनाथ १८:४८, ८ ऑक्टोबर २०११ (UTC)

मेघनाथ,
आपण येथे काही दिवसांपूर्वी आलात. याआधी किती सदस्यांनी येथे धिंगाणा घातला आहे याची आपल्याला कल्पना नसेल. बेधुंद लिखाण, संपादने करणार्‍या या सदस्यांच्या या उपद्व्यापामुळे भीक नको पण कुत्रे आवर असे म्हणण्याची पाळी अनेकदा आली आहे. तरी येथे अनेक वर्षे सातत्याने विकिपीडियाची सेवा करीत असलेल्या सदस्यांचा फ्युझ कमी वेळात उडाला तर त्यात नवल नाही. यात नवीन-जुने असा भेदभाव करण्याचा हेतू नव्हे तर कधीकधी असलेल्या संकेतांची आठवण करताना नेहमीच गरजेपेक्षा जास्त ढील का दिली जात नाही याचे कारण. नवीन सदस्यांनी सुद्धा येथील संकेत थोडेसे समजून घेऊन मगच डोक्यात राख घालून घ्यावी.
आता "संकल्पला योग्य समज देण्याचे सोडून येथील प्रचालक मंडळी राजकीय पक्षाच्या प्रवक्त्या प्रमाणे त्यावर फाटके पांघरूण टाकण्याचा अयशस्वी प्रयोग नेहमी करतांना दिसतात" हा तुम्ही केलेला व्यक्तिगत आरोप मी तुमचा अननुभव समजून घेउन सोडून देतो. संकल्प आणि माझे अनेकदा कडाक्याचे वाद झालेले आहेत. त्यात रिकामे/छोटे लेख असावे कि नाही हा सुद्धा मुद्दा अनेकदा आला. माझे आत्तापर्यंतचे म्हणणे होते की सदस्यांवर कमीतकमी निर्बंध घालावे पण गेल्या काही महिन्यातील संपादने पाहता मला माझ्या मताला थोडीशी मुरड घालावीशी वाटते.
संकल्पची बाजू घेउन भांडण्यासाठी मला वेळ नाही. संकल्प त्याचे मुद्दे मांडण्यात कमी पडणार नाही याची मला खात्री आहे आणि त्यातील मला न पटणारे मुद्दे खोडून काढण्यास मी सुद्धा कमी करणार नाही. इतर सदस्यही कमी करत नाहीत हे मी पाहिलेले आहे.
विवाद फक्त ह्याचेच का व्हावे बाकी लोक का नाही भांडत
माझी आणि संकल्पची (किंवा संकल्प आणि माहितगार/संतोष किंवा माहितगार आणि मी) कितीही भांडणे झाली तरी शेवटी आपण सगळेच येथे मराठीची सेवा करण्यास आलो असल्यामुळ आपला अहंकार बाजूला ठेवून पुन्हा एकत्र येउन काम करुयात हा खाक्या आपल्या सर्वांचा आहे. तुमचाही तोच असणार याची मला खात्री आहे (नसता तर तुम्ही तुमचा वेळ येथे दिलाच नसतात की!)
असो. तुम्ही शांतपणे विचार कराल आणि प्रतिक्षिप्तक्रियेने योगदान थांबवणार नाहीत अशी आशा आहे.
अभय नातू २३:००, ८ ऑक्टोबर २०११ (UTC)
मंडळी, मी गेली काही वर्षे येथे contribute करीत आहे व शक्यतो वादांमध्ये पडत नाही. परंतु गेल्या काही दिवसांमधील भांडणे बघून राहावले नाही. कोरे लेख तयार करायचे व विस्तार विनंती लावून मोकळे व्हायचे ही कृती बंद व्हावी असे मी अनेकदा लिहिले आहे. इंग्लिश शीर्षके असलेले, आंतरविकि दुवा वर्ग इत्यादींचा संपूर्ण अभाव असलेले लेख तयार करणे अत्यंत चुकीचे आहे व ते delete केले गेल्यावर चिडणे देखील बरोबर नाही. इंग्लिश विकिपीडियावर असे लेख काही तासांमध्ये उडवले जातात. असे कोरे लेख तेथे तयार करून बघा, काही दिवसांत खाते बंद केले जाईल. विकिपीडिया हा मुक्त ज्ञानकोश आहे हे खरे असले तरी काही तरी administration हवेच की. बरेचदा administrators बदनाम होतात कारण ते दर्जा maintain करण्यासाठी काही निर्णय घेतात जे अप्रिय देखील असू शकतात (शेवटी प्रत्येक ठिकाणी घाणीत हात घालणारा हवाच ना). पण ह्याला व्यक्तिगत द्वेषाचे कारण मानले जावे हे हास्यास्पद आहे. आपण एकमेकांना कधी भेटलेलो नाही की आपण प्रतिस्पर्धी नाही. मग द्वेष कसला? जरा शांतपणे विचार करा की. Abhijitsathe ०३:२८, ९ ऑक्टोबर २०११ (UTC)

आपला तो बाळ्या, दुसर्याचे ते कार्टे संपादन

मेघनाथ ह्याच्या म्हणण्यात दम आहे. एक तिसरा व्यक्ती म्हणून मलाही मराठी विकीवर लॉबिंग असल्याचे जाणवते. अभय - संकल्प आणि त्याचे २-४ समर्थक हे एकमेकांना (विना कारण ) समर्थन देतांना एकमेकाचे कौतुक करतांना दिसतात. आपण जर निष्पक्ष विश्लेषण केले तर अभयने लिहिले कि संकल्प लगेच त्यास समर्थन देणार (दुजोरा, अनुमोदन, हो हो अभय ....) आणि संकल्प ने काही हि केले तरी वर मेघनाथ ने लिहिलेच आहे. हे लॉबिंग थांबायला पाहिजे. हि मंडळी दुसर्यांच्या काहीच सूचना ऐकायलाच तयार नाही. सदस्याच्या विचारांना शाब्दिक, तात्रिक कोट्या अथवा युक्तिवाद करून खोडून काढण्यावरच जोर देतात ह्यात विकीचे भले कसे होणार ? एक बाहेरील व्यक्ती म्हणून तरी असे जाणवते.

मेघनाथ च्या वरिल अमेरिकन राष्ट्राध्यक्ष प्रकल्पाचे उदाहरण पहा त्याचा मुद्दा बरोबर आहे. येथे गायकांच्या साच्याला ४० -४० फिल्ड्स असलेले साचे बनवण्याच्या चर्चा आणि त्याचे सामाइकरण बाबत इतक्यातच मी वाचले. गायकास ४० आणि अमेरिकन राष्ट्राध्यक्षास ४ फिल्डच्या साच्यात बांधणे म्हणजे मंडळी आपणच समजा ...! काही लेख (४-५) मध्ये ३० फिल्डचा साचा वापरला आहे पण बाकी ठिकाणी तोच पुनरप्रस्तापित करण्यास काय हरकत होती? पण इगो ...! मेरी मुर्गीकी एक हि टांग ...! बसले युक्तिवाद करत आणि त्यातही अभय मुग गिळून ???? खरच भविष्यात कोणी शहाणपण शिकवेल का ? झोपलेल्याला उठवणे शक्य आहे पण जर ......

असो त्रयस्थ म्हणून - मराठी विकिपीडिया वर उभरून येणारे हे व्यक्तिगत साट्या लोट्याचे राजकारण आज विकिस गृहयुद्धाच्या कडेवर नेते आहे. एकापेक्षा अनेक सदस्य जेव्हा वागणुकीस आक्षेप घेतात तेव्हा बाब गंभीर आहे असे समजावे आणि कठोर निर्णय घ्यावे. युक्तिवाद करू नये सफाया देऊनये कार्यवाही हवी.

मि राजाराम बोलतोय

राजाराम,
तुम्ही वरील मजकूर नीट न वाचता व्यक्तिशः आरोप करीत आहात असे वाटते. पुन्हा एकदा सांगतो -- संकल्प आणि माझे अनेक वेळा अनेक वाद झालेले आहेत. तसेच माझे आणि इतर अनेक सदस्यांचे. त्याचप्रमाणे इतर सदस्यांचे आणि अजून इतर सदस्यांचेही. बहुतेक वेळा दोघांही पार्टीने दुसर्‍याच्या म्हणण्यातील तथ्य जाणून घेउन त्याला झुकते माप दिले आहे. क्वचित आपले बरोबर वाटत असताना देखील इतरांचे बरोबर म्हणून त्यामताप्रमाणे काम केलेले आहे.
तुमची संपादने जी खोडण्यालायक होती आणि तुमची मते, जी खोडण्यालायक होती, ती खोडल्यामुळे तुम्हीच तर येथील लोकांचा द्वेष करीत नाही ना? असे करताना इतर सदस्यांना भडकावण्याचेही काम यथास्थित करीत आहात असा एखाद्याचा ग्रह होईल अशीच विधाने वर केलेली आहेत. आता बघा तुम्ही कसे मेघनाथांच्या बाजूने बोललात...याचा अर्थ तुमचे दोघांचे साटेलोटे आहे असा होतो का? असा अर्थ काढता येईल, पण तो काढणे हे साफ चूक हे मला माहिती आहे. तुम्हीही असाच सुज्ञ विचार करीत असाल असे गृहीत धरतो.
तुम्ही आत्ता आलात...गेली ४-५-६ वर्षे येथे काम केल्याने मला संकल्प बरोबरच इतरही अनेक सदस्य माहिती आहेत. त्यांना भेटलो नसलो तरीही त्यांची काम करण्याची पद्धत, बोलण्याची लकब, इ. मला चांगल्या माहिती आहेत. हेच अभिजीत, मंदार, संतोष, माहितगार, J, नरसीकर तसेच सध्या कार्यरत नसलेल्या अनेक संपादकांबद्दल. त्यांच्याबद्दल मला आपुलकी वाटते? हो वाटते (अगदी J यांच्याबद्दलही...त्यांच्याशी तर माझी खूप वेळा खडाजंगी झालेली आहे). त्यांच्या कामाबद्दल कौतुक वाटते? हो जरूर वाटते. त्यामुळे मी त्यांची चूक उघडकीस आणून देणे टाळणार? मुळीच नाही.
मला तुम्ही, सागर मार्कळ, मेघनाथ, आणि इतर असंख्य संपादकांबद्दल असेच वाटते? जरूर वाटते. अगदी आत्ता आपण भांडत असले तरीही ते विकिपीडियाच्या प्रेमापोटीच हे माहिती असल्यामुळे मला तुमच्याबद्दलही तितकेच कौतुक आणि आदर आहे. आपण तो वृद्धिंगत करण्यास संधी द्याल अशी मनापासून आशाही आहे.
जेथे बरोबर तेथे बरोबर म्हणणार आणि जेथे चूक तेथे चूक हेच म्हणणार हा माझा खाक्या आहे आणि मी तो कोणाच्याही बाबतीत इकडेतिकडे केलेला नाही.
६ वर्षे काम केलेल्या सदस्याचे योगदान जितके महत्वाचे तितकेच नवख्याचेही. दोघांच्या चुका एकाच तागडीत तोलल्या जातात आणि त्यांचे कामही.
तुमचे व्यक्तिगत योगदान आपल्याला (आम्हाला नव्हे) हवेच आहे. ते करताना तुम्ही येथे काम करीत असलेल्या लोकांशी आडवेच जाण्याचे ठरवले तर ते मराठी विकिपीडियाचे कमनशीबच...
अभय नातू ०५:४१, ९ ऑक्टोबर २०११ (UTC)

ता.क. युक्तिवाद करू नये सफाया देऊनये कार्यवाही हवी. -- कशासाठी आणि काय कार्यवाही पाहिजे हे कृपया विषद करावे.

राजाराम, वर लिहिल्याप्रमाणे विकिपीडिया:चरित्र प्रकल्प/पूर्ण कामे#अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या पानांचे किमान पातळीपर्यंत विस्तारीकरण येथील निकषांनुसार काम पूर्ण झाले आहे. यात कुठलाही अहंकार नाही.
बाकी विकिकरहो, राजाराम नावाचे सदस्य कामांवर टिप्पणी करण्यापेक्षा माझ्यावर अहंकाराचे व राजकारण करण्याचे दोषारोप करून चिखलफेक करीत आहेत. हा प्रकार मलातरी अयोग्य वाटतो.
--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) १४:४३, ९ ऑक्टोबर २०११ (UTC)

चौकडी चे धमकी वजा संदेश संपादन

Czeror ह्या सदस्याने ३० सप्टेबर ला ८:०८ ते ८:३१ ह्या अवघ्या १९ मिनिटे कालावधीत फक्त ९२ कोरे लेख बनवले. त्यात वर्ग सुद्धा नाहीत त्यावर येथील लॉबीने काय केले ? अगदी सौम्य प्रतिक्रिया दिली. आज १० पेक्षा जास्त दिवसानिहि हे कोरे लेख डौलाने मराठी विपीवर कर्यरत आहेत.मग Vishal1306, मराठी सेवक ह्यास काम करीत असतानाच सारखे सारखे धमकी वजा संदेश हि चौकडी देऊन काही लोकास जाणून टार्गेट तर करत नाही ना ? त्यातूनच लोक विकिस जय महाराष्ट्र करीत आहेत. ह्याने विकीचे नुकसानच होणार ....! मि राजाराम बोलतोय

  • ता. क. :- हजारो ग्रांप्री वरील कोरे लेख आहेत आणि बनतात हि आहेत त्याचे काय ?
Czeror ह्या सदस्याने ३० सप्टेबर ला ८:०८ ते ८:३१ ह्या अवघ्या १९ मिनिटे कालावधीत फक्त ९२ कोरे लेख बनवले; त्यांच्यावर मी सदस्य:सांगकाम्या संकल्प हा सांगकाम्या चालवून दुसर्‍याच दिवशी, म्हणजे १ ऑक्टोबरास 'पानकाढा' साचे लावून ठेवले आहेत. त्यातील काही लेख प्रत्यक्षात वगळलेदेखील आहेत. (आता यावर माझ्यावर आकस ठेवणारे लोक म्हणतील, की ते लेख तुम्ही तेव्हाच का उडवले नाहीत? तर यावर उत्तर असे, की किमान पानकाढा साचे लावून ठेवणे हे काम मी माझ्या उपलब्ध वेळेत प्राधान्याने केले; ते सर्वच्या सर्व लेख वगळण्यासाठी मी रात्रभर जागून काम केले पाहिजे, अशी सक्ती माझ्यावर कोणी करू नये.)
बाकी कोणत्या चौकडीबद्दल आपण बोलत आहात? म्हणजे आपला माझ्याशिवाय अजून कुणावर बोट ठेवत आहात तेही स्पष्ट होईल.
--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) १४:४३, ९ ऑक्टोबर २०११ (UTC)
या संवादात अधिक दखल न देता सांगतो की {{पानकाढा}} संदेश लावणे हा प्रचालकांचा किंवा जुन्या सदस्यांचाच मक्ता नाही. अगदी नवीन सदस्य सुद्धा हे करू शकतात. तुम्हाला जो लेख अर्थहीन वाटतो त्यावर लावा खुशाल हा साचा, मग तो ग्रां प्री वर असो, की अजून कुठले डौलात मिरवणारा असोत.
अभय नातू १७:००, ९ ऑक्टोबर २०११ (UTC)
ता.क. Vishal1306 या सदस्याचे चर्चा पान पाहिले. कोणाशीही त्यांचा वाद झालेला दिसत नाही. उलट अनेकांनी त्यांना मदत केल्याचे तसेच त्यांच्या कामाचे कौतुकच केलेले आढळते. मग त्यांचे नाव येथे काढून संबंध नसलेल्या सदस्यांना चिथावण्याचा तर उद्देश नाही ना?
  • विशालचा संबंध : अभय नातू तुमची टोळी भाभड्या मराठी सदस्यांना कोणत्या कोपर्यांत नेऊन दम भरते ते आपणास माहित नसावे म्हणजे आश्चर्य ? तुम्ही येड घेऊन पेड गावला तर जात नाही ना ? "पाल्नेकी औकात नही तो पैदा क्यू करते हो ..." अशा फिल्मी स्टाइलचे डायलॉग आणि गुंडगिरीचे नमुने चर्चा:पल्सार येथे आहेत -मि राजाराम बोलतोय

सर्वांना सादर नमस्कार संपादन

अभय/संकल्प/राजारामजी ! कोणीतरी मोठेपणा घेउन व कोणीतरी लहानपणा घेउन ही चर्चा आता संपवुन टाकावी अशी माझी सर्वांना अत्यंत आदरपूर्वक व अत्यंत नम्रतापूर्वक विनंती आहे.काय झाले ते झाले. आता यापुढे नको. आशा करतो कि कोणीही माझी विनंती टाळणार नाही.आधीच सर्वांना धन्यवाद देतो.समाज हा सतत सामाजिक संवादात सहभागी असणार्‍या व्यक्तींचा समूह किंवा समान स्थानिक किंवा सामाजिक प्रदेश सामायिक करणारा मोठा सामाजिक गट असतो जो सामान्यत: समान राजकीय अधिकार आणि प्रबळ सांस्कृतिक अपेक्षांच्या अधीन असतो. जे लोक विशिष्ट संस्कृती आणि संस्था सामायिक करतात त्यांच्यामध्ये संबंधांचे (सामाजिक संबंध) नमुन्यांद्वारे समाज वैशिष्ट्यीकृत असतात; दिलेल्या समाजात त्याचे सदस्य असलेल्या घटकांमधील अशा प्रकारच्या संबंधांची बेरीज म्हणून वर्णन केले जाऊ शकते. सामाजिक विज्ञानांमध्ये, एक मोठा समाज बहुतेकदा उपसमूहांमध्ये स्तरीकरण किंवा वर्चस्व नमुना दर्शवितो.

सोसायटी विशिष्ट कृती किंवा भाषण स्वीकार्य किंवा न स्वीकारलेले मानून वर्तनाचे नमुने तयार करतात. दिलेल्या समाजात वागण्याच्या या पद्धतींना सामाजिक निकष म्हणून ओळखले जाते. संस्था आणि त्यांचे निकष हळूहळू आणि सतत बदलत असतात.

सहकार्याने एक समाज आपल्या सदस्यांना अशा प्रकारे फायदा करण्यास सक्षम करू शकतो ज्यायोगे वैयक्तिकरित्या कठीण होईल; वैयक्तिक आणि सामाजिक (सामान्य) दोन्ही फायदे या प्रकारे ओळखले जाऊ शकतात किंवा बर्‍याच प्रकरणांमध्ये ओव्हरलॅप केल्या पाहिजेत. एखाद्या समाजात एक समविचारी लोकसुद्धा असू शकतात ज्यात वर्चस्व असलेल्या, मोठ्या समाजात त्यांच्या स्वत: च्या रूढी आणि मूल्ये असतात. याला कधीकधी उपसंस्कृती म्हणून संबोधले जाते, हा शब्द गुन्हेगारामध्ये मोठ्या प्रमाणात वापरला जातो.

अधिक व्यापकपणे आणि विशेषत: स्ट्रक्चरलिस्ट विचारांमधे एखाद्या समाजाचे आर्थिक, सामाजिक, औद्योगिक किंवा सांस्कृतिक आधारभूत संरचना म्हणून वर्णन केले जाऊ शकते, परंतु त्यापेक्षा वेगळ्या व्यक्तींचे संग्रह वेगळे आहे.

वि. नरसीकर (चर्चा • योगदान) १३:४४, १० ऑक्टोबर २०११ (UTC)

रामाची सीता कोण संपादन

नार्सिकार,

कोत्या मनाच्या अट्टल राजकारणी अभय नातू कडून तुम्ही काय मोठेपणाची अपेक्षा करता. अगदी सुरुवातीलाच म्हटल्या प्रमाणे ....

 युक्तिवाद करू नये सफाया देऊनये कारवाई हवी.

असेच अपेक्षित होते पण आपल्याच टोळीतील चेल्या चपाट्याना गुंडागर्दीचे आपल्या नावाप्रमाणे अभय दिलेल्या नातूंना असे करणे अश्यक्य दिसते. आजवर त्यांनी केवळ इतरांना बौद्धिक दिले आहे चेल्यांना समज देतानांना ते कधी दिसले नाही. हा त्यांचा एकवर्णी पक्षपाती खाक्या प्रचाल्काच्या गरिमेस काळिमा फासणारा आहे. त्यांनी आत्मपरीक्षण करावे. आरोपींवर योग्य कारवाई व्हावी एवढीच माफक अपेक्षा. वाद थांबवण्याची मलाच घाई आहे. पण रामायणा नंतर रामाची सीता कोण असे अभय नातू यांनी म्हणू नये म्हणजे मिळवले...! - मी राजाराम बोलतोय

वाद थांबवण्याची मलाच घाई आहे. असे दिसत तरी नाहीये. २-३ दिवसांनंतर तुम्हीच पुन्हा हा वाद उकरून काढला आहे. तुमचा problem काय आहे ते सर्वांना स्पष्टपणे सांगाल काय? येथे तुमचे contribution कमी आणि उपद्रवच जास्त होतो आहे असे कोणाला वाटले तर नवल नाही.
Abhijitsathe ११:१९, १२ ऑक्टोबर २०११ (UTC)
कोत्या मनाच्या अट्टल राजकारणी
जरा लेखणी/कळपट सांभाळा, राजाराम. नरसीकरांच्या विनंतीनंतर मी मुद्दामहून चर्चेत भाग घेतला नाही तर तुम्ही वाहवत चाललेला दिसत आहात. आरोपी, गुंडागर्दी, काळिमा, इत्यादी मोठे शब्द वापरण्याआधी थोडेसे perspective घ्या. येथे मी किंवा इतर कोणी तुमचे नोकर नाहीत. तुम्ही मला उपदेश पाजू नका. मी तुमच्या अपशब्दांना उत्तर देऊ इच्छित नाही. राजकारण कोणी चालवलेले आहे हे दिसते आहेच.
प्रचाल्काच्या गरिमेस
कोणत्या प्रचालकांशी तुम्ही याआधी बोलला आहात आणि कोणत्या गरिमेबद्दल बोलता आहात? येथील प्रत्येक प्रचालकाला तुम्ही नालायक ठरवले आहेत ना? मग कोणती गरिमा? इंग्लिश विकिपीडियावरील? तेथे जाउन येथे लिहिल्याच्या एक दशांश अपशब्द वापरुन पहा. तेथे संपादकांना, विशेषतः संकेत न पाळणार्‍या संपादकांना, किती ढील मिळते याची तुम्हाला कल्पना असेलच.
अभय नातू १४:१२, १२ ऑक्टोबर २०११ (UTC)
मी तर आता गुंड वर्गात गणला जात आहे. आता काही दिवसांत काही लोक वर्ग:गुंड नावाचा वर्ग काढून त्या वर्गात सदस्य:Sankalpdravid पानाला दाखला मिळवून देतील की काय, अशी शंका मनी डोकावतेय. :)
--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) १५:५६, १२ ऑक्टोबर २०११ (UTC)
राजाराम,सागर आणि मेघनाथ,
तुम्ही विकिपीडियावर करत असलेल्या योगदाना बद्दल मनःपूर्वक आभार! रिकाम्या लेखांबद्दल चावडीवर अनेकवेळा चर्चा झाली आहे आणि त्यातून असे मत झाले आहे की असे कोरे लेख नवीन सदस्यांना निराश करतात त्यामुळे अशा लेखा तयार न करणे हे आपल्या सर्वांचेच कर्तव्य आहे, विशेषतः प्रचालक वर्गातील लोकांनी असे लेख काढून टाकण्यासाठी विशेष प्रयत्न करणे जरुरीचे आहे. संकल्प यांनी याबद्दल केलेले काम वाखाणण्याजोगे आहे. त्यांनी आतापर्यंत केलेल्या कामाचा इतिहास पाहता फक्त वैयक्तिक हेव्यादाव्यातून काही लेख वगळले असणे अशक्य वाटते. त्यामुळे कृपया त्यांच्यावर तसले विचित्र आरोप कृपया करू नका.
जर तुम्हाला खोकेवजा लेखांतून मराठी विकिपीडियाचे भले होते आहे असे वाटत असेल तर कृपया ते कसे हे समजावून सांगण्याचा कृपया प्रयत्न करा. आणि आतापर्यंत विकिपीडियावर असलेले रिकामे लेख कसे लोकांना उपयोगी पडले आहेत हेही समजावून सांगितले तर बरे होईल.
अभय, संकल्प,
जर काही सदस्यांना रिकामे लेख करून नंतर त्यात भर घालायची असेल तर त्यासाठी आता देतो त्यापेक्षा थोडा जास्त वेळ द्यावा का? असे रिकामे लेख जे २/३/क्ष दिवस रिकामे राहिले तर त्यांना वगळले जावे. हा कालावधी सदस्यांचा कौल घेऊन ठरवता येईल.
कोल्हापुरी १७:४२, १२ ऑक्टोबर २०११ (UTC)

श्री गणेशा संपादन

नमस्कार सागर सर आणि राहुल सर, तुम्ही आज घेतलेल्या मरठी विकी शिकवणीचा फायदा झाला आम्हा सर्वाना. नक्की कसे काम करावे या बद्दल सांगितलेल्या टिप्स खूप छान होत्या, परंतु ह्या विभागावरची हि चर्चा वाचून काम चालू करू कि नको असा मला तरी प्रश्न पडला आहे. आज ५ ते ८.३० मराठी विकी चे चांगले रूप पहावयास मिळाले आणि त्या बदल तुम्हा दोघांचे आभारी आहोत. पण आता कामाच्या स्वरूपा बदल शाशंक आहे. जर तुमच्या योगदानाबद्दल अशी प्रतिकिया असेल तर आमच्या सारख्या नवख्यांनी कोण उभे देखील करणार नाही. मग तुमचा मराठीसाठी इतका आटापिटा का? आम्ही सर्वांनी आता पुढे काय करावे ? कृपया मार्गदर्शन करावे.

कामाची सुरवात अशा शब्धाने करावी लागत आहे नाईलाज आहे.Tusharmumbai1985 १७:४६, ९ ऑक्टोबर २०११ (UTC)

नमस्कार तुषार,
खेद आहे की तुम्हाला अशा संदेशाने सुरुवात करावी लागत आहे. परंतु खात्री बाळगा की येथे कितीही भांडण-तंटे सुरू असले (तसे नाही झाले तर आम्ही मराठी कसले? :-}) तरीही कोणीही कोणाही बद्दल वैयक्तिक आकस धरुन नाही. येथे सर्वजण फक्त विकिपीडियाची प्रगती उरात बाळगून आहे.
तुम्हाला असलेले प्रश्न बेधडक विचाराल अशी आशा आहे.
अभय नातू १७:५०, ९ ऑक्टोबर २०११ (UTC)

नमस्कार नातू सर, इथे असे कोणाबरोबर होत असेल हे आजच्या मराठी शिकवणी मध्ये जाणवले नाही, राहुल सर आणि सागर सर दोघेही गेले कित्येक दिवस facebook आणि twitter च्या माध्यमातून खूप प्रचार करत आहेत. facebook वर तर मराठी विकी account वरून सगळ्यांशी संपर्क साधला जात आहे. आज दोघांनीही busy schedule मधून वेळ काढून आम्हा ८-९ जणांना खूप चांगल्या प्रकारे मरठी विकी ची ओळख करून दिली. त्याचेच फलित म्हणून मी इथे आता सुरवात करणार होतो.पण आता काय करावे काय नको ह्याबद्दल शंका आहे. आणि माझे बाकीचे सहकारी पण हे वाचून किती सहभाग घेतील माहित नाही. मराठी typing साठी राहुल सरांनी दिलेली tamilcube website खूप मदत करत आहे. मी इतके मराठी लिहू शकतो यावर माझाच विश्वास बसत नाही आहेTusharmumbai1985 १८:०२, ९ ऑक्टोबर २०११ (UTC)

तुषार,
सर्वप्रथम, मला सर, बिर म्हणू नका...उगीचच डोक्यावर पांढरी टोपी आणि नाकावर काळा चष्मा आल्याचा भास होतो... :-)
सागर (बहुधा मार्कळ तुम्हाला अभिप्रेत असावेत) आणि राहुल यांचे येथील योगदान नक्कीच स्पृहणीय आहे. त्यांचे ऑफलाइन काम तर लाखमोलाचे आहे.
मला वाटते की येथे आत्ता जे दिसून येत आहे ते आपल्या (सगळ्यांच्याच) स्वभावांचे/लकबींचे कंगोरे एकमेकांत अडकण्याची प्रक्रिया. येथे असलेले बव्हंश सदस्य यातून गेलेल आहेत, मी सुद्धा. आशा आहे की एकदा हे कंगोरे एकमेकांत अडकले की ते इतके घट्ट बसतील की आपले सगळे प्रयत्न एकजूटच होतील.
असो...हे झाले तत्त्वज्ञान. अगदी (अगदी त्रयस्थ नसलात तरी) नवीन सदस्य म्हणून प्रामाणिकपणे तुम्हाला विचारतो - तुमचे trepidation[मराठी शब्द सुचवा]{{रुखरुख/भिती) घालवण्यासाठी काय करावे?
अभय नातू १८:१०, ९ ऑक्टोबर २०११ (UTC)


वाक्-यूद्धात जिंकले कोण हरले कोण? संपादन

या चावडीवर तुम्हा लोकात अचानक वाक्-यूद्धा पेटतात आणि अचानक शांतता पसरते असे दिसते. युद्धस्य कथा रम्या असे म्हणतात शेवटी वर झालेल्या वाक्-यूद्धात जिंकले कोण हरले कोण? रायबा ०४:२७, २४ ऑक्टोबर २०११ (UTC)
ही वाक्-यूद्धे करण्याची जागा नाही. जिंकण्या हरण्यासाठी ही वाक्-यूद्धे नसतात. आलेल्या अडचणी येथे मांडून विकिपिडीयाचे सदस्य त्यावर चर्चा करुन मार्ग काढतात आणि एकदा मार्ग सापडला की आपण म्हणता तशी शांतता पसरते. संतोष दहिवळ ०९:२७, २४ ऑक्टोबर २०११ (UTC)

नाईलाजको क्या ईलाज? संपादन

मला येथील सदस्य नर्सिकर मला "नाईलाजको क्या ईलाज?" असे म्हणता. उदया नाईलाज च्या जागी नालायक पण म्हणतील. मी मागासवर्गीय (दलित ) आहे आणि मी बाबासाहेब आणि सम्बंधित लिखाण केल्या बरोबर मला टार्गेट केल्या जात आहे.

धम्म हा लेख लिहिल्या बरोबर अभय नातू यांनी त्यावर "विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही" असे ताशेरे मारले. मग काही मिनिटातच द्रविड याने "विषयाची जागतिक व्याप्ती दर्शवत नाही" वैगरे काही क्लिष्ट लिहिले आणि ८ वाक्यांच्या लेखात ७ ठिकाणी संदर्भ हवा लिहिले. मझे सदस्य पानावर पान काढा साचा लावला. मला डॉन वैगरे लोकांच्या पानाचे दुवे देऊन घाबरवण्याचा प्रयत्न केल्या गेला. एकंदरीत मराठी विकिपिडीयावर दलित आणि संबंधित लिखाण करणाऱ्यावर धाबे बोलल्या जाते. नार्सिकार, नातू , द्रविड हि मंडळी उच्या कुलीन (ब्राम्हण ) असल्याचे जाणवते आणि त्यांचा दलित लिखाण करणार्यास टार्गेट करण्याचा उद्देश स्पष्ट दिसतो. मराठी विकिपीडिया हा जातीवाचक आणि असुरक्षित होत आहे ह्याचा इलाज काय ? Meshram १०:३३, ७ नोव्हेंबर २०११ (UTC)
माहीतगार म्हणतात, त्याप्रमाणे धम्म हा लेख बौद्ध तत्त्वज्ञानाच्या अंगाने आणि जागतिक दृष्टिकोन ठेवून लिहिणे अपेक्षित आहे, कारण मराठी विकिपीडिया हा विश्वकोश आहे. महाराष्ट्राखेरीज आशियात अन्यत्र बौद्ध तत्त्वज्ञानाच्या अखंडित परंपरा आहेत. थायलड, श्रीलंका, व्हियेतनाम, कंबोडिया, लाओस इत्यादी देशांत थेरवादी बौद्ध तत्त्वज्ञानाच्या परंपरा अनेक वर्षे अनेक बौद्ध तत्त्वज्ञांनी जोपासल्या आहेत. चीन व जपान या देशांतही हीनयान व त्यांची स्वतःची अशी अस्सल बौद्ध तत्त्वपरंपरा आहे. त्या सर्वांमध्ये धम्म ही संकल्पना अतिशय आधारभूत मानली गेली आहे. त्यामुळे धम्म या लेखात केवळ आंबेडकरांच्या विचारांपुरता परिप्र्येक्ष मर्यादित ठेवून चालणार नाही. त्या दृष्टीने त्याचे जागतिक दृष्टिकोनातून पुनर्लेखन होणे अपेक्षित आहे.
शुद्धलेखनाच्या बाबत सर्व लेखांबाबत जे धोरण लागू होते, तेच याही लेखाबाबत लागू होते. या लेखावर शुद्धलेखनाच्या दृष्टीने काम करावयास हवे, म्हणून शुद्धलेखन/पुनर्लेखनाचा संदेश लावला आहे.
संदर्भांबद्दल : विश्वकोशीय लेखांमध्ये जेव्हा काही महत्त्वपूर्ण विधाने लिहिली जातात, तेव्हा त्यांच्या पुष्ट्यर्थ संदर्भ लिहिणे आवश्यक असते. म्हणून संदर्भ हवा हा साचा लावला आहे.
या सर्व बाबी, धम्म हा लेख अधिकाधिक वाचनीय बनवण्याच्या दृष्टीने खरे तर सकारात्मक मानायला हव्यात. परंतु आपण जातीयवादाच्या गैरसमजातून या गोष्टीँचे गैरअर्थ काढत आहात, असे आपल्या चावडीवरील संदेशावरून वाटते. वस्तुतः मी कुठल्या कुळात जन्माला आलो किंवा मी कुठला धर्म मानतो, ही माझी व्यक्तिगत बाब आहे. त्याची मी विकिपीडियावरील किंवा अन्य कोणत्याही सामाजिक पैलूंमध्ये गल्लत करत नाही. माझे येथील योगदान हिंदू, बौद्ध, इस्लाम, शीख, ख्रिश्चन अश्या अनेक धर्ममतांविषयीच्या लेखांवर याआधीच झाले आहे. त्यामुळे माझा दृष्टिकोन वस्तुनिष्ठ आहे, हे सांगण्याची मला निराळी आवश्यकता वाटत नाही. असो. हे माझे या व्यक्तिगत बाबीविषयीचे अखेरचे मतप्रदर्शन. धम्म या लेखात अधिकाधिक भर घालण्याविषयी व काही पैलू अधिक वाचनीय घडवण्यासाठी चर्चा करायची असल्यास, स्वागतच आहे.
--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) १४:५४, ७ नोव्हेंबर २०११ (UTC)
धम्म हा लेख लिहिल्या बरोबर अभय नातू यांनी त्यावर "विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही" असे ताशेरे मारले
नमस्कार,
मी लावलेला साचा ताशेरे नाहीत तर लेख सुधारण्यासाठीची सूचनावजा विनंती आहे. हा साचा मी अनेक लेखांवर लावला आहे. यात दलित वगैरे angle नाही.
नार्सिकार, नातू , द्रविड हि मंडळी उच्या कुलीन (ब्राम्हण ) असल्याचे जाणवते आणि त्यांचा दलित लिखाण करणार्यास टार्गेट करण्याचा उद्देश स्पष्ट दिसतो.
कृपया येथे जातपात काढू नये.
अभय नातू १५:५८, ७ नोव्हेंबर २०११ (UTC)


नार्सिकार, नातू , द्रविड हि मंडळी उच्या कुलीन (ब्राम्हण ) असल्याचे जाणवते आणि त्यांचा दलित लिखाण करणार्यास टार्गेट करण्याचा उद्देश स्पष्ट दिसतो. मराठी विकिपीडिया हा जातीवाचक आणि असुरक्षित होत आहे ह्याचा इलाज काय ? या पद्धतीचे कॉमेंट अजुन कुणी देखील केल्याचे आढळत नाहीत. आतापर्यंत कोणी सदस्याने ही फक्त एखादा धर्म, जाती, संप्रदाय वा इतर काही गोष्टींवर टार्गेट केलेले दिसून आले नाही. सर्व सदस्य विकी वर योगदान देऊन त्यात निःस्पृह वृत्ती दिसून येते. सामाजिक वा इतर गोष्टींचे कोणीही उदात्तीकरण केल्याचे वा हिनवन्याचे कार्य कोणीही केल्याचे आठवत नाही. ही गोष्ट निषेधार्ह आहे.
Meshram आपण आपले आडनाव सदृश्य सदस्यनाव घेतले आहे. ते जर वेगळे असते, तर आपली ओळख दलित म्हणून केली गेली नसती. आपण व सदस्य:Kamble यांनी फक्त दलित विषयांवरच योगदान केले आहे. आपला यात काही मी मागासवर्गीय (दलित ) आहे याप्रकारे आपण लिखाणातून जाणवते. इतर सद्स्यांनी तूमच्याकडे बघण्याचा दृष्टीकोण दाखवली नव्हती, त्यामुळे आपण लिखानात बदल करावा व लेखात अधिकाधिक भर घालवी व काही पैलू अधिक वाचनीय करावेत ही विनंती. सचिन १५:५८, ७ नोव्हेंबर २०११ (UTC)
विकिपीडिया हा जातीवाचक आणि असुरक्षित होत आहे हे Meshram यांचे विधान त्यांनी धम्म या लेखाविषयी व त्यात टाकल्या गेलेल्या अविश्वकोयीय मजकूर, शुद्धलेखन या सूचनांविषयी त्यांच्या मनात निर्माण झालेल्या गैरसमजातून केले असावे असे वाटते. कारण या व अशा सूचना इतर अनेक पानांवर आहेत नमुन्यादाखल पुढे दिलेली पाने तपासावीत - एकनाथ, अँथोनी लान्सेलॉट ड्यास, आर्या आंबेकर, आर.के. नारायण, इयान फ्लेमिंग, आनंद दिनकर कर्वे, राजीव खांडेकर, गोविंद प्रभू, बाळकृष्ण हरी चाफेकर, जगद्गुरु रामभद्राचार्य, भीमसेन जोशी, झाशीची राणी लक्ष्मीबाई, दत्तात्रेय शंकर डावजेकर, त्यागराज खाडिलकर, थोरले बाजीराव पेशवे,लक्ष्मणशास्त्री दाते, दिनकर बळवंत देवधर, नयना लाल किडवाई, फौजीया खान, बाजी पासलकर, बाळाजी विश्वनाथ, सत्येंद्रनाथ बोस, विजय पांडुरंग भटकर, भास्कर लक्ष्मण भोळे, मायनाक भंडारी, रघुवीर गोविंद चिमुलकर, वरदा गोडबोले, वसंतराव दादा पाटील, विठ्ठल कामत, विष्णुबुवा ब्रह्मचारी, एमिली शेंकल, राजू शेट्टी, संगोळी रायण्णा, संजय सोनवणी, संत महिपति, कानू सन्याल, सिद्धारुढ स्वामी, सुरेशबाबू माने, प्रल्हाद ईरबाजी सोनकांबळे, सोमनाथ वडनेरे इत्यादी. मुद्दामच इथे फक्त व्यक्तिविषयक नावांचीच पाने दिली आहेत याच सूचना इतर असंख्य पानांवर आहेत. या सूचना टाकण्याचा उद्देश ही पाने अधिकाधिक विश्वकोशीय दर्जाची व्हावीत असाच फक्त आहे पण ज्यांना नावावरूनच जात समजते त्यांनी ही पाने तपासावीत म्हणजे मराठी विकिपीडिया हा जातीवाचक आणि असुरक्षित आहे की नाही हे अशा जाणकारांना समजेल. संतोष दहिवळ १७:१५, ७ नोव्हेंबर २०११ (UTC)
>>> मला डॉन वैगरे लोकांच्या पानाचे दुवे देऊन घाबरवण्याचा प्रयत्न केल्या गेला. एकंदरीत मराठी विकिपिडीयावर दलित आणि संबंधित लिखाण करणाऱ्यावर धाबे बोलल्या जाते. <<<<
मेश्राम, तुम्हांला डॉन वगैरे लोकांच्या पानांचे दुवे देऊन घाबरवण्याचा प्रयत्न केला, म्हणजे नेमका कुठल्या लेखाचा दुवा दाखवला गेला ? तुमच्या चर्चापानावर जाऊन पाहिल्यास, मलातर तसे काहीही आढळले नाही.
--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) ००:१३, ८ नोव्हेंबर २०११ (UTC)
  • >>>तुम्ही माझ्या चर्चा पानावर डॉन वैगरे लोकांच्या याद्या पाहण्यास सांगून मला घाबरवण्याचा तर प्रयत्न करीत नाही ना. मला धमक्या वैगरे मिळण्य आधीच वगळावे. डेंजर आहे सारे. धन्यवाद Meshram ०९:३७, ७ नोव्हेंबर २०११ (UTC)
ये सन्देश डॉन के संदर्भमे चर्चा पृष्ठ पर मिला पर जिसका कुछ रिलिव्हंस नजर नहीं आता| लकी ०४:५०, ८ नोव्हेंबर २०११ (UTC)

Oh god! forgive them, for they do not know what they are doing!- Lord Jesus Christ.

बाब्या के. ०८:४४, ८ नोव्हेंबर २०११ (UTC)

आमेन..... Kaajawa १७:०४, ८ नोव्हेंबर २०११ (UTC)
  • देव अभय नातू आणि कंपनीस सादबुद्धि देवो - मि राजाराम बोलतोय

कुत्र्याने केलेली हा**वण काढली संपादन

कुत्र्याने केलेली हा**वण काढली अशा तर्हेचे लिखाण मराठी विकिपीडियाचे प्रचालक महाशय श्रीमान अभय नातू करतात ह्यावरून त्याच्या भाषा शैलीचे आकलन करावे. नातू हागवण असे पूर्ण नलिहून आपण आपल्या निर्लज्य पणाचा परिचय देण्यात संकोच का बाळगला ?

सदर संदेश वगळलेल्या लेखाचे कारण/कॉमेंट म्हणून आपण त्याच्या चर्चा पानाच्या इतिहासात पाहू शकता. (आचार साहितेला डावलून त्यांनी संदेश वगळला आणि असे सुवचन लिहिले आहे) संदेश त्याच्या पराक्रमा बाबतचा होता.

ते जर विकिपीडिया सदस्यांना कुत्रे म्हणत असतील तर हो मी विकीचा रक्षक कुत्रा आहे आणि पाळीव कुत्री फक्त चोरांवरच भुंकतात. मला इतर कुत्र्यान प्रमणे नातूंचे पाय चाटता येत नाही. नातूंनी त्यांना शेभेसे काम केल्या बद्दल धन्यवाद ! - मी राजाराम बोलतोय

माझ्या सदस्य चर्चा पानावर मी काहीही बदल करू शकतो. त्या साठी आचार संहिता नाही. माझी भाषाशैली पाहण्यासाठी मराठी विकिपीडिया चाळून पहावा. कोणाशी कसे बोलतो हे पाहण्यासाठी माझ्या चर्चा पहाव्या.
कुरापती काढण्याचा प्रयत्न कोणाचा आहे हे स्पष्टच आहे.
पराक्रम कोण करते आहे हे सुद्धा येथे स्पष्टच आहे.
वस्तुतः या महाशयांचे भांडण इतरांशी होते त्याचे माझ्यावर कसे आले हे कळत नाही. असो, त्यांनी चालवलेले चारित्र्यहनन आपणा सर्वांसमोर आहेच. एकेरी उल्लेख, इतरांच्या सदस्यपानावर माझ्याबद्दलचे derogatory संदेश, इ कडे दुर्लक्ष करीत मी संयम बाळगून इतर पानांवर उत्तरे न देण्याचा प्रयत्न करीत आहेच.
माझे योगदान कोठे व किती आहे हे राजारामांनी इतरांना सांगू नये. ते विकिपीडियाच्या इतिहासात मिळेलच. मराठीला विकिसंमेलनातून हद्दपार झाले असता तेथे हस्तक्षेप कोणी कोणी केला हे सांगणे माझे काम नाही.
राजारामांचे योगदान कोठे व किती आहे हे हवे असल्यास त्याची जंत्री तेच देतील.
राजाराम स्वतःचीच शोभा करून घेत आहेत हे सुज्ञांस सांगणे नलगे.
या महाशयांनी नरसीकरांच्या पानावर आता मी उत्तर-दिवाळी आतिशबाजी सुरू करणार अशी धमकी दिली, याचे हे प्रत्यंतर दिसते आहे.
आपल्या डिवचलेल्या इगो पायी (यांचाच का डिवचला कोणास ठाउक, मूळ वाद इतरांच्यातच होता) मराठी विकिपीडियावरील सदस्यांचा वेळ घालवण्याचे पराक्रम राजाराम थांबवणार नाहीत याची मला खात्री आहे. चालू द्या.
अभय नातू २२:२१, ९ नोव्हेंबर २०११ (UTC)


आरे काय लावलय? येळ जात न्है का काय?

Please ban this guy Rajaram. He is here just to make trouble. ह्या गृहस्थाचा लाईफमध्ये काय प्रॉब्लेम आहे कोणास ठाउक. राजाराम, आपण आपली गरळ इतरत्र ओका व कृपा करून येथील सदस्यांना शांतता लाभू द्या.

Abhijitsathe ००:४२, १० नोव्हेंबर २०११ (UTC)

महिला टेनिस खेळाडू संपादन

बर्‍याचशा महिला टेनिस खेळाडूंच्या लेखांमध्ये Viju pande ह्या सदस्याने घोळ घातलेला आहे. माहितीचौकट असताना नवी रिकामी चौकट लावणे इत्यादी प्रकार bot वापरून केले असावेत. उदा: मार्टिना हिंगीस, जस्टिन हेनिन, किम क्लाइस्टर्स इत्यादी. असे सांगकामे authorize कसे केले जातात?
Abhijitsathe १९:२९, १६ नोव्हेंबर २०११ (UTC)

शुभेच्छा
श्री.Abhijitsathe यांसी सप्रेम नमस्कार , आपलेही नाव मान्यवर ज्येष्ठांच्या यादीत दाखल झाल्याचे पाहीले या बद्दल प्रथमातः मनःपूर्वक अभिनंदनाचा आणि शुभेच्छांचा स्विकार करावा.मी विकिपीडियावर आज पर्यंत कधी लेखन योगदान केले नाही, पुढे कधी योग येईल का ते आज तरि सांगणे कठीण आहे असे असता आपणा सारख्या ज्येष्ठांचे लेखनात सुधारणा सुचविण्याचा अधिकार मला खचितच नाही.

मागे काही काळ मराठी विकिपीडियाच्या चर्चा पानांवर व्यक्तिगत आरोप प्रत्यारोपांची जी रसवंती वाहते आहे त्याबद्दल पुर्वी प्रतिक्रीया नोंदवली नाही कारण तसे मला शांतता असण्याच्या कालावधीत करावेसे वाटले.खरेतर बहूसंख्य मानवजात आणि त्यात मराठी माणूस हृदयात काही वावगे नसताना भवानेच्या भरात आपण जे बोलतो लिहीतो त्याने दुसरीव्यक्ति दुखावली जाउ शकते हे लक्षात घेण्यास थोड्या कालावधी करता अ़क्षम होतो. हे मनुष्य प्राण्याकरता पुर्णतः नैसर्गिक आहे पण जेव्हा गोष्ट एक चांगली संस्कृती निर्माण करण्याची गोष्ट येते तेव्हा सर्व नैसर्गिक गोष्टी न्याय्य ठरतातच असे नव्हे.

या चर्चा पानावर मी या विषयावर लिहिण्या करता आपले लेखन घेतले हा अगदीच योगायोग आहे मी ज्या माझ्या दृष्टीने उपरोक्त लेखनातील चुकीचे दिग्दर्शन करू इच्छितो तशा चुका मराठी विकिपीडियावर असंख्य व्यक्तिंनी पुर्वी केलेल्या आहेत त्यामुळे कधीन कधी हे लिहिणे प्राप्त होते त्यामुळे अभिजीतरावांनी या हे फक्त स्वतः पुरते आहे असे समजू नये ही सादर विनंती.

Viju pande ह्या सदस्याने घोळ घातलेला आहे हे वाक्य काही वेगळ्या पद्धतीने लिहीण्याचा प्रयत्न केला तर Viju pande नामक जी व्यक्ती आहे ती दुखावली जाणार नाही. विधान लिहिताना सयंमाची प्रचिती येण्यास वाव आहे का या बद्दल पुन्हा एकदा शांत मनाने विचर करावा खास करून आपण जेवढे ज्येष्ठ तेवढी आपली जबाबदारी अधिक हे सूत्र अनुसरता येईल का या बद्दल सर्वच ज्येष्ठांनी विचार करावा अशी पुनःश्च विनंती परमहंस ०४:५३, १७ नोव्हेंबर २०११ (UTC)

सुंदर सूचना , परमहंसजी !! माझेही अनुमोदन. आपली लेखनशैली व विकिपीडिया बद्दलची कळकळ पाहता आपण विकिपीडियावर लेखन योगदान जरुर सुरु करावे, हि आग्रहाची विनंती ! Girish2k ०६:०४, १७ नोव्हेंबर २०११ (UTC)

अभिजित साठे जी,

शायद विजू पांडे ये विकी प्रणाली के जानकर लगते है | बॉट चलाना सामान्य सदस्योसे अपेक्षित नहीं | हमने उनकी रिस्पेक्ट करनी चाहिए | मराठी विकिपीडियाको जन्करोंकी जरुरत है | यदि कोई गलती हुई है तो उसे सुधारनेकी कोशिश हो नहीं उसे लेकर सवाल उठाये या बहेस छेड़े | कुपया भड़काऊ बयान बजिसे बचे तो बहुत अच्छा होगा.

एक विकिपिडियन की है अर्जी ||
खुदगर्ज की है गरजी ||
आगे तुम्हारी मर्जी ....!
लकी १२:०१, १७ नोव्हेंबर २०११ (UTC)
लकी, आपण कृपया आपला मुद्दा मराठीत मांडावा. मराठीत मांडण्यास व्यक्तिगत मर्यादा असतील, तर परभाषक सदस्यांनी चर्चापानांवर इंग्लिश भाषेतून मुद्दे लिहिण्याचा संकेत आहे. अन्य भाषा मराठी विकिपीडिया समुदायास समजतीलच, अशी परिस्थिती नसल्याने या संकेतांची नोंद घ्यावी, अशी विनंती.
--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) ०६:३९, १८ नोव्हेंबर २०११ (UTC)


श्री. लकी यांनी ज्या अर्थी आपले विचार हिंदी भाषेत मांडले आहेत, त्यावरुन मराठीत विचार मांडता येण्याबद्दलची त्यांची मर्यादा उघड आहे. हिंदी ही आपली राष्ट्रभाषा व मराठीची भाषा-भगिनी असतांना, कोणी परभाषीक सदस्याने आपले विचार हिंदी भाषेत मांडले, तर कोणाची काही हरकत नसावी. आणि, मूळात इंग्लिश भाषेतून मुद्दे लिहिण्याचा संकेत हा कोणी व कधी ठरवला ? हिंदी भाषा ही मराठी विकिपीडिया समुदायास समजण्यासाठी इंग्रजीपेक्षा नक्कीच जास्त सोपी व जवळची आहे, असे माझे प्रामाणिक मत आहे. मुद्दा केवळ तात्विक चर्चेसाठी मांडत आहे. कोणताही व्यक्तीगत आकस नाही व नसावा.
-- Girish2k ०९:४३, १८ नोव्हेंबर २०११ (UTC)

वातावरण शुद्ध राखण्यास सहकार्या हवे संपादन

अभिजितराव,

आपले नाव जेष्ठ लोकांच्या यादीत नोदविले जात आहे तेव्हा परमहंस जी म्हणतात त्यास मी पण त्याच वैचारिक दृष्टीकोणास समर्थन देईन. आपली जशी संपादने वाढली तशी तशी सदस्यांकडे पाहण्याची अधिक सर्व समावेशक दृष्टी पण रुंदवावी हि अपेक्षा कारण सदस्य शिकता शिकताच प्रवीण होतील. तुम्ही आम्ही पण जन्मताच धावायला लागलो का? तेव्हा चुकांवर केवळ भडक शब्दात प्रहर केल्याने सदस्य दुखावण्याचे परिणाम आणि दूष परिणाम मराठी विकिपीडिया भोगतो आहेच आता पुन्हा त्याच चुका टाळाव्या असे वाटते अर्थात येथे चुकांचे समर्थन मुळीच नाही पण सांभाळून घेणे, समजून घेणे, समजून सांगणे हा मार्ग स्वीकारला तर कसे. केवळ सदस्यास ओरडणे, वगळण्याची शिफारस करणे हे फार सोपे मार्ग आहेत पण सदस्यास रुजवणे हे कठीण व्रत आहे. आपण सुजाण आहात, ह्यातून केवळ चागलाच अर्थ घ्याल आणि अंगिकारल अशी अपेक्षा.

  • ता. क. - ज्या काही एरार आपणास सापडले आहेत त्यास त्वरित उलटून टाकावे. कुपया चावडीवर आरडा ओरड करण्या ऐवजी त्या सदस्याच्या चर्चा पानाचा उपयोग चावडीचे वातावरण शुद्ध राखण्यास सहकार्याचे ठरेल. Bhimraopatil ०९:१३, १७ नोव्हेंबर २०११ (UTC)
माझा घोळ घातला हा वाक्प्रयोग चुकीचा असेलही आणि जर विजू पांडेंना त्याचे वाईट वाटले असेल तर क्षमस्व. परंतु मुद्दा असा आहे की एखाद्या वर्गामधील १८६ लेखांमध्ये रिकाम्या चौकटी घालून नक्की साध्य काय होणार आहे (आणि त्यात असेही अनेक लेख आहेत ज्यांमध्ये भरलेल्या माहितीचौकटी आधीपासूनच होत्या)? आपण सर्वजण येथे विकिपीडियाचा दर्जा उंचावण्यासाठी झटत आहोत पण अनास्तासिया सेवास्तोव्हा इत्यादी लेख पाहिले की वाटते आधीच रिकामे लेख येथे काय कमी आहेत ज्यात आता रिकाम्या चौकटी आल्या आहेत? AWB हे उपयुक्त tool आहे परंतु त्याचा वापर जपूनच करायला हवा असे नक्की वाटते. मला वाटते चावडीचा वापर असे मुद्दे मांडण्यासाठी नाही करायचा तर कशासाठी? चावडीवर आरडा ओरड करण्या ऐवजी हे आपले विधान प्रक्षोभक नाही का? Abhijitsathe १३:३३, १७ नोव्हेंबर २०११ (UTC)
चावडीचा वापर असे मुद्दे मांडण्यासाठीच आहे, पण xyz व्यक्तीचे नाव घेऊन आपला मुद्दा मांडल्यास, त्याला वैयक्तीक टीकेचे स्वरूप येते, आणि ती व्यक्ती दुखावली जाते. 'येथे मूळ प्रश्न पुरेसे चेकिंग (बॉट चालवण्यापूर्वी आणि चालवल्यानंतर) न करता बॉट चालवण्याचा आहे, आणि हे कोणाकडूनही घडू शकते.' अशा वेळी संबंधीत व्यक्तीस समजावून सांगितल्यास, आणि ३-स्ट्राईक किंवा तत्सम ग्रॅजुअल रिस्पॉन्स पद्धत वापरल्यास अधिक चांगले. (नोट : ही माझी वैयक्तीक मते आहेत) Kaajawa १९:१२, १७ नोव्हेंबर २०११ (UTC)

ही चर्चा वादनिवारण चावडीवर हलवावी? संपादन

ही चर्चा विकिपीडियाबद्दल न राहता कसे बोलावे, कसे वागावे, कसे प्रतिसाद द्यावे याकडे झुकत चाललेली आहे तरी ती विकिपीडिया:चावडी/वादनिवारण येथे हलवावी असे माझे मत आहे.

अभय नातू ०४:१०, १८ नोव्हेंबर २०११ (UTC)

चावडीवर निंदा नालस्ती संपादन

मराठी विकिपीडियाच्या चर्चापानावर अथवा चावडीवर वाद होऊ शकतात पण वैयक्तिक निंदा नालस्ती येथे चालू शकत नाही. त्यासाठी मायक्रोसॉफ्ट विंडोज विषयावरील अभय नातू यांच्यावर झालेले चुकीचे आरोप मराठी विकिपीडियाची प्रतिमा जनमानसात वाईट होण्यात होत आहे. म्हणून ही चर्चा येथूनही Delete करण्यात येत आहे. विशेषत: नवीन सदस्यांनी याची विशेष काळजी घेणे आवश्यक आणि अभिप्रेत आहे. कृपया लक्षात असुद्या - विकिपीडिया ज्ञानकोश सामूहीक लेखन योगदानाचे स्थान आहे.विकिपीडिया संस्कृतीत प्रत्येक सदस्याने इतर सदस्यांच्याबद्दल विश्वास आणि आदर ठेवणे अभिप्रेत आहे. इतर सदस्यांवर कोणत्याही कारणाने व्यक्तिगत,भाषिक,प्रांतीय, जातीय, धार्मिक स्वरूपांचे आरोप करू नयेत. असा मजकूर आढळल्यास तो काढून टाकण्यात येईल.

सांगकामे, शुद्धलेखन, सदस्य चर्चा पाने संपादन

नमस्कार,
सांगकाम्या चालवताना सदस्य चर्चा पानात बदल करू नयेत. तेथील चर्चा शुद्धलेखनाबाबतीत असू शकते व असे बदल केल्याने त्या चर्चेला अर्थ राहत नाही. उदा. --
सदस्य १ - मूळा नदी हेच शुद्धलेखन बरोबर आहे.
सदस्य २ - साफ चूक. मुळा नदी हेच बरोबर
सदस्य १ - ठीक, यापुढे मुळा नदी असेच लिहीन.
सांगकाम्याच्या बदलानंतर --
सदस्य १ - मुळा नदी हेच शुद्धलेखन बरोबर आहे.
सदस्य २ - साफ चूक. मुळा नदी हेच बरोबर
सदस्य १ - ठीक, यापुढे मुळा नदी असेच लिहीन.
आता यात कोण आधी बरोबर म्हणत होत आणि कोणी ते दुरुस्त केले याचा मागमूसही रहात नाही!!! यात उद्देश कोण बरोबर कोण चूक हे सिद्ध करण्याचा नसून इतरांच्या चर्चेत अपरोक्ष बदल न करणे हा आहे.
शिवाय, चर्चा पाने ही सदस्यांची व्यक्तिगत पाने असून त्यावरील शुद्धलेखनाबद्दल ते स्वतः जबाबदार आहेत. त्यात विकिपीडियावरील इतर सदस्यांनी (सांगकाम्यांसह) बदल करणे अपेक्षित नाही.
अभय नातू १८:३२, ४ डिसेंबर २०११ (UTC)
हाच नियम सदस्या पानांना देखील लागू करावा असे मला वाटते. सदस्य पान हे सदस्याचे वैयक्तिक पान आहे. त्याचा आणि विकिपीडिया वरील लेखांचा (content) चा संबंध नाही. - प्रबोध (चर्चा) १९:१६, ४ डिसेंबर २०११ (UTC)
विकिपीडिया आणि सहाय्य नामविश्वातील सहाय्य आणि शुद्धलेखन किंवा बॉट्सकरीता असलेली चर्चा आणि मार्ग्दर्शन पानांच्या बाबतीतही गरजेची आहे.माहितगार ०१:२६, ५ डिसेंबर २०११ (UTC)
  • साचे, वर्ग नावे यावर सरसकट शुद्धलेखन सांगकामे चालवणे टाळावे कारण त्यांनी केलेल्या बदलाने दुवे निकामी होण्याची शक्यता असते, आणि अशा तर्हेचे सांगकामे चालवलेच तर संबंधित दुवे पुनर्स्थापित अथवा पुनर्निर्देशित करण्याची सांगकाम्या चालकाने काळजी घ्यावी. राहुल देशमुख ०१:४२, ५ डिसेंबर २०११ (UTC)
अशी चर्चा चालु असल्याचे सर्व सांगकामे आणि त्यांच्या चालकांच्या चर्चा पानावर कळवावे , हि चर्चा धोरणे चावडीवर हलवण्या बद्दलही विचार व्हावा माहितगार ०२:२२, ५ डिसेंबर २०११ (UTC)
त्याकरीताच मला असे वाटते कि AWB किंवा सांगकामे चालवताना शक्यतो Manual मोड वर चालवणे योग्य राहील म्हणजे ज्यामध्ये बदल करायचा नाही तेथे चुकूनही होणार नाही. किंवा ऑटो लावण्यापूर्वी डाटा चे व्यवस्थित वर्गीकरण करून मग सांगकाम्या चालवावा....Mvkulkarni23 १५:३३, ५ डिसेंबर २०११ (UTC)
सुरुवातीला एक मुद्दा स्पष्ट करतो की, दि. ४ डिसेंबर २०११ ला माझ्या सांगकाम्याने बदल केलेली पाने ही शुद्धलेखन दुरुस्तीसाठी बदललेली नव्हती. बदल केलेल्या पानात फक्त (-) याऐवजी र् असा बदल केला होता. याला शुद्धलेखनाचा बदल म्हणता येणार नाही कारण अर्धा र यासाठी (-) डॅश हे चिन्ह वापरलेले होते. अर्ध्या र साठी (पोटातील) अजूनही काही टंकनपद्धतीत प्रमाणित चिन्ह नाही. ज्यांनी ज्यांनी अर्धा र साठी (-) डॅश हे चिन्ह वापरले होते त्यांच्या टंकनपद्धतीत ही चूक असल्यामुळे त्यांनी (-) डॅशचा वापर केला असावा असे वाटल्याने तेवढाच टंकनपद्धतीतील चुकीचा बदल सांगकाम्या संतोषने केलेला आहे.
हे बदल केल्यानंतर चावडीवर सांगकामे, शुद्धलेखन, सदस्य चर्चा पाने या शीर्षकाखाली चर्चा सुरु झाली व माझ्या सांगकाम्याने बदललेले सदस्य चर्चा:अभय नातू/जुनी चर्चा १९ हे पानही उलटवले गेले. (अर्थात ते त्या सदस्याचे चर्चा पान असल्याने ते उलटवण्याचा त्यांचा वा कुणाचाच अधिकार मी नाकारत नाही.)
पण मला वाटते जाणीवपूर्वक मला येथे काम करण्यापासून परावृत्त केले जात आहे. कारण माझ्याही पूर्वी दि. ३ डिसेंबरला Narayanbot1 या सांगकाम्याने सदस्य चर्चा:अभय नातू/जुनी चर्चा २०, सदस्य चर्चा:अभय नातू/जुनी चर्चा ११, सदस्य चर्चा:अभय नातू/जुनी चर्चा १९ ही सदस्य चर्चांची पाने बदलली(ढळढळीत शुद्धलेखन चुका दुरुस्त केलेली) होती. ती अजूनपर्यंतही उलटवली गेली नाहीत.(माझ्या सांगकाम्याने बदल केलेले पान उलटवले म्हणून ही पानेही उलटावीत असे माझे म्हणणे नाही तर फक्त माझ्याकडे असलेला रोख मी स्पष्ट करु इच्छितो.) याच्याच समर्थनार्थ मी दुसरा मुद्दा स्पष्ट करतो की, सदस्य माहितगार यांनी सर्व सांगकामे आणि त्यांच्या चालकांच्या चर्चा पानावर कळवावे असे सुचविले होते. असे फक्त माझ्याच चर्चा पानावर कळविण्यात आले आहे.
एवढेच नाही तर Narayanbot1 ने ३ डिसेंबरलाच सदस्य चर्चा:J/जुनी चर्चा १, सदस्य चर्चा:माहीतगार, सदस्य चर्चा:सौरभदा, सदस्य चर्चा:Imtiyaz Shaikh, सदस्य चर्चा:Gypsypkd/जुनी चर्चा २, सदस्य चर्चा:Pwt-wsu-pa, सदस्य चर्चा:J/जुनी चर्चा १, सदस्य चर्चा:महाविकी, सदस्य चर्चा:Maihu Don/जुनी चर्चा १ ही सदस्य चर्चा पानेही बदलली होती.(ही तर ढळढळीत शुद्धलेखन चुका दुरुस्त केलेली पाने आहेत.) त्याचवेळेस सांगकामे, शुद्धलेखन, सदस्य चर्चा पाने ही चर्चा सुरु व्हायला हवी होती.
मागे (२४ तासापूर्वी) केलेल्या सांगकाम्याच्या चुका पाहिल्या नाहीत व माझ्याच चुका पाहिल्या गेल्याने चर्चा सुरु केली हा युक्तीवाद (माझा) किंवा मागच्या चुकांकडे कानाडोळा केला म्हणून पुढेही त्याच चुका चालू राहिल्याने चर्चा सुरु केली हा युक्तीवाद (हा ही माझाच) मान्य केला तरी जर एखादा नवीन सदस्य चुकत असेल तर त्याला समजावून सांगण्याची जबाबदारी कुणीतरी एक सदस्य/प्रचालकाने घेतल्यास एकदमच सगळ्यांनी त्याच्यावर धावून जावू नये. (अंगावर धावून जाणे या वाक्प्रचाराचा अर्थ येथे अभिप्रेत आहे.) त्या सदस्य/प्रचालकाच्या सांगण्याने जर सदस्य ऐकत नसेल तर इतरांनी त्यात हस्तक्षेप करावा म्हणजे नवीन सदस्य गांगरून जाणार नाही.
जर जबाबदारी घेतलेल्या सदस्याकडून एखादा मुद्दा समजावून द्यायचा राहिला आहे असे इतरांना वाटले तर सदस्याला विपत्र पाठवा वापरून जबाबदारी घेतलेल्या सदस्याला राहिलेल्या मुद्यांविषयी माहिती करून द्यावी म्हणजे त्याला चूककर्त्याला त्याची परत जाणीव करून देता येईल जेणेकरून चुका करणारा गोंधळून जाणार नाही. विकिपीडियावर कार्यरत सदस्यांपेक्षा कार्यरत प्रचालकांचीच संख्या जास्त हे चित्र बदलायचे असेल तर असे करणे गरजेचे आहे. कारण येथे येणारे सदस्य समजूतदार असतीलच असे नाही. त्यांना येथे आल्यावर समजूतदार बनवायचे (कठिण असे) काम प्रचालकांना करावयाचे आहे.
यातील मुद्दे महत्वाचे वाटत असल्यास विकिपीडिया:प्रचालक/कामे येथे टाकण्यास हरकत नसावी.
वरील मुद्यांच्या वाचनाने कुणाची मने दुखावली असल्यास (माझ्यासह) विश्वासार्ह व अद्ययावत मराठी विकिपीडियाच्या स्वप्नासाठी मनापासून क्षमा मागतो. संतोष दहिवळ १६:२६, ५ डिसेंबर २०११ (UTC)
संतोष,
मी तुम्हाला कळवले आणि मग इतर लोकांनीसुद्धा हेच केलेले पाहून मी लगेच चावडीवरच संदेश टाकला. यात तुम्हाला टार्गेट करण्याचा उद्देश मुळीच नव्हता. तसे तुम्हाला वाटल्यास मी तुमची क्षमा मागतो. तुम्हाला पाहिजे असल्यास इतरांच्या पानावरही तो संदेश लावतो. मी संदेश दिल्याने तुम्हाला राग येत असल्यास संदेश देणेसुद्धा बंद करतो. माझ्या प्रत्येक हालचालीवर जर का येथील सदस्यांना टीका करायची असेल तर मी हालचाली करणेच थांबवतो.
नवीन सदस्य येउन मला येते शिव्या घालतात यात मला वाइट वाटत असले तरी ते मी त्यांच्या (विकिपीडियापुरत्या) अज्ञानाकडे पाहून काणाडोळा करतो. तुमच्यासारख्या जुन्या व होतकरू सदस्यालाही माझ्यावर असे आरोप ठेवावेसे वाटतात हे पाहून मी व्यथित झालेलो आहे.
शुद्धलेखन व इतर गोष्टींसाठी सांगकामे वापरू नयेत हा माझा आधीपासूनचा आग्रह राहिला आहे. गेल्या अनेक वर्षांच्या चर्चांवरुन ते उघडच आहे. मराठी ही इतर भाषांपेक्षा context-sensitive असल्याने शुद्धलेखनाचे सगळे नियम सगळ्या परिस्थितीत लावता येत नाहीत हे मी ओरडून ओरडून सांगतलेले आहे. त्यावेळी सुद्धा मला अनेकांनी नावे ठेवलेली होती. याउप्पर आपण (आपण म्हणजे सगळे सदस्य, फक्त तुम्ही नव्हे) असे सांगकामे चालवणे पसंत केले तर त्याला मी काहीही करू शकत नाही. मी दिलेल्या इशार्‍यांमधील परिणाम आता दिसत आहेत. I told you so असे म्हणायचे नसले तरी ते मनात येतेच.
असो. मला वाटते आता मी छोट्या का होईना, विकिनिद्रेवर जावे.
टा टा.
अभय नातू २०:३२, ५ डिसेंबर २०११ (UTC)


>>संतोषजी आपण स्वतः कोणत्याही शिकवणी शिवाय बोट संचलन शिकलात त्याचे मला मना पासून कौतूकच वाटले.राहूलची तुम्ही मराठी ट्रॅकमध्ये सहभागी व्हावे अशी खूप इच्छा होती. परवाच्याच पुण्यातील एका भेटीत संकल्पनी खरेतर तुमच्या मराठी विकिपीडियावरील कार्यशीलतेचे तोंडभरून कौतूक केले होते तुम्ही मराठी विकिपीडियाचा समुदायाचा अभिमानास्पद हिस्सा आहात. अभयंनीयात तुम्हाला टार्गेट करण्याचा उद्देश मुळीच नव्हता. तसे तुम्हाला वाटल्यास मी तुमची क्षमा मागतो. अस म्हटल्या नंतर व्यक्तिगत प्रवाद पुढे वाढणार नाही आणि आपण सारे जण मुख्य मुद्द्यांवर चर्चा करू शकू असा विश्वास बाळगतो.

>>पूर्ण मराठी विकिपीडियाचा इतिहास पहाता मराठी लोकांनी बॉट्स वापरणे हे आपल्या कडे अगदी अलिकडची घटना आहे.त्यामुळे बॉट पॉलिसींबद्दल मराठी विकिपीडियावर मागे जे चर्चा आणि निर्णय घदवून आणले गेले होते ते मुख्यत्वे अमराठी बॉट्सच्या संदर्भाने होते त्यातीलच एक निर्णय अमराठी भाषिक बॉट्सना मराठी विकिपीडियावर आंतरविकिदुव्याशिवायची कामे मराठी विकिपीडिया समुदायाने विशेष निमंत्रण दिल्या शिवाय करू नयेत असा एक धोरणात्मक निर्णय मागेच झालेला आहे. >>मराठी बॉट्सची संख्या वाढत असताना. कोनत्या गोष्टी कशा कराव्यात आणि कोणत्या गोष्टी टाळण्याची गरज आहे याची चर्चा इतर सदस्य आणि सर्व मराठी बॉट्स मिळून होणे गरजेचे आहे . अर्थात हे करताना नविन गोष्टी करताना काही चूका होणार आणि त्यांचा अभ्यास करून पुढील चर्चा आणि मार्गक्रमण व्हावयास हवे हे सांगताना निर्णय घेण्याची देण्याची घाईपण टाळावी म्हणजे चर्चांना सखोल वाव मिळेल.

>>संकल्पने शुद्धलेखन दुरूस्ती आणि शुद्धलेखन सांगकामे चालवण्यात बर्‍यापैकी एक्सपीरीअन्स मिळवला आहे बॉट्सनी मराठी विकिपीडियावर शुद्धलेखन चिकित्सा करताना काय काळजी घ्यावी याचे काही विवेचन संकल्पने अलिकडील पुणे भेटीत केले होते त्या अंगाने अधिक चर्चा होणे आणि सर्व मराठी बॉट्सनी सहभागी गरजेचे आहे. अभय आणि इतर सदस्या मांडू इच्च्छित मुद्द्यांची काळजी घेऊन बॉट्स आणि इतर तंत्रज्ञान शुद्धलेखन चिकित्सेत वापरता येईल आणि वापरले जावे असे माझे मत आहे.

>>सदस्य आणि सदस्यचर्चा पाने सांभाळण्यात सदस्यास अधिक स्वातंत्र्य उपलब्ध आहे पण ते विकिप्रणालीत ते पूर्ण स्वतंत्र्य देणे शक्य नाही अर्थात हा मुद्दा येथील चर्चेच्या दृष्टीने विषयांतर आहे. इथे मला अभय मांडू इच्छित असलेला मुद्दा कि उदाहरण म्हणून दिलेले अशुद्ध लेखनाचे शुद्धलेखन झाल्या शुद्धालेखनाच्या प्रक्रीयेतील महत्वाचे दुवेच हरवून जातात या मुद्द्याशी मी सहमत आहे. तत्द्वतच जेंचा हा मुद्दाही कि जिथे कुठे अशुद्ध लेखन आहे त्यातील जेवढे बदलता आले तेवढे बदलावे म्हणजे अशुद्धलेखन वाचण्यातून जेवढे कमी होते तेवढे लिहिण्यातही कमी होते ह्या म्हणण्यातही तथ्य आहे.

>>या दृष्टीने चर्चा पानावर पूर्णस्वयंचलित बॉट्सनी शुद्धलेखन करू नये.अर्ध स्वयंचलित बॉट्सनी शुद्धलेखन मोठा अनुभव आल्या नंतरच चर्चा , टेंप्लेट आणि सहाय्य नामविश्वावर न्यावे. सर्च इंजिन क्राऊलर्सना विशिष्ट पाने अथावा विशीष्ट मजकूर क्राऊल करू नये असे संदेश संबधीत पानावर साठवता येतात तशी काही संदेश व्यवस्था बॉट्सकरीता उपलब्ध नसेलच असे नाही त्याचा शोध घ्यावा. सोबतच अजूनही काही गोष्टी करता येऊ शकतात जसे जे संकल्प अभय अशा व्यक्ती ज्यांची योगदाने सहसा शुद्धलेखनेच असतात ती योगदाने शुद्धलिखीत करण्याचे बॉट्सनी टाळण्याबद्दल काही करता येऊ शकेला का किंवा माझ्या सारख्यांचे लेखन जे हमखास पणे अशुद्धलेखनात मोडते त्यांचे यूजरवाईज योगदानावर बॉट कसे चालवता येतील या बद्दल विचार केल्यास मार्ग बराच सुकर होईल

>>विकिस्रोत प्रकल्पात केशवसुत पूर्व आणि नवे सर्व शुद्धलेखन माहित असल्या शिवाय मॅन्यूअल शुद्धलेखन सुद्धा करू नये.

>>अजून एक मनोगत टाईपचा शुद्धलेखन चिकित्सक एक्सटँशन मराठी विकिपीडियन्सना उपलब्ध करून देता येईल का या बद्दल ऑफलाईन चर्चा चालू आहेत या कामा करीता मोठ्या प्रमाणावर स्वयंसेवकांची आवश्यकता आहे.

माहितगार ०५:१३, ६ डिसेंबर २०११ (UTC)

संतोषजी,
इथे तुम्हाला टार्गेट करण्याचा उद्देश मुळीच नाही आहे (अभय नातू यांच्या नंतरची पहिली टिप्पणी माझीच आहे म्हणून...). तसे तुम्हाला वाटले या बाबत मी तुमची क्षमा मागतो. एक नवीन व गरजेचा विषय चावडीवर मांडला गेला त्यामुळे मी माझे त्याबद्दलचे मत प्रकट केले (या आधी हि चर्चा झाली तेव्हा मी विपी वर 'एक्टिव्ह' नव्हतो बहुदा). हे मत सांगकामे चालवणारे सर्व सदस्यांना (माझ्यासकट) उद्देशून होते. तुम्ही चालवलेल्या सांगकाम्याच्या बदलांविषयी मी तुमच्या वैयक्तिक चर्चा पानावर या आधीच लिहिले आहे. त्यामुळे येथील चर्चा हि सर्व सदस्यांना उद्देशूनच होती. आपण आपल्या मनातील शंका / रोष कृपया काढून टाकाव्यात हि माझी आपणास कळकळीची विनंती आहे. - प्रबोध (चर्चा) ०९:५४, ६ डिसेंबर २०११ (UTC)

मराठी भाषादिनानिमित्त उपक्रम करण्याविषयी आव्हाना मागे काय आहे ? संपादन

मराठी विकिपिडीयावर या अगोदर मराठी विकी स्त्रोत प्रकल्पाची घोषणा झाली, भाषांतराचे आव्हाहन केले गेले, कामही सुरु आहे (मंद गतीने ). पानावरील ब्यानर मध्ये अजूनही बरीच कामे बाकी असल्याचे दिसत आहे. सुरुकेलेले काम अर्धवटच असतांना आता नवीन घोषणांचे पिक आलेले दिसते.

मराठी भाषादिनानिमित्य उपक्रम करण्या मागे काही शंका येतात, एकतर मराठी विकिपीडियावर अंतर्गत राजकारण असावे आणि त्यात एका गटाने स्त्रोतची घोषणा केली तर त्यावर कुरघोडी करण्यासाठी दुसरा गट ह्या घोषणा करीत असावा. कारण आधीच हाती घेतलेले काम पूर्ण होण्या आगोदर ह्या नव्या उपक्रमांची तयारी समजण्या पलीकडचे आहे. भाषांतराच्या ट्रेन्सलेट विकिवर जाऊन पहिले तर येथे नवीन उपक्रम करण्याविषयी घोषणा करणारी आणि त्यात आणखीन भरीस भर घालणारी मंडळी तिकडे फिरकलेली दिसत नाही. त्याचे तेथील योगदान शून्यच दिसते. मग ह्या लोकांनी विकिपीडियाच्या चालू उपक्रमात योगदान देण्याऐवजी नवीन चूल मांडण्याचे का ठरवले ?

राव, तुटपुंज्या मराठी सदस्यांना गोंधळात टाकूनका, इमोशनल ब्याकमेल करूनका. विकिपीडिया हे राजकारण खेळण्याचे ठिकाण नसावे. स्त्रोतचे काम पूर्ण होईस्तोव नवीन उपक्रम करू नयेत. Anandaaghav ०६:५४, १५ जानेवारी २०१२ (UTC)

विकीपिडीयावरचे अनेक उपक्रम अशा स्वरूपाचे आहेत की ते कधीच पूर्ण होऊ शकणार नाहीत. हां, काही टाईमबाऊंड उपक्रम येथे आहेत आणि ते पूर्ण होऊ शकलेले नाहीत, ही वस्तुस्थिती आहे, पण त्याचे कारण विकीपिडीयाने अनुसरलेल्या स्वयंसेवेच्या आणि ना-नफा स्वरूपाच्या, जनतांत्रिक पद्धतीत आहे. नफ्यासाठी किंवा अन्य लाभांसाठी चालत असलेल्या एन्टीटीमध्ये जसे प्रोजेक्ट हाती घेणे, सहभागी व्यक्तिंवर त्याची जबाबदारी निश्चित करणे आणि दिलेल्या कालमर्यादेत तो पूर्ण करुनघेणेठरवलेल्या उद्दीष्टानुसार त्याचे लाभ मिळवणे यावर संपूर्ण भर असतो, तसे विकिपीडियाच्या या स्वरूपात होणे शक्य नाही. जागतिक पातळीवर अत्यंत मोजके कर्मचारी आणि भरपूर कार्यकर्तेच असल्याने, इथे नवनवीन प्रोजेक्ट्सची घोषणा होत राहणार, त्यातले काही मागे पडणार, काही प्रचंड यशस्वी होणार, असे घडत राहीलच. विकिपीडियाचे स्वरूप अविनाशी आहे आणि लिहीलेले सारे काही जतन होत राहाते, त्यामुळे मागे पडलेल्या प्रोजेक्टचे उल्लेख, त्याची पाने पाहून खंत वाटणे, तसेच 'जुने अपुरे असताना नवे कशाला' असे वाटणे अगदी स्वाभाविक आहे, यातून विकिपीडियावरचे प्रेम आणि काळजीच व्यक्त होते, असे वाटते.
आपणासी जेजे ठावे तेते इतरांसी सांगावे, हे मानवाचे स्वभाववैशिष्टय आहे. त्यानुसार बहुसंख्य सदस्य येथे येतात. आपणही यावे आपल्याला असलेल्या माहितीची वस्तुनिष्ठ पद्धतीने लेखन करून भर घालावी. इतरांच्या लेखात भाषेच्या किंवा वस्तुस्थितीच्या काही त्रुटी, चुका, कमतरता आढळल्या तर त्या आपल्यापरीने दूर कराव्यात. हे करताना काहीवेळा मानवी स्वभावानुसार संघर्ष अटळ होतो, हे लक्षात घ्यावे. लाभ जितके जास्त तितके राजकारण जास्त, अन् विकीपिडीया आपल्या सदस्यांना मानसिक समाधानाशिवाय फार काही भौतिक लाभ देत नाही. त्यामुळे इथे काही फार तीव्र स्वरूपाचे राजकारण आहे किंवा भविष्यात होईल असे वाटत नाही.
इतिहासात योग्य माहितीअभावी (इन्फर्मेशन) अनेक मानवसमुहांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. भविष्यकाळात ते टाळण्यासाठी जगभरातली अधिकाधिक वस्तुनिष्ठ माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत जाणे आवश्यक आहे. विकीपीडिया हे शक्य करण्याचे एक माध्यम आहे, हे लक्षात घेऊन येथे वावरावे, आपल्याला शक्य तेवढा कामाचा वाटा उचलावा आणि लॉग आऊट व्हावे, नाही का? -मनोज ०६:०४, १६ जानेवारी २०१२ (UTC)

भीमपिडियाला टाळता ? संपादन

जयभीम, संकल्प द्रविड . तुम्ही एकीकडे माझ्या चर्चा पानावर बौद्ध कलापरंपरा आणि त्यामागील तत्त्वप्रणाली यांविषयी आपणास आस्था असल्याचे गोड गोड बोलता आणि भीमपिडियाला टाळता ? येथील कार्यक्रम हे आपल्या पूर्वनियोजित मर्जी प्रमाणे आपण करीत आहात. सदस्यांच्या मर्जीचा आपण विचार केलेला नाही. आनंदरावांनी म्हटल्या प्रमाणे आपण आणि अभय नातू ह्यांनी स्त्रोत प्रकल्पात सहकार्य केल्याचे दिसत नाही तर मग आपणास येथे काही जाहीर करण्याचा खरोखरच नैतिक अधिकार नाही. आपण लोक राजकारणच खेळत आहात यात वाद नाही. Meshram १८:५४, २३ जानेवारी २०१२ (UTC)

कोल्हापुरी,
अनुसूचित जातीच्या लोकांचा आवाज दाबणे आता श्यक्य नाही ...! Meshram ०५:१४, २५ जानेवारी २०१२ (UTC)
काही मुद्दे :
  • मी केवळ संपादनेथॉनेचे पान बनवले आहे. त्यात कोणकोणते कृतिआराखडे राबवावेत, ते सुचवण्याची मोकळीक सर्व सदस्यांना आहे. सदस्यांनी आपापल्या पसंतीच्या विषयांवर माहितीची भर घालावी, त्यासाठी सर्वांचेच स्वागत आहे.
  • विकिस्रोत स्वतंत्र प्रकल्प आहे. मी किंवा अन्य कोणाही विकिपीडियावर काम करणार्‍या लोकांनी त्यावर सहकार्य देणे न देणे हा वैयक्तिक मताचा भाग आहे. त्यावर तुम्ही बळजबरी करू शकत नाही.
  • मी "विकिस्रोतावर काही काम केल्याचे दिसत नाही तर मग आपणास येथे काही जाहीर करण्याचा खरोखरच नैतिक अधिकार नाही", हे आपले मत कोणत्या तर्कावर आधारित आहे, ते अजिबात कळत नाही.
  • "आपण लोक" म्हणजे तुमचा कुणावर रोख आहे, ते कळेल काय ? नेमकी व्याख्या स्पष्ट केल्यास बरे.

तुम्ही माझ्यावर ठोस तर्काधाराविना व्यक्तिगत आरोप करत आहात, असे मला वाटते. तुमचे आक्षेप तार्किक पद्धतीने मांडा. माझ्यावर व्यक्तिगत चिखलफेक चालू राहिल्यास, मला विकिसमुदायाकडे दाद मागावी लागेल.

--संकल्प द्रविड (Sankalp Dravid) (चर्चा | योगदान) ०७:१६, २५ जानेवारी २०१२ (UTC)

मेश्राम,
अभय, संकल्प, कोल्हापुरी व येथील इतर कोणत्याही जबाबदार सदस्यांवर बिनबुडाचे आरोप खपवून घेतले जाणार नाहीत. ह्यांच्याच मुळे आज मराठी विकिपीडिया आपल्या पायांवर उभा आहे, आपणासारख्यांमुळे नाही. आपल्याला येथील गोष्टी पटत नसल्यास आपण येथे येणे बंधनकारक नाही. - अभिजीत साठे १३:४७, २५ जानेवारी २०१२ (UTC)
अभिजीत साठे यांना दुजोरा! तर्कहीन चर्चेकडे दुर्लक्ष करणे, वैयक्तिक आरोपांना उत्तर न देणे वगैरे गोष्टी केल्या तरी येथे हाताच्या बोटावर मोजता येतील इतके संपादक काम करत असताना त्यांना असल्या निरर्थक चर्चांमधून होणारा मनस्ताप मराठी विकिपीडियाच्या प्रगतीच्या दृष्टीने वाईट लक्षण आहे. इंग्रजी विकिपीडियावर असे करण्याची पद्धत आहे तिचा वापर करून इथले धोरण ठरविण्यास हरकत नसावी. - कोल्हापुरी १६:२४, २५ जानेवारी २०१२ (UTC)


मंदारराव हज चले संपादन

मंदार कुलकर्णी ह्यांची सांगकाम्या संपादने

वा मंदारराव वा !!! सौ चुहे खाकर बिल्ली हज चाली ...? संतोष ह्यांना उपदेश सांगण्या आगोदर आपण आत्म परीक्षण केले का ? आपणच मोठ्या प्रमाणात स्वागत साचे सांगकाम्या द्वारे लावत आहात हे विसरलात का ? आपली जेम तेंम जी दोन हजार काही संपादने आहेत त्यात सांगकाम्या आणि स्वागत साचेच तर जास्त आहेत की... (काय हाशील ). अनेक अंगाने भरीव आणि तुलनेने ज्यास्त संपादने असलेल्या संतोष ह्याचेवर टीका हि व्यक्तिगत द्वेषातून तर निर्माण झालेली नाही किंवा कसे ? - Anandaaghav (चर्चा)


  • मंदार जी ,

आब समजा मै, आप हमें स्वागत करनेसे क्यू रोक रहे थे और दूसरी तरफ आपही वैसा करते नजर क्यू आ रहे थे | - लकी

I liked the joke Anandaaghav/लकी and appreciate the concern raised by you..... I thought I need to clarify on the same. There was some testing going on between 5th and 15th Feb. if it possible to "Swagat sacha" Programatically. That testing was going on for some days as the program was installed only on my personal pc. We find some issues and bugs during that it was not happening properly that time. For e.g. we had set the time as 5 min. but was not happening during that time. Some corrections were been done in the program and later date, the Swagat sacha is getting posted programatically under the bot account of Shantanoo named "Ninavi" and it is working fine from that date. There was no intension to use my account and increase the edit count of my account. The main intension is to reduce the manual efforts in this. If you have further doubts pls. do write to Shantanoo as well who is technical person in this....

Just a quick message for लकी, pls. make sure that you write "correct" name of the person you intend to.... मंदार कुलकर्णी (चर्चा) १५:२९, १९ मार्च २०१२ (IST)Reply

Lucky, I have been watching you for last 5 months and all you have done so far is add oil to fire. You jump into every controversy and try your best to make it worse. You have attacked almost every active contributor and administrator including me. I do not what your motives are, but I think it is time for you to either stop doing this or leave Marathi WP. Call me whatever you want, I do not care. All I care for is well-being of Marathi WP and people like you are not contributing anything. Anyone who looks at your contributions will know what I am talking about. Just give me one reason why anyone should take you seriously. - अभिजीत साठे (चर्चा) १९:५६, १९ मार्च २०१२ (IST)Reply
  • साठे जी,

आपको प्रचालक बनानेवाले संतोष जी की इज्जत मंदार कुलकर्णी ने सरेआम नीलाम की तो उसका घुस्सा आप हमपर क्यू उतर रहे हो ? -लकी

आता मंदार कुलकर्णींचे पण चेले संपादन

>>> Some corrections were been done in the program and later date, the Swagat sacha is getting posted programatically under the bot account of Shantanoo named "Ninavi" and it is working fine from that date. -मंदार कुलकर्णी (चर्चा) १५:२९, १९ मार्च २०१२ (IST)Reply

नीववी हे खाते bot खाते आहे तर ते चावडीवर माहिती का वगळत आहे ?

  • बोट खात्यातून वगळा वगळी करायची म्हणजे अलीकडील बदल मध्ये दिसत नाही हा बोट खात्याचा गैर वापर आहे.

कोणी शंतनू चे ते खाते असल्याचे वर म्हटले आहे हेच महाशय दोन दिवसा पूर्वी शंतनू खात्यातून स्वागत साचे सदस्य पानावर बोट करवी लावतांना आढळले. कोणते खाते कशा साठी वापरायचे एवढे हि सामान्य ज्ञान नसलेल्या चेल्यांना मंदार पहेले उपदेश का देत नाही. हा जाणून केलेला गैरवापर आहे आणि मग संतोष यांच्यावर टिपण्या करणार्यात त्याचा उद्देश शुद्ध दिसत नाही.

मंदार हा शंतनू आणि निनावी खत्या मार्फत विकिपिडीयावर गोंधळ घालतो आहे. त्यांचे आपसी हित संभंध वर दिले आहेतच. निनावी खाते त्वरित ब्लोक करावे, येथे त्याचा गैर वापर होत आहे. मंदारवर शिस्त भंगाची कारवाई व्हावी. मंदार कुळकर्ण्याला जर इतकी लाज वाटते तर काम सुधार म्हणा , स्वागत साचे काय लावतो  ? - Nanu (चर्चा) १३:०५, २१ मार्च २०१२ (IST)Reply


पहा मंदार साकोचातात ? संपादन

आता मंदार पुण्यातील अंक पत्त्या वरून (‎१२१ .२४१ .२३५ .६८) वगळा वगळी करतो आहे ...!

निनावी आणि शंतनू खाते धारकास संतोष प्रमाणे उपदेश का पाजत नाही? उलट वगळा वगळी केल्याने पापे धुतल्या जाणार नाहीत. (मांजरास डोळे मिटून दुध पिल्याने जागस दिसत नाही असे वाटत पण तस नसत.) - Nanu (चर्चा) १६:१८, २१ मार्च २०१२ (IST)Reply

कमित कमि उहापोह संपादन

  • सध्या यावर कमित कमि उहापोह करून निती स्विकारवी या नितीचे येत्या सहा महिन्यानंतर अवलोकन करून सर्व सहमतीने दिर्घ मुदतीचा कौल घ्यावा
  • वेसण

माथे फिरूंना वेसण घालण्या साठी हा कौल आहे. येथे कोणी सांगितले तडमडायला पहिले कार्य करा मग शहाणपणा हसडा


१)चावडी आणि चर्चा पाने अनामीक आणि नवागतांना सुद्धा मुक्त असावीत.


पाठिंबा- माझे समर्थन आहे. - [[सदस्य:शंतनू (चर्चा) ००:४७, २४ मार्च २०१२ (IST)|शंतनू (चर्चा) ००:४७, २४ मार्च २०१२ (IST)]]Reply


२)चावडी आणि चर्चा पानाववरून चारीत्र्यहनन करणारे शब्द/वाक्य आरोप तेवढेच वगळावेत .


पाठिंबा- लिहीणाऱ्याने चारीत्र्यहनन करणारे शब्द आणि वाक्य वापरु नये. असे आढल्यस सगळी महिती काढुन टाकवी. केवळ चारीत्र्यहनन करणारे शब्द/वाक्य आरोप तेवढेच वगळू नये.. - [[सदस्य:शंतनू (चर्चा) ००:४७, २४ मार्च २०१२ (IST)|शंतनू (चर्चा) ००:४७, २४ मार्च २०१२ (IST)]]Reply


२.१) चावडी आणि चर्चा पानाववरून चारीत्र्यहनन करणारे शब्द/वाक्य आढल्यास सगळी महिती कढुन टाकवी.

पाठिंबा - [[सदस्य:शंतनू (चर्चा) ००:४७, २४ मार्च २०१२ (IST)|शंतनू (चर्चा) ००:४७, २४ मार्च २०१२ (IST)]]Reply


३) रागाच्या भरात नावांच्या एकेरी केलेल्या उल्लेखांचे आदरार्थी बहुवचनात रूपांतरण करावे


विरोध- बहुवचनात रूपांतरण कोण करेल?. - [[सदस्य:शंतनू (चर्चा) ००:४७, २४ मार्च २०१२ (IST)|शंतनू (चर्चा) ००:४७, २४ मार्च २०१२ (IST)]]Reply


३.१) रागाच्या भरात नावांच्या एकेरी केलेल्या उल्लेख आढल्यस सगळी माहिती काढुन टाकवी.

पाठिंबा - [[सदस्य:शंतनू (चर्चा) ००:४७, २४ मार्च २०१२ (IST)|शंतनू (चर्चा) ००:४७, २४ मार्च २०१२ (IST)]]Reply


४)चावडीवरील सर्व लेखन मराठी भाषेत असावे. इंग्रजी अथवा इतर भाषी लेखनास सहसा परवानगी नसावी , इतर भाषिक लेख काही कारणाने घ्यावयाचे झाल्यास त्याला दाखवा लपवा साचात ठेऊन त्याचा मराठी संक्षेप तेवढा खाली द्दावा.


विरोध- Not everyone is subscribed to the Wikimedia foundation lists (relevant to mr.wikipedia.org) [१]. If someone else want to convey any message it would not be possible to do that in such cases.. - [[सदस्य:शंतनू (चर्चा) ००:४७, २४ मार्च २०१२ (IST)|शंतनू (चर्चा) ००:४७, २४ मार्च २०१२ (IST)]]Reply


५)मजकुराचे (अगदी मुद्दे विवाद्द असलेतरी) किमान चार दिवस पर्यंत अर्काईव्हींग आणि स्थानांतरण करू नये.

विरोध- वादनिवारण विकिपीडिया:चावडी वर नसावे. त्यासाठी विकिपीडिया:चावडी/वादनिवारण बनवले आहे.. - [[सदस्य:शंतनू (चर्चा) ००:४७, २४ मार्च २०१२ (IST)|शंतनू (चर्चा) ००:४७, २४ मार्च २०१२ (IST)]]Reply


६)चावडी पानांच्या अर्काईव्हींग/स्थानांतरणा करीता बॉट्सना परवानगी नसावी.विवाद शमवण्याचे दृष्टीने अपवादात्मक स्थिती करिता केवळ प्रशासकांना तेही वर्षातून प्रत्येकी अधिकाधीक पाच वेळांपर्यंत आणि सर्व प्रशासंकाचे मिळून अधिकाधीक वीसवेळा वेगळे विशेष बॉट खाते बनवून मजकुर थंड्याबस्त्यात तेही केवळ चार दिवसांनतर हलवण्यास परवानगी असावी.

विरोध- May agree upon 'bot edit' should be disallowed. But edit by bot should be allowed.. - [[सदस्य:शंतनू (चर्चा) ००:४७, २४ मार्च २०१२ (IST)|शंतनू (चर्चा) ००:४७, २४ मार्च २०१२ (IST)]]Reply


सप्तर्षींना सादर विनंती संपादन

शंतनू ह्यास बोट निनावी नावाने खाते दिले तर हा मंदार कुलकर्ण्याचा चेला सांगकाम्या करवी शंतनू खात्यातून स्वागत साचे का लावतो आहे ?

  • संपादन संख्या साठी हपापलेली हि लोक मराठी विकिपीडियाचे मातेरे करते आहे.

मंदार स्वागत साचा पलीकडे काही येते का तुम्हा लोकांना ? आणि तेतरी डोके ठिकाणावर ठेऊन लाव ! सदस्य चर्चा:Trijnstel ह्यांच्या पानावर माथेफितू शंतनुने ' "आपली मराठी विकिपीडिया वर १० पेक्षा जास्त संपादने झाली आहेत." ' आस साचा ठोकला. सदस्य चर्चा:Trijnstel ह्यांची आज्तायग ७ संपादने आहेत आणि त्यांना मराठी काळात नाही.

प्रचालक, प्रशासक (स्वीकृती अधिकारी) जागे कधी होणार ???? - Nanu


आपण समस्त विकिपीडिया ज्ञानयज्ञात आपल्या ज्ञान आणि कष्ट पणास लावता एका अर्थाने आपल्या पैकी प्रत्येक जण माझ्या करता ऋषी तुल्यच आहे.येथील सर्व ज्ञानर्षींना माझे वंदन आहे.सप्तर्षीसम प्रचालक मंडळींनी आपण केवळ निमीत्तमात्र आहोत हे लक्षात घ्यावे, अंहकाराने स्वत:चा क्षय होण्यापासून स्वत:स वाचवाववयास हवे.अहंकाराने मीच बरोबर हि वृत्ती येते सयंम सुटतो साईंनी सांगीतलेल्या श्रद्धा आणि सबुरी पैकी सबुरी हा गुण प्रचालकात असणे महत्वाचे हे लक्षात घ्यावे.

तद्वतच इतर ज्ञानर्षींनी क्रोधास तिलांजली द्यावी क्रोधाने श्रद्धेचा प्रवास नकळतच चुकीच्या अनपेक्षीत ध्येया कडे होतो.आपले ध्येय मराठी भाषा आणि त्याकरीता करावयाचे सकारात्मक प्रयत्न असेल तर त्या पासून ढळू नये.

पूर्वग्रह आणि व्यक्तीद्वेष कोणत्याच सप्तर्षी अथवा ज्ञानर्षींना शोभत नाही,पूर्वग्रह आणि व्यक्तीद्वेष हि अहंकारचीच रूपे आहेत अलंकार नव्हेत. प्रभू आपणा सर्वांना पूर्वग्रह आणि व्यक्तीद्वेष यापासून मुक्ती मिळवून देण्यात खूपसारी मन:शक्ती देवोत हि शुभेच्छा.

उद्दा पाढव्याचा चांगला दिवस आहे . या निमीत्ताने हा विकिपीडिया सर्व ज्ञानर्षींना मुक्त रहावा आणि कुणा ज्ञानर्षी मज्जाव प्रसंग आला असेल तर तर त्याचे निराकरण करून त्यांना आपल्यात सामील करून घ्यावे हि सप्तर्षींना सादर विनंती आहे. परमहंस (चर्चा) २३:०८, २२ मार्च २०१२ (IST)Reply

मंदार कुळकर्णी आणि संतोष दहीवळ संपादन

मंदार कुळकर्णी आणि संतोष दहीवळ ह्याच्या मराठी विकिपीडियावरील योगदानाचा तौलनिक तक्ता पाहता प्रचालकेतर सदस्यही तुल्यबळ किंवा वेळप्रसंगी थोडे सरसही कामे करीत असतात असे दिसते, तेव्हा प्रचालक मंडळीनी सदस्यांना सांभाळून घेतल्यास विकिपीडियाचे भले होईल. जवळील लोक आणि सामान्य सदस्य ह्यात भेदभाव होतो असा गैर समाज सदस्यांचा होणार नाही याची प्रचालक मंडळाने काळजी घ्यावी आणि त्यासाठी गरज पडल्यास वेळ प्रसंगी जवळच्या लोकास आवर घालावा. सदस्यांना ब्यान करणे हा उपाय असू शकत नाही आणि त्याने समस्या सुटण्य ऐवजी ज्यास्त गंभीर होतात हे दिसत आहे, प्रचालाकानी आपला सैयम गमावू नये, आणि प्रक्षोभक लिखाण टाळावे त्यानेही वाद चिघळतात. मी परमहंस जी ह्याच्या मताशी पूर्ण पणे सहमत आहे बंदी घालण्या पेक्षा त्याचे म्हणणे समजून घ्यावे त्यांना मुख्य प्रवाहात सामावून घ्यावे आणि समजावून सांगावे. शेवटी मराठी विकिपीडियाचा विकास हाच सर्वांचा उद्देश आहे. -Bhimraopatil (चर्चा) ०१:३७, २३ मार्च २०१२ (IST)Reply

अनु. क्र. योगदान संतोष दहीवळ मंदार कुळकर्णी
सदस्य गट नोंदणीकृत सदस्य प्रचालक
नोंदणीचा दिनांक १० एप्रिल २०११ २४ ऑक्टोबर २०१०
वर्यता क्रमांक २१ २२
एकूण संपादनांची संख्या २८८५ २८५६
मुख्य नामविश्वात संपादने १६१६ ६०५
चित्र ४०
साचा २८३ १५४
दालन ५०२ ००
वर्ग ४१ ३५
१० विकिपीडिया नामविश्व (चावडी) २१४ २६५
११ सदस्य चर्चा १३९ ८०४
१२ स्वागत साचे १६ ६२५
१३ विस्तार साचे ३० २४९
१४ AWB (खात्यातून सांगकामे संपादने ) करतात करतात

Photo requests संपादन

Hi! I would like someone to photograph the following places in Mumbai:

  • Jet Airways HQ - Siroya Centre, Sahar Airport Road, Andheri (East), Mumbai, Maharashtra 400099
  • Kingfisher HQ - The Qube C.T.S. No. 1498 A/2 4th Floor, M.V. Road, Marol Andheri (East) Mumbai - 400 059 India
  • Former Kingfisher HQ - Kingfisher House Western Express Highway Vile Parle (E) Mumbai - 400099 India

Thanks WhisperToMe (चर्चा) १४:२३, ३ एप्रिल २०१२ (IST)Reply

आईस एज संपादन

आईस एज : महासागर प्रवाह (इंग्रजी: Ice Age 4: Continental Drift किवा Ice Age 4) 2012 अमेरिकी 3 डी कंप्यूटर अनिमेटेड / साहसिक कॉमेडी स्टीव Martino आणि माइक Thurmeier ने निर्देशित केलेला सीनेमा आहे. रे रोमानो चा आवाजाबरोबर John Leguizamo, Denis Leary, Queen Latifah, Seann William Scott, Josh Peck, Keke Palmer, Chris Wedge, Peter Dinklage, Jennifer Lopez, Wanda Sykes, Drake आणि Nicki Minaj. ही श्रृंखला, ब्लू स्काई स्टडियो कड्न निर्मित आणि 20th Century Fox कड्न वितरित आहे.

BUS DAY IN PUNE संपादन

pune yethe jo` bus day``aahe tya badal anek janani usah dakhawala,pan.....1). ek divsane kay honar ,2)chalakache wagne -jase speed,bus stop var na thambvine,lokanchi tarmbal karne,dhokadayak valane, ettyadi.,3)wahak-chilar varun vad,bell yogya thikani na vajvane,ayogya margadarshan,ettyadi,4).lok-beshist,ghanerde,swattache vahan aslya sarkhe na waprne,dhakabukkee,rangecha wapar nahi ,mothyana basayala jaga.

==

माहितगारांना उत्तर संपादन

चावडी पान सुरक्षित केलेले असल्याने नाइलाजाने येथे चर्चा मांडत आहे.

अलीकडेच माझ्या चर्चा पानावर माहितगार यांनी सहकार्याची विनंती ही चर्चा चालू केली आहे त्यांचे लेखन चालूच आहे कधी पूर्ण करणार ते माहित नाही पण त्यांचे लेखन पूर्ण झाल्यावर त्यांना मी उत्तर देणार आहे पण त्यासाठी त्यांचे लेखन पूर्ण झाल्यानंतर मला विस्तृत उत्तर पूर्ण करण्यास दोन महिन्यांचा कालावधी लागू शकतो त्यासाठी मी सदस्य:संतोष दहिवळ/धूळपाटी/माहितगारांना उत्तर येथे माझ्या उत्तराची मांडणी करणार आहे. शक्य आहे तिथे अनेक सदस्य आणि प्रचालक यांचा उल्लेख येऊ शकतो व त्यांच्या विविध पैलूंबाबत माझे मत नोंदवताना उल्लेख येणारे सदस्य/प्रचालक दुखावले जाऊ शकतात. विकिपीडियाचा इतिहास पाहिला जाईल त्यावेळी माहितगारांच्या नोंदीपेक्षा माझ्या नोंदी विश्वासार्ह मानल्या जातील याचा मला विश्वास आहे. माझ्या सदस्य नावाने होणार असणार्या नोंदीला आधीच कुणाला आक्षेप घ्यायचा असेल तर येथेच खाली नोंदवा. प्रचालकांकडे मागणी करून मी अशा नोंदी करण्यासाठी एखाद्या वेगळ्या सदस्य नावाची मागणी करेल कारण मला माहित असलेले सदस्य/प्रचालकांचे विविध पैलू नोंदवण्यासाठी माझ्याकडे एकच सदस्यखाते आहे. संतोष दहिवळ (चर्चा) ११:४७, २१ नोव्हेंबर २०१२ (IST)Reply


Mahitgar - Chale Jao संपादन

Mahitgar is trying to become very smart and thinking that once he has deleted the whole page (विकिपीडिया:चावडी/Admins True Evaluation) being an admin, whole history and my efforts will go waste. I had not done any personal attack on him neither I had used any wrong language, but still he has doen the mischief of deleting the content. I do not know whether you can revert the deleted content. I had put my some sleepless nights to collect the content with right reference to give sufficient backing. But he does know that there are poeple who knows what Mahitgar can do. Even if he has deleted everything, I have the super power to get that back... :) Now I am going to put this on all the relevant pages. Let us see, who gets tired first.....

This is Marathi language wikipedia . As part of openness we are flexible towards usage of non-Marathi languages . But persay use of non-Marathi language should not go beyond 30% and that 30% also should be used only to site essential references. Marathi Wikipedia article name policy does not allow usage of english titles except very few exceptions.When there is already page exists for eveluation of Marathi Wikipedia sysops, then this page वादनिवारण is available for further resolution of conflicts , you are purposefully using english language that can help non-marathi people to undermine project indipendence of Marathi Wikipedia even before measures available on Marathi Wikipedia are not exhausted.Undermine project indipendence of Marathi Wikipedia amonts to breach of previledge rights of Marathi language people how to run there wikipedia and hence my action in deleting the page and content created by you is logical.

You can keep your english content ready with you on your computer for sake of future but we will not allow you to take rights to discuss in Marathi language for a ride .So kindly delete all your english content or necessary strict action will be taken.

You must have obsrved all sort of criticism being directed at me in Marathi language has been treated most flexibly and not deleted .may be we will need to delet some of that eventually being not as per the wiki policies.
Sysops too are voluntary people and they do enter into discussions or support activity as per their available time and they can not be forced in to in any way. If I am having patiance rest of the people need to have the same.
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) ०८:३९, ३० नोव्हेंबर २०१२ (IST)Reply

नमस्कार माहितगार,

>>are purposefully using english language that can help non-marathi people to undermine project indipendence of Marathi Wikipedia even before measures available on Marathi Wikipedia are not exhausted.Undermine project indipendence of Marathi Wikipedia amonts to breach of previledge rights of Marathi language people how to run there wikipedia and hence my action in deleting the page and content created by you is logical.<<

तुमचे वरील वाक्य वाचुन मला भीमराव महावीर जोशी पाटील यांची आठवण आली. प्रश्न एवढाच की तुम्ही त्यांना हि माहिती दिली कि त्यांनी तुम्हाला.

Mrwiki reforms (चर्चा) ११:१२, ३० नोव्हेंबर २०१२ (IST)Reply

>>प्रश्न एवढाच की तुम्ही त्यांना हि माहिती दिली कि त्यांनी तुम्हाला.

तथाकथित संस्थापक सदस्यांच्या भूमीकेचे मी गेल्या आठवड्याभरातच समीक्षणही केले आणि माझा काहीही सरळ संबंध नाही या बाबत लंबेचौडे स्पष्टीकरणहि दिले . ज्यांना भीमराव महावीर जोशी पाटील आवडत नाहीत त्यांनी त्या भीमराव महावीर जोशी पाटील कडेच चर्चा करावी .भीमराव महावीर जोशी पाटील यांनी विकिपीडियाचे नियम मोडले असतील असे वाटते त्यांनी त्याची वेगळी चर्चा लावून दाखले द्यावेत आणि त्या खात्याबद्दल मराठी विकिपीडियाची भूमीका ठरवावी.
माझे logic किंवा विचार xyz शी साम्यता आहेत म्हणून अयोग्य आहेत हे म्हणणे रास्त नाही आणि स्विकार्ह नाही. नानु,नानाभाऊ ,Mrwiki reforms कोण आहेत कुणाशी त्यांचे काय संबंध आहेत याचा उत्तर देताना मी विचार करत नाही.सर्च इंजिन सुद्धा वापरत नाही. Mrwiki reforms एखादा विचार कितपत विकिपीडिया च्या मुल्यांशी सुसंगत आहे का माझे विचार काही वेगळे आहेत एवढाच विचार मी करतो पलिकडे करत नाही. मी प्रत्येकातले चांगले घेण्याचा प्रयत्न करतो. उदाहरणार्थ सदस्य मनोजचे घ्या माझ्यावर काय टिका केली त्यांचे आडनाव काय खरे नाव काय अजून काय आयडी आहेत मला काय देणे घेणे त्यांच्या चांगल्या सुचना आमलात आणल्या झाले. दुसरे उदहरण सिझरचे घ्या त्यांचा रंगरूप नाव गाव काही माहित नाही त्यांनी हिंदी विकिपीडियावरून काही तांत्रीक गोष्टी आणल्या चावडीवर विनंती केली . सिझर कोण आहेत नावगाव पत्ता काही एक विचारला नाही . प्रचालक नात्याने त्यांची गोष्ट आमलात आणली. आपण दिलेलेया स्वरूपाच्या कारणांनि सुयोग्य गोष्टींची अमंलबजावणी थांबणार नाही.

>> माहितगार - चले जाव चळवळ

माहितगार - चले जाव चळवळीतील कुणी तरी मराठी विकिपीडियाला भेडसावणाऱ्या ह्या प्रॉब्लेमची गेल्या दहा दिवसात साधी दखल मराठी विकिपीडियनने घेतली आहे का ? आणि म्हणे माहितगार चले जाओ  :)
सत्त्तांतर हा सृष्टीचा नियम आहे . इथे कुणीही कायमचा नाही माहितगार सुद्धा कायमचा नाही ना राहू इच्छितो. दुसरा चांगला माहितगार मराठी विकिपीडियाला मिळाला आहे असे वाटेल तेव्हा माहितगार स्वत:हून रजा घेईल . तुम्हाला तेव्हा चळवळ सुद्धा करावी लागणार नाही. आणि तथ्यहीन चळवळींपुढे माहितगार झुकणारही नाही.माहितगार - चले जाव चळवळीच मी स्वागत करतो आणि सभ्य मार्गांनी तुम्हाला तुमच्या कार्यात यश प्राप्त होवो हि शुभेच्छा देतो . संत ज्ञानेश्वरांनी म्हटलच आहे जो जे वांछील तो ते लाहो.पण सोबतीला हिंदीत एक खुप चांगली म्हण आहे समयसे पहले और मुकद्दरसे जादा कुछ नही मिलता.


माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १२:३६, ३० नोव्हेंबर २०१२ (IST)Reply

नमस्कार माहितगार,

बऱ्याच प्रश्न पुन्हा उपस्थित होउ नये ह्या साठी क्रुपया संतोष दहिवळ यांच्या प्रश्नांना उत्तर द्यावे , तिथे तुम्हाला या बाबत लंबेचौडे स्पष्टीकरण देण्याची गरज सुध्दा नाही.

Mrwiki reforms (चर्चा) १४:५३, ३० नोव्हेंबर २०१२ (IST) >> क्रुपया संतोष दहिवळ यांच्या प्रश्नांना उत्तर द्यावेReply

अगदी होय मी सर्वांशीच चर्चेस उत्सुक आहे .खरेतर माझे सर्व टिकाकारांचे सध्या वाचूनही होत नाही. सध्या प्रश्नकर्ते आणि टिकाकारांची लांबी माझ्या उत्तरांपेक्षा अधिक आहे.कुणीही सुटावे अशी माझी इच्छा नाही. त्या करिता मला कुठे कुठे उत्तरे द्यावयाची शिल्लक आहेत याच्या दुव्यांची यादी माझ्या सदस्य:Mahitgar/माझ्या प्रचालकीय कृतीची समसमीक्षा पानावर करून देण्यास आपले किंवा इतर कुणाचे सहाय्य मिळाल्यास हवे आहे.
प्रश्न विचारण्याच अभिव्यक्ती स्वातंत्र्य (सभ्यता आणि समोरच्या व्यक्तिच्या चारीत्र्याची गोपनीयता अधिकारांचा आदर राखून) प्रश्नकर्त्यास आहे. उत्तराची लांबी काय असावी हा (सभ्यता आणि समोरच्या व्यक्तिच्या चारीत्र्याची गोपनीयता अधिकारांचा आदर राखून) उत्तर देणाऱ्याच्या अभिव्यक्ति स्वातंत्र्याचा प्रश्न आहे.
वस्तुस्थिती हि आहे कि माझ्या लांब उत्तरातून मी भवीष्यातील मार्गदर्शन आणि सहाय्य पानांची व्यवस्था करत असतो. तुम्हाला जेवढे उत्तर घ्यायचे तेवढे घ्या बाकीचे सोडून द्या.
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १८:३५, ३० नोव्हेंबर २०१२ (IST)Reply



Mahitgar संपादन

Mahitgar has mostly contributed in the help pages. I am making my observations only on the basis on his wikipedia editing on various wikipedia projects. This does not cover any offline activity he has done in the past if any as I am not from his city and never came accross with this.

With all this, the Marathi Wikipedia community has to decide whether he should remain as bureaucrat/admin over here or not. I request other respected members to put their valuable comments and feedback over here itself and take the suitable action accordingly.

With this I request all members to join my campain of "Mahitgar - Chale Jao". I also request other members to share their plans to execute the same.

Now in Marathi –

माहितगार यांना बहुतेक सौजन्याची भाषा पचनी पडत नाही असे दिसते. एकंदरीत माहितगार हे विकिपीडिया वरील गोचीड असून सर्व सभासदांचे आणि प्रचालकांचे रक्त शोषून घेवून विकिपीडिया वर महासत्ता गाजवण्याचा त्यांचा प्रयत्न चालू आहे. Maihudon आणि Mvkulkarni23 यांचा त्यांनी पद्धतशीर पणे कट करून काटा काढला आणि आणि त्यापुढे जाऊन कोहीही चर्चापानावर जाऊन त्यांना कोणी सहानभूती दाखवू नये म्हणून ती पाने lock करून टाकली. Mvkulkarni२३ यांनी निरोप घेतल्यापासून काही तासात माहितगार यांनी त्यांचा एक पितत्या सदस्य:Czeror याला प्रचालक पदासाठी पुढे केले आहे. हे म्हणजे मेलेल्या व्यक्तीच्या प्रेतावरील लोणी खाण्याचा प्रकार आहे. मी याचा जाहीररीत्या निषेध करून माहितगार यांची पहिल्यांदा राजीनाम्याची मागणी करतो. मराठी विकिपीडिया वरील जाणते सदस्य सर्व उघड्या डोळ्यांनी पाहत आहेत. त्या सर्वांनी एकसाथ उठून १९४२ साली ज्या प्रकारे बेधुंद इंग्रजांना "चले जाव" केले, तसेच आता माहितगार - चले जाव ही चळवळ चालू करत आहे. मराठी विकिपिडीयावरील सर्व जुने नवे जाणते सदस्य यात सहभागी होवून हे पूर्णत्वाला नेतील अशी मला खात्री आहे.

Ujjwal Nikam (चर्चा) २१:३४, २९ नोव्हेंबर २०१२ (IST)Reply

केम हे करमाळा तालुक्यातील सर्वात मोठे गाव असून त्याची लोकसंख्या १५००० च्या आसपास आहे.

संदर्भ यादी संपादन

सानप संदीप संपादन

साचा:Stub-एक नागरीक संदीप विष्णु सानप (मे १६, इ.स. १९९२; बीड, महाराष्ट्र - हयात) हा मराठी एक नागरीक असून भारतीय एक विद्यार्थी माझे शिक्षण श्री जालिँदर विद्यालय मध्ये झाले.मी कोणी नेता नाही की काही नाही.मला फक्त कविता लिहायला आवडत .तुम्ही म्हणाल येथे फक्त नेत्याची माहीती असते.आपली का नाही देऊ शकत आपण पण हिँन्दुस्थानी आहोत आपल्याला अधिकार आहे.चला देशासाठी काही चागल करुया.

नमस्कार, संदीप
एक नवागत सदस्य या नात्याने आपल्या शंके करता आपण मदतकेंद्र निवडले असते तर बरे झाले असते, कारण मदत केंद्रावरील उपलब्ध केलेल्या सहाय्यावर बेतून पुढे सहाय्य पानांची रचना करणे बरे पडते. असो आपल्या शंकेचे उत्तर खालील प्रमाणे,
विकिपीडिया सर्वसाधारण वेबसाइट नाही. एक ज्ञानकोश आहे.ज्ञानकोशात केवळ नेत्यांसाठी नाही, विश्वकोशीय उल्लेखनीयता असलेल्या कोणत्याही 'अबकड' व्यक्ती अथवा गोष्टीची दखल घेतली जाऊ शकते.पण ज्ञानकोशीय विश्वासार्हता पाळण्याच्या दृष्टीने येथे काही संकेतांचे पालन केले जाते.
  • (काही अपवाद वगळता) सहसा इतर जगाने इतर माध्यमातून एखाद्या व्यक्ती/घटना/गोष्टीची दखल घेऊन झाल्याच्या नंतर त्यातील सुसंबद्ध ज्ञानकोशीय माहिती तेवढी संदर्भासहीत ज्ञानकोश स्विकारत असतात.कोणत्याही विषय नसण्याचे बंधन नाही म्हणून विकिपीडिया मुक्त म्हणविला जातो परंतु ज्ञानकोशीय मर्यादांच्या परिघातच.या बद्दल बरेच संकेत आहेत .आपण सावकाश पणे येथील सर्व संकेतांशी अभ्यस्त होउ शकता.
  • विकिपीडियावर माहितीची विश्वासार्हता जपण्याच्या दृष्टीने स्वत:चे अथवा स्वत:बद्दल लेखन करणे करवून घेणे अभिप्रेत नसते.
  • आपल्या कविता आणि ज्ञानकोशाच्या परिघा बाहेरील इतर गोष्टी जसे की देशा साठी वगैरे करण्यास इंटरनेटवर इतरत्र बऱ्याच सुविधा उपलब्ध आहेत. आपल्या कडून देशा साठी काही चांगले कार्य अवश्य होउ द्या. आपण नेतेच झाले पाहिजे असे नाही कोणत्याही क्षेत्रात नावारूपाला या.इतर लोकांनी स्वत:हून आपली ज्ञानकोशात दखल घ्यावी एवढे मोठे व्हा.त्या करिता आपणास शूभेच्छा.
  • नावारुपाला आणेल हा उद्देश खूप आवश्यक नसेल तर,वर नमुद केल्या प्रमाणे स्वत: विषयीच्या माहितीस खूपसे महत्व देण्याचे टाळले तर आपण विकिपीडियावरील ज्ञानकोशात ज्ञानकोशीय माहितीची भर घालणे हे सुद्धा चांगले कार्यच आहे.हेही लक्षात घेता येइल
पुनश्च आपले मराठी विकिपीडियात स्वागत.
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) ११:३४, २४ मे २०१३ (IST)Reply

लता – एक संगीताभ्यास – २ संपादन

लता – एक संगीताभ्यास – भाग ३ संपादन

टाकणकार समाजातील एक जूनी संस्कृती संपादन


नक्की ज्योतिष शास्र काय आहे? संपादन

जोतिष शास्त्र.

११:१४, ११ ऑगस्ट २०१४ (IST)Sahadevसन्त् आपन् काय् लिहिनार् सन्त् म्हन्जे काय्?

निरगुडी एक औषधी वनस्पती संपादन

निरगुडी या वनस्पतीचा वापर शेतकरी आपल्या शेताच्या बांधावर कुंपण म्हणून करतो. निरगुडी या वनस्पतीमध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत.
औषधी उपयोग :-
१.शरीरावर कोणत्याही भागावर सूज आली असता त्या ठिकाणी निरगुडीच्या पाल्याचा शेक द्यावा.सूज कमी होण्यास मदत होते.
२.ज्यांना संधिवाताचा त्रास आहे असे रुग्ण निरगुडीचा पाला गरम करून त्या भागात लावावा किंवा निरगुडी तेलाने मसाज करावी.
३.ज्यांना लघवी होत नाही अशांनी निरगुडीच्या पाल्याचा काढा करून दिवसात ३-४ वेळा घेतल्यास लघवी व्यवस्थित होते.
४.शरीरावर जखम झाली असता त्यावर निरगुडीचा उबवलेला पाला बांधावा.
५.हाताला व पायाला कुरूप झाले असता त्या कुरुपावर ३-४ दिवस पाला गरम करून बांधल्यास कुरूप मुळापासून निघते.
६.निरगुडीच्या पाल्याचा काढा ताप येणाऱ्या रुग्णाला दिला असता फायदा होतो.
७.निरगुडीच्या पाल्याचा काढा प्याल्याने पचनशक्ती वाढते.
८.कान दुखत असल्यास निरगुडीचे तेल कानात सोडल्यास फायदा होतो.
९.निरगुडी चा पाला+फळ+फुल यांचा ज्यास्त उकळून तयार केलेला काढा नियमित घेतल्यास आरोग्यदायी शरीर ठेवता येते
तसेच दमा,क्षय,खोकला,उलटी अपचन या विकारांपासून मुक्तता मिळते.
१०.हातापायांच्या तक्रारीवर निरगुडीचे तेल लाभदायक आहे.
११. स्रियांना मासिक पाळीचा त्रास असेल तर याचा काढा घेतल्यास त्रास दूर होतो.
--ढवळे सुधीर रामचंद्र १४:२८, ११ नोव्हेंबर २०१४ (IST)

Simon de Beavoir चं The Second Sex या पुस्तका बद्दल काही माहिती मिळू शकते का? मराठी मध्ये -

समजा काळा पैसे चलनात आला नाही तर सरकार काय उपाय योजना करेल ? संपादन

काळ्या पैशामुळे चलन फुगवटा झाला !आता असे समजू हा पैसे चलनातून बाद झाला ! आता चलनात कमी पैसे येईल कारण रोखीने होत असलेले काळ्या पैशाचा व्यवहार थांबेल !त्या मुळे मंदी येईल !आणि स्वस्ताई होईल आणि आणि जर पैसा चलनात आला नाही आणि त्या मुळे काळ्या बाजाराला स्थान मिळेलं का ??? सरकार मंदी घालवण्यासाठी रिझर्व्ह बँकेला नवीन नोटा छापण्यासाठी आणि त्यातून गडकरी जे म्हणता आहेत इन्फ्रास्टक्चर त्या साठी पैसे उपलब्ध केला जाईल त्यातून चलन वाढ होऊन मंदी वर मात करता येईल का ?!आणि मग महागाई वाढीला लागेल कि कमी होईल ?असे होणार असेल तर चलनवाढ करण्याची सरकारला गरज भासेल का ???समजा काळा पैसे चलनात आला नाही तर सरकार काय उपाय योजना करेल ? सरकार चलनी नाणे म्हणून सोने वापरणाऱ्या लोकांना ते किती सोने घरात ठेवू शकतील याबाबत काही कायदा करेल का ??त्याचा परिणाम काळा बाजार करणाऱ्यावर सरकार सोन्याच्या दरावर आणि विक्रीवर बंदी आणेल का ?

शेतकरी कर्जमाफी संपादन

शेतकरी आंदळणाला लागलेले वळण आणि विरोधी पक्षांचा गदारोळ यामुळे महाराष्ट्र सरकारला संपूर्ण कर्जमाफी करणे भाग पडले. माझ्या दृष्टिकोनातून हे अतिशय चुकीचं पाऊल आहे. यातून कुणाचे भले होणार नाही. मात्र महाराष्ट्र राज्याच्या प्रगतीला मात्र खीळ बसेल असं माझे मत आहे. तुम्हाला काय वाटतेय?................--अनिल दातीर (चर्चा) १०:२८, १३ जून २०१७ (IST)Reply