विकिपीडिया:चावडी/जुनी चर्चा २५

(सर्व चावड्यातील बदल | मुख्य चावडीतील अलीकडील बदल | सर्व चावड्या एकत्र पहा)
चावडी विभागवार:

चर्चा
(विपी इतर चर्चा)

इतर विभागात समाविष्ट न होणारे चर्चा विषय नवी चर्चा जोडा | वाचा

वादनिवारण
वादांवर उहापोह करण्यासाठी नवीन विषय जोडा | वाचा

साहाय्य | मदतकेंद्र
नवागतांसाठी मदतकेंद्रनवाप्रश्न जोडा | वाचा

दूतावास
(Embassy)

नवी चर्चा जोडा
(Start new discussion)

प्रचालकांना निवेदन
प्रचालकांना निवेदन देण्यासाठीनिवेदन जोडा | वाचा


प्रचालकांचे मूल्यांकन
प्रचालकांचे कार्य आणि कृतींबद्दल उहापोह करण्यासाठीनवीन विषय जोडा | वाचा


तांत्रिक
तांत्रिक मुद्दयांवर चर्चा.
विपी आज्ञावलीच्या त्रुटी अहवाला साठी बगझीला वापरा.
नवीचर्चा जोडा | वाचा

ध्येय आणि धोरणे
सद्द आणि प्रस्तावित ध्येय आणि धोरणे, नीती-संकेत इत्यादींबाबत चर्चेसाठी नवीचर्चा जोडा | वाचा

प्रगती
मराठी विकिपीडियाच्या प्रगती बाबत चर्चा
नवीचर्चा जोडा | वाचा


सोशल मीडिया
मराठी विकिपीडियाचे सोशल मीडिया बाबत नवीन विषय जोडा | वाचा
चावडी (सुचालन)

स्थापना
___

स्वागत आणि साहाय्य चमू ,आलेले सदस्य,विकिभेट,कळपट हवा,सुलभीकरण,लेख/मजकुराची दखल पात्रता? चर्चा







विकिपीडिया:कौल संपादन

विकिपीडिया:कौल येथे विकिपीडिया शब्दाकरिता शॉर्टकट नामविश्व उपलब्ध करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. फायदा विकिपीडिया नामविश्वात काम करणार्‍या आणि विकिपीडिया प्रकल्पात आणि सहाय्य देणार्‍या व्यक्तिंचा वेळ वाचवणे.
मराठी विकिपीडिया सदस्यांच्या सहमती नंतर, प्रस्ताव (बहूधा) बगझीला वर मांडावा लागेल
माहितगार १४:१४, १ जानेवारी २०१० (UTC)

सहमत. वि. नरसीकर (चर्चा) १४:३०, १ जानेवारी २०१० (UTC)

नवीन प्रचालक संपादन

माहितगार हे आता मराठी विकिपीडियावरील प्रचालक आहेत. माहितगार, अभिनंदन आणि वाढीव जबाबदारी यशस्वीरीत्या सांभाळण्यासाठी शुभेच्छा.

अभय नातू २०:३७, १ जानेवारी २०१० (UTC)

माहीतगारांचे अभिनंदन! प्रचालकपदाच्या नव्या भूमिकेसाठी शुभेच्छा!
--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) ०२:१३, ३ जानेवारी २०१० (UTC)

मराठी विकिपीडियाच्या समावेशक स्वरुपाची अभिवृद्धी संपादन

मराठी विकिपिडीयाचे नियंत्रण अलिकडच्या काळात एक-दोन सदस्यांकडेच एकवटल्याचे माझे अल्पावधीतच मत बनले आहे. विकिपीडियाच्या अभिवृद्धीच्या दृष्टीने हे योग्य नाही. माझे मत चुकीचे असल्यास, कसे, ते कृपया येथे स्पष्ट करावे. ते बरोबर असल्यास मराठी विकिपिडियाच्या नियंत्रणात अधिक मंडळींचा समावेश कसा करता येईल, याविषयी कृपया येथे मते मांडावीत. यात विकिपिडीयाच्या अभिवृद्धीसाठी सातत्याने सर्वाधिक कष्टणारे बाजूला पडू नयेत त्याचबरोबर नवे ताजे सदस्यही जे विषयात वैविध्य, मजकूरात दर्जा आणि विशेषकरून भाषेत तरूणपणा, ताजेपणा आणू शकतील त्यांना संचालनाचा प्रोत्साहक मंच मिळायला हवा, असे वाटते. विकीपिडियाच्या चौकटीत हे कसे करता येईल, ते सुचवावे - मनोज ००:४४, १२ मार्च २०१० (UTC)

येथे सर्व लोकशाही पद्धतीनेच चालले आहे. जर तुम्हाला एखादी गोष्ट खटकत असेल तर ती प्रकाशात आणा आणि त्यावर चर्चा व बदल घडवून आणा. येथे योगदान करणारी जर ४-५ च मंडळी असतील तर त्यांच्या मतांनुसारच गोष्टी झालेल्या दिसतील. जे योगदान करत नाहीत त्यांच्या मताने कशा गोष्टी होतील? - कोल्हापुरी ०४:३२, १२ मार्च २०१० (UTC)
मी कोल्हापुरीच्या मताशी सहमत आहे. अल्पावधीत बनवलेले मत कधीकधी वस्तुस्थितीला धरून नसत. विकिपीडियावर प्रत्येकाला मत मांडण्याचा अधिकार आहे. मनोजने ज्या १-२ सदस्यांचा उल्लेख केला आहे ते नेहमीच विषयात वैविध्य, पारदर्शकता आणण्या साठी व नविन सदस्यांना प्रोत्साहन देण्यासाठी गेल्या अनेक वर्षां पासुन विकि वर काम करता आहेत. माहितीगारने मनोजला दिलेला मदतीचा हात , नविन सदस्याला प्रोत्साहन देण्यासाठीच होता. मनोजची लोकशाहीची व्याख्या इतरां पेक्षा वेगळी दिसते.
Maihudon ०६:२५, १२ मार्च २०१० (UTC)

मला नम्रपणे सुचवावेसे वाटते की अलिकडील काळात मराठी विकिपीडियाचे नियंत्रण नव्हे, तर योगदानच १-२ सदस्यांनी एकवटलेले आहे. सर्वाधिक संपादने करणार्‍या पहिल्या २ सदस्यांनी (सांगकामे सोडल्यास) ५०%पेक्षा जास्त योगदान दिलेले आहे, तरी वरील मत होणे साहजिकच आहे. येथील प्रबंधक शक्यतोवर आपले अधिकार एखाद्याची मते (लेखांतील) खोडून काढण्यासाठी वापरत नाहीत. चर्चा व चावडीवर खडाजांगी झाली असली तरी लेखांचे पावित्र्य (!) कधीही भ्रष्ट झालेले नाही. आत्तापर्यंत एकाही प्रबंधकाने आगळीक केले असल्याचे मला तरी आढळलेले नाही. जर अशी उदाहरणे दिली तर त्यांबद्दल काही करता येईल.

अभय नातू ०६:४४, १२ मार्च २०१० (UTC)


आपण काही करू नका. स्वस्थ बसा, निरर्थक वाद उत्पन्न करून इतरांची उर्जा वाया घालवू नका हीच विनंती. कमीतकमी वेळेत जास्तीत जास्त योगदान देण्याची नोंदवण्याची सोप्पी आयडिया इतरांना कळण्यासाठी लवकरच पाहा माझे पान. मक्तेदारी मोडण्यासाठी हे त्या एकदोन जणांखेरीज इतरानी करावेच असे मी सुचवतो - मनोज १९:५३, १२ मार्च २०१० (UTC)

पुन्हा वैयक्तिक पातळीवर उतरलात. तुम्हालाही सांगतो --निरर्थक वाद उत्पन्न करून इतरांची उर्जा वाया घालवू नका हीच विनंती. मक्तेदारी येथे कोणाची व कशी आहे हे दोन-चार उदाहरणांत दाखवाल अशी आशा आहे.
असो. वाद वाढवू नये ही इच्छा माझीही आहे. मुद्याला धरुन बोललात तर काही निष्पन्न होईल. लोकशाही कशी नाही हे सांगा. नुसतेच नाही! नाही! असे ओरडून कसे कळायचे काय बदलायला पाहिजे ते?
अभय नातू २०:३७, १२ मार्च २०१० (UTC)
माफ करा , प्रथमतः हे लक्षात घ्याकी विकिपीडिया समूदाय सहसा सहमतीने चालतो ,पण तो ज्ञानकोश आहे आणि ज्ञानाची विश्वासार्हता आणि योग्यता यांचेमूल्य लोकशाहीच्यामूल्यापेक्षा अधीक ठरते त्यामूळे विकिपीडिया ही लोकशाही नव्हे. विकिपीडिया:परिचय येथे अधीक माहिती वाचावी.माहितगार ०४:१५, १३ मार्च २०१० (UTC)
माहितीबद्दल आणि दुव्याबद्दल धन्यवाद,माहितगार. या चर्चेच्या शीर्षकातही आनुषांगिक बदल करतो आहे. आपण दिलेल्या दुव्याच्या पानाला प्रोसिज्युरल पॉलिसी डॉक्युमेंटसारखे वर्गीकृत करून सामान्य संपादनापासून दूर ठेवणे हे करता येईल का ? आणखी, नवीन सदस्य पहिल्यांदा लॉगइन होतो त्याच्यापुढे होमपेजऐवजी तेच पान उघडले जाईल (किमान फक्त पहिल्या वेळी तरी), अशी तांत्रिक व्यवस्था करता येईल असे सुचवावेसे वाटते. -मनोज १०:२९, १३ मार्च २०१० (UTC)

सदस्यपान संपादन

सदस्य:Shivashree हे पान कृपया बघावे. विकिपीडिया सारख्या पानाची प्रत करुन ती वापरणे हे मला तरी वैयक्तिकरित्या योग्य वाटत नाही.

वि. नरसीकर (चर्चा) ०४:१३, ५ जानेवारी २०१० (UTC)

मलातरी यात काही गैर वाटत नाही, तरीही इतर सदस्यांचेही तसे मत असेल तर त्या पानावर बदल करण्यात माझी काही हरकत नाही. गणेश धामोडकर ०५:०८, ५ जानेवारी २०१० (UTC)
यात काहीही गैर नाही. विकिपीडियावरील मजकूर साचे वगैरे GNU परवान्याखाली आहेत त्यातील सोयी आणि अटींनुसार ते परत वापरले जाऊ शकतात - कोल्हापुरी ०६:१४, ५ जानेवारी २०१० (UTC)

पान पाहिले.असे काही करता येते हे पाहून मला उलट आनंद वाटला. आपल्याच पानावर असे नवे काही पहायला बरे वाटते. सॅंडबॉक्सपेक्षा स्वतःच्या पानावर हे प्रयोग करून पाहता येतात हाही फायदा आहे. उलट अशा अनेकविध कल्पना आपापल्या पानावर राबवायला प्रोत्साहन द्यायला हवे. कदाचित त्यातूनच उद्याच्या परवाच्या आणि तेरवाच्याही विकीडिझाईन कल्पना पुढे येऊ शकतील. - मनोज ०४:४०, १४ मार्च २०१० (UTC)

प्रकल्पःबावन्नकशी २०१० संपादन

प्रकल्पःबावन्नकशी २०१० या विकिप्रकल्पाविषयी आपली मते, सुचना, दुरुस्त्या हव्या आहेत. गणेश धामोडकर ०५:१७, ५ जानेवारी २०१० (UTC)

ही संकल्पना चांगली आहे आणि योगायोगाने चावडीवरच वर नोंदवलेल्या विकिपीडिया:चावडी#आठवड्याचा उदयोन्मुख लेख या संकल्पनेशी समांतर वाटत आहे. या दोन्ही संकल्पनांच्या स्वरूपातील मिश्रणातून मुखपृष्ठावर झळकवण्यास उदयोन्मुख लेख विकसवता येतील, असे मला वाटते. आपले काय मत?
--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) १५:०४, ५ जानेवारी २०१० (UTC)

शब्द उपयोगाबद्दल सहमती हवी संपादन

विकिमित्रहो,

विकिपीडिया नामविश्वातील दोन सहाय्य पानांच्या नावावर वेगेवेगळ्या व्यक्तिंनी आक्षेप घेतले गेले पण पर्यायी नावे कुणीही आज तागायत सुचवली नाहीत. एक म्हणजे विकिपीडिया:निर्वाह आणि दुसरे म्हणजे विकिपीडिया:सफर. निर्वाह आणि सफर शब्दांची ढब हिंदी आहे असा सूर असावा असे वाटते. पर्यायी शब्दांवर लौकरात लौकर सहमती न झाल्यास, संबधीत पाना संदर्भातील पुढील बदलांवर तसेच काम करावयास लागेल असे वाटते.

माहितगार ०७:१०, ५ जानेवारी २०१० (UTC)
मुळात या दोन्ही पानांमागची संकल्पना नेमकेपणाने व्यक्त करणारे इंग्लिश शब्द काय आहेत, ते सांगितलेत तर मराठीतले चपखल शब्द सुचवणे सोपे होईल.
--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) १४:५६, ५ जानेवारी २०१० (UTC)
विकिपीडिया:निर्वाह -> Maintenance and updation of various special pages (मुखपृष्ठ, दिनविशेष, मासीक सदर इत्यादी)
विकिपीडिया:सफर -> A small "How to browse" through Wikipedia guide for new comers.
- कोल्हापुरी ०४:३९, ६ जानेवारी २०१० (UTC)


माझा विचारः

विकिपीडिया:निर्वाह-> निर्वाह हा शब्द ठिक आहे.(उदरनिर्वाह असे आपण म्हणतोच ना) तसे Maintenance ला 'सुचालन' असा शब्द आहे. updation म्हणजे 'अद्ययावत' करणे पण यापैकी सुचालन हा शब्द कुठेतरी वापरण्यात आल्याचे स्मरते. अद्ययावत हा शब्द बराच बोजड वाटतो.नुसता 'चालन' हा शब्द वापरला तर?
विकिपीडिया:सफर-> यास 'भटकंती' हा शब्द ठिक राहील असे मला वाटते.
विकिपीडिया:सफर-> "तोंड ओळख" हा शब्द ठिक राहील असे मला वाटते.
तोंड ओळख करून देणारा विकिपीडिया:परिचय हा स्वतंत्र लेख उपलब्ध आहेच. येथे तोंड ओळख हा शब्द कितपत चपखल आहे याची शंका वाटते.माहितगार ०६:२१, २६ फेब्रुवारी २०१० (UTC)


वि. नरसीकर (चर्चा) ११:४३, ६ जानेवारी २०१० (UTC)

गुजराण? निभाव? सांभाळ? सांभाळ आणि निभाव? मला वाटते सां आणि नि हा शासकीय शब्द आहे.
भटकंती
अभय नातू २३:५६, ७ जानेवारी २०१० (UTC)
सफ़र हा शब्द मुळात अरबी असला तरी तो मराठीत शंभर वर्षेतरी वापरात आहे. सिंदबादच्या सात सफ़री हे पुस्तक निदान ६०-७० वर्षांपूर्वीचे असावे. त्यामुळे विकिपीडिया:सफ़र हे नाव असायला काहीही हरकत नाही.
मेन्टेनन्ससाठी देखभाल या शब्दाइतका चांगला शब्द नाही. देखभालमध्ये पालनपोषण असा अर्थ अभिप्रेत आहे. म्हणजे (अद्ययावतीकरण)उन्नतीकरणसुद्धा अंतर्भूत आहे. भटकंती म्हणजे सर्फ़िंग म्हणजेच मुशाफ़िरी. ब्राउझरकरिता न्याहाळक हा शब्द आधीच रूढ आहे. निर्वाह हा शब्द मराठी असला तरी, निर्वाहचे किंवा उदरनिर्वाहचे गुज़राण, (कसेबसे?) पोट भरणे, असे अर्थ असल्याने योग्य नाही.--J १७:३६, २९ जानेवारी २०१० (UTC) .
(कसेबसे?) अर्थछटा नको आहे पण 'किमान आवश्यक (कमीतकमी एवढे)' हि अर्थ छटा हवी आहे.देखभाल शब्दाची अर्थछटा योग्य होईल काय ? जे म्हणतात तसे निर्वाह शब्द कसेबसे हि अर्थछाटा व्यक्त करतो काय? निर्वाह शब्द वापरलेल्या वाक्यांची इंटरनेटवरील आणि इतरत्र वापरलेली उदाहरणांच्या सहाय्याने आपले मत व्यक्त करा (अजूनही उदाहरणे वाक्यात उअपयोगाचे संदर्भ देऊ शकता) माहितगार ०६:१८, २६ फेब्रुवारी २०१० (UTC)
  • देह चालतां विषय त्यागी| ऐसा कोण आहे जगीं |
याचा निर्वाह मजलागीं| देवें निरोपावा ||६|| -दासबोध
    • इकडे सत्य मानिला देह । तिकडे दृश्य सत्य हा निर्वाह । दोंहींमध्यें हा संदेह । पैसावला बळें ॥ ४२॥-दासबोध
  • मासेमारी आणि संबधित उद्योगांवर भारतातील ६० लाख लोकांचा निर्वाह चालतो
  • मिथ्या ज्ञानावरच त्यांचा व्यवहार आणि निर्वाह चालतो.
  • बँका आणि पोस्टाच्या माध्यमातून भारत सरकारच्या नियमांनुसार अजून एक सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी चालतो. तीच ' पीपीएफ ' ची योजना आहे.
  • आणि त्यांना भविष्य निर्वाह निधी योजनेत सहभागी होता येणार नाही',
  • म्हणजे असे की भारतातील लोकसंख्येत निव्वळ पुजारी नक्की किती आहेत / किती जणांचा निर्वाह केवळ पुजारीपणावर चालतो याची आकडेवारी मिळायला हवी).
  • . लोकं आपलं आयुष्य सुखाने जगत आहेतआणि त्यांचा उदर-निर्वाह सुद्धा व्यवस्थित चालू आहे.
  • “गेल्या साठ वर्षाचं माझं जीवन- किंवा एकप्रकारची विस्फोटक स्थिती म्हटलं तरी चालेल- पाहिल्यास ज्या प्रकारे माझा निर्वाह व्हायचा आणि कधी कधी उन्नति पण व्हायची त्याचं मुख्य कारण मी नेहमीच नव्या वास्तविकतेला-realityला- तोंड देताना मन कुठच्याही विचारापासून मुक्त ठेवायचो.
  • वनवासी निसर्गाशी तादात्म्य राखून आपला निर्वाह करतात,
  • फक्त शेतीवर उदर निर्वाह करणाऱ्या कुटुंबांनी काय खावे आणि कसे जगावे?
  • अपंगांना मासिक दोन हजार रुपये निर्वाह भत्ता मिळावा, आदी मागण्यांचा समावेश आहे
  • ब्रह्मचार्याने एकाचेच अन्न नित्य खाऊ नये, तर भिक्षेवर निर्वाह करावा

‍*दर्शादि दिवशीं करुं नयेत; कारण भर्त्याचे श्राद्धानेंच निर्वाह होतो, असें वचन आहे.

  • हिंदू दत्तक व निर्वाह कायदा १९५६
  • स्वामींचे अगत्या आहेच, बहुंत काय लिहीणे, उत्तम निर्वाह जाणावा. विज्ञापना ।

राजसे लेखनावधी ।

समसमीक्षण संपादन

'समसमिक्षण' करणे म्हणजे नेमके काय काय करणे? वि. नरसीकर (चर्चा) १३:३८, ६ जानेवारी २०१० (UTC)

Peer Review.
विकिपीडिया:प्रकल्प बावन्नकशी २०१०/समसमीक्षा येथे अधिक माहिती आहे.
अभय नातू २३:५६, ७ जानेवारी २०१० (UTC)

आठवणीतली गाणी संपादन

Aathavanitli.gani ( योगदान) यांनी जो संपादनाचा धडाका लावला आहे त्यात मुख्यत: आठवणीतली गाणीया संकेतस्थळाचा दुवा प्रत्येक लेखाला जोडणे हाच त्यांचा उद्देश दिसून येतो. याकडे लक्ष द्यावे. गणेश धामोडकर १०:३९, ७ जानेवारी २०१० (UTC)


उ. आठवणीतली गाणी संपादन

Aathavanitli.gani: माझा विचारः

मी हे प्रथमच करत असल्याने मला कल्पना नाही की उत्तर देण्याची ही जागा आणि पद्धत योग्य आहे की नाही. www.aathavanitli-gani.com हे संकेतस्थळ मी गेली सहा वर्षे दुबई येथून चालवत आहे. त्यात कुठलाही 'व्यावसायीक' दृष्टीकोण नाही. एकच उद्देश आहे, जो मराठी Wikipedia चा पण आहे - 'मराठी साहीत्याचे पर्यायाने मराठी गाण्यांचेही संरक्षण आणि संवर्धन'. यात माझ्या व्यक्तिगत नावाने मी काहीही करत नाही. असा विचार केल्यास कवी, गीतकार, संगीतकार, गायक, नाटक इ. व्यक्तींच्या पानांवर त्यांच्या 'आठवणीतली गाणी' व‍र असलेल्या गाण्यांची link - बाह्य दुवा टाकल्याने त्या व्यक्तीबद्दलची माहिती अधिक पूर्णत्वाला येते, असे मला विनम्रपणाने म्हणावेसे वाटते. तरी आपल्या योग्य सल्ल्याने मी पुढील कृती करेन. सदस्य:Aathavanitli.gani, १६.५१, ७ जानेवारी २०१०

  • श्री. गणेश धामोडकर यांनी घेतलेल्या आक्षेपासंबंधी:

मी हे प्रथमच करत असल्याने मला कल्पना नाही की उत्तर देण्याची ही जागा आणि पद्धत योग्य आहे की नाही. www.aathavanitli-gani.com हे संकेतस्थळ मी गेली सहा वर्षे दुबई येथून चालवत आहे. त्यात कुठलाही 'व्यावसायीक' दृष्टीकोण नाही. एकच उद्देश आहे, जो मराठी Wikipedia चा पण आहे - 'मराठीचे पर्यायाने मराठी साहीत्याचे, मराठी गाण्यांचेही संरक्षण आणि संवर्धन'. यात माझ्या व्यक्तिगत नावाने मी काहीही करत नाही. असा विचार केल्यास कवी, गीतकार, संगीतकार, गायक, नाटक इ. पानांवर त्यांच्या 'आठवणीतली गाणी' व‍र असलेल्या गाण्यांची बाह्य दुवा (link) टाकल्याने त्या व्यक्तीबद्दलची माहिती अधिक पूर्णत्वाला येते, असे मला विनम्रपणाने म्हणावेसे वाटते. तरी आपल्या योग्य सल्ल्याने मी पुढील कृती करेन.


धन्यवाद!
माझे सदस्य नाव/टोपण नाव:
Aathavanitli.gani १३:१३, ७ जानेवारी २०१० (UTC)~~

मत संपादन

जोवर विकिपीडियावरील लेखांमध्ये मूळ विषयाला पूरक अशी माहिती पुरवणार्‍या बाह्य पानांचे दुवे जोडले जातात; तोवर अशा संपादनांवर जाहिरातबाजीचा आक्षेप घेता येणार नाही, असे मला वाटते.
--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) २३:३३, ७ जानेवारी २०१० (UTC)

संदर्भ म्हणून बाह्य दुवे देण्यास काहीच हरकत नाही, पण त्या संकेतस्थळांवर प्रताधिकारभंग होत असेल (किंवा इतर कोणतीही कायदेबाह्य कृती होत असेल) तर ते दुवे येथे देऊ नये. अर्थात, याचा अर्थ असा नाही की जोपर्यंत कायदेशीर असल्याचे certificate नाही तोपर्यंत दुवा देत नाही...इतकाच की तुम्हाला पक्के माहिती असेल की संकेतस्थळावर काहीतरी गडबड चालते तर तो दुवा देऊ नये.
अभय नातू २३:५१, ७ जानेवारी २०१० (UTC)

मुखपृष्ठ सदर : उदयोन्मुख लेख संपादन

नमस्कार मंडळी! चावडीवर मागे घडलेल्या या चर्चेनुसार मुखपृष्ठावर 'उदयोन्मुख लेख' नावाचे एक नवे सदर चालवण्यास आपण आरंभत आहोत. साधारणतः २५० शब्दसंख्या असलेले मध्यम / लघु-मध्यम आकारमानाचे, परंतु दर्जेदार लेख प्रकाशात यावेत व त्यांकडे लक्ष वेधल्यामुळे मुखपृष्ठावर येणार्‍या वाचकांकडून व सक्रिय विकिकर सदस्यांकडून त्यांमध्ये आणखी भर पडावी असे या सदराचे उद्दिष्ट आहे. या उपक्रमातून मराठी विकिपीडियावर आशयघन लेखांची संख्या व दर्जा वाढता राहण्यास हातभार लागेल (समांतर उद्दिष्टासाठी योजलेला विकिपीडिया:प्रकल्प बावन्नकशी २०१० हा प्रकल्प व उदयोन्मुख लेख हे सदर, हे दोन्ही उपक्रम परस्परपूरक ठरतील). हे सदर आरंभी साप्ताहिक पद्धतीने चालवण्याचा बेत आहे. मुखपृष्ठ सदराच्या नामनिर्देशन-कौल प्रक्रियेनुसार उदयोन्मुख लेखांसाठीही नामनिर्देशने सुचवण्यात येतील व कौल घेऊन सुचवलेल्या लेखांपैकी एक लेख दर आठवड्यास मुखपृष्ठावर झळकेल.

येत्या २७ फेब्रुवारीस 'जागतिक मराठी दिन' पाळला जाणार आहे. त्या निमित्ताने 'उदयोन्मुख लेख' हे सदर २७ फेब्रुवारीपासून सुरू करण्याचा मानस आहे. त्या दृष्टीने विकिपीडिया:उदयोन्मुख लेख नामनिर्देशन येथे उमेदवार लेखांसाठी नामनिर्देशने करावीत. 'उदयोन्मुख लेख' म्हणून नामनिर्देशन सुचवलेला उमेदवार लेख विकिपीडिया:उदयोन्मुख लेख पात्रता निकष येथे नोंदवलेल्या निकषांच्या कसोटीवर उतरणे अपेक्षित आहे.

सक्रिय विकिकर सदस्यांनी या उपक्रमास उत्साही प्रतिसाद द्यावा, अशी मराठी विकिपीडियातर्फे सस्नेह विनंती!

धन्यवाद,
--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) ११:३३, ३१ जानेवारी २०१० (UTC)

नवीन प्रकल्पाचा प्रस्ताव संपादन

खाली दिलेल्या लेख वर्गांवर अवलंबून प्रकल्प आणि दालन बनवण्याचा विचार आहे. यातील मुख्य वर्ग धर्म हाच आहे तेव्हा प्रकल्पाचे आणि दालनाचे नाव धर्म ठेवावे (जे अधिक लोकप्रिय असण्याची शक्यता आहे) कि विश्वास हे अधिक बुद्धीप्रामाण्यवादी नाव द्यावे.माहितगार ०५:४३, १० फेब्रुवारी २०१० (UTC)

विश्वास
श्रद्धाधर्महिंदू धर्मइस्लाम धर्मख्रिश्चन धर्मरोमन धर्मबौद्ध धर्मजैन धर्मज्यू धर्मदेवी-देवता

पराश्रद्धाफलज्योतिष

अश्रद्धानास्तिकता

धर्म बरोबर वाटते. विश्वासपेक्षा श्रद्धा जास्त चपखल बसेल.
अभय नातू २१:०८, १० फेब्रुवारी २०१० (UTC)


धर्मश्रद्धा, धार्मिक श्रद्धा किंवा (फक्त) धर्म हीच नावे योग्य वाटतात. विश्वास/श्रद्धा अजिबात योग्य नाहीत. कॉन्फिडन्स हाही 'विश्वास'चा एक अर्थ होतो. आणि श्रद्धा म्हणजे बिलीफ. 'धर्म'ऐवजी उपासनापंथ चालेल. पण मग त्यांत फलज्योतिष येणार नाही. त्याचा समावेश (अवैज्ञानिक)शास्त्र अशा वर्गात करता येईल.--J १९:१४, २१ फेब्रुवारी २०१० (UTC)


विश्वास आहे आणि श्रद्धा आहे ; विश्वास आहे पण श्रद्धा नाही , श्रद्धा आहे पण विश्वास नाही ,विश्वासही नाही आणि श्रद्धाही नाही, माझा बुद्धीप्रामाण्यवादावर विश्वास आहे पण श्र्द्धा नाही,
विश्वास या शब्दाच्या इतर अर्थछटा कोणत्या ? आणि वरील संदर्भात अपेक्षीत अर्थछटा कोणती ? माहितगार ०७:४०, २५ फेब्रुवारी २०१० (UTC)

safety मराठी शब्द सुचवा संपादन

Security आणि safety या एक सारख्या भासणार्‍या संकल्पनांना आपण मराठीत ढोबळपणे सुरक्षीतता हा एकच शब्द वापरतो पण सुरक्षा हा शब्द securityच्या अधिक जवळ वाटतो, नाही म्हणावयास safety शब्दास कल्याण, क्षेम, कुशल, शुभ, मंगल, खुशाली असे सगळे शब्द असूनही safety विषयाबद्दल विकिपीडिया लेख लिहिण्याकरिता अर्थछटेत ह्या शब्दांमध्ये चपखलता वाटत नाही आहे.मला safety आणि safety equipments असे दोन लेख लिहावयाचे आहेत . Security आणि safety चा फरक खाली नमुद करत आहे. safety आणि safety equipments [मराठी शब्द सुचवा] करिता अधिक चपखल शब्द कोणते वापरावेत या बद्दल प्रतिसाद् हवा आहे.माहितगार १३:३०, १५ फेब्रुवारी २०१० (UTC)

  • safety and security मधील फरक?
Safety is rather protection against accidental events; security is rather protection against intentional damages.
उदाहरण:

1) In the case of a hurricane a place is safe because nothing can happen to you there; in the case of a bank the place is secure because it is protected against unautorizad access.

2) A path can be safe because there is no risk of landslides, etc.; a path in Afghanistan can be secured because there is enough military surveillance protecting you from an ambush

3) Safety First! (this means that you have to make sure no accidents can happen). Security First (this means you have to make sure no ill-intentioned action ca occur. [१]

  1. ^ Google's cache of wiki.answers.com It is a snapshot of the page as it appeared on 15 Feb 2010 07:37:33 GMT.


सेफ्टी या लेखाच्या भाषांतरअत सहभागी होण्याकरिता आवाहन करित आहे.माहितगार १३:४५, १५ फेब्रुवारी २०१० (UTC)
योग्य(?) शब्द
सेफ=सुरक्षित, सुखरूप. सेफ्टी=सुरक्षितता. परंतु, सेफ्टी लॅम्प=संरक्षक दिवा. सेफ्टी पिन= सुरक्षित पिन. सेफगार्ड=खबरदारी.
सेफ ऍन्ड साउन्ड=सुखरूप. सिक्युअरली=सुरक्षितपणे. सिक्युरिटीज=कर्जरोखे. सिक्युरिटी=सुरक्षा. सिक्युरिटी काउन्सिल=सुरक्षा परिषद.
सिक्युरिटी डिपॉझिट=सुरक्षा ठेव. सिक्युरिटी बॉन्ड=प्रतिभूति बंधपत्र. सिक्युअर्ड=सुरक्षित(असलेला/केलेला). डिफेन्स=संरक्षण/बचाव. डिफेन्स फोर्सेस=संरक्षक फौजा. डिफेन्डन्ट=प्रतिवादी. प्रोटेक्टेड=संरक्षित. वगैरे.-J १८:४८, २१ फेब्रुवारी २०१० (UTC).

दाक्षिणात्य शब्द देवनागरीत लिहिताना नेहमी होणार्‍या चुका संपादन

अन्यत्र प्रसिद्ध झालेल्या या नावाच्या लेखातली भाषा (विशेषतः मी, व्यवस्थापक महोदय वगैरे शब्द) विकिपीडियायोग्य आहे?--J १०:४७, २३ फेब्रुवारी २०१० (UTC)

J तुमच म्हणण बरोबर आहे.Prasannakumar यांनी मराठी विकिपीडियात पूर्वी सुद्धा लेखन केले आहे. विकिपीडीया लेखन शैलीचा त्यांना अगदीच अंदाजा नाही असे नाही. त्यामुळे मी त्यांच्या लेखनसातत्यात लगेच व्यत्यय नको म्हणून अविश्वकोशिय भागाचा मुद्यास लगेच हात घातला नाही. आपण म्हणता तसे त्यातील काही भाग लेखाच्या चर्चा पानावर काही शुद्धलेखन विषयक सहाय्य पानांवर हलवावा लागेल. मी कोश विषयक चर्चा सत्रातही मांडल्या प्रमाणे; मुलतः अविश्वकोषिय वाङमय लिहिण्याची सवय असलेल्या व्यक्तिंना त्यांच्या लेखन प्रेरणेत बाधा न येता, मराठी विकिपीडियाकरिता लेखन करताना विश्वकोशिय परिघात लेखन शैलीकडे कसे वळवता येईल या बद्दल सहाय्य पर लेखनाची नितांत आवश्यकता आहे.माहितगार १४:४०, २३ फेब्रुवारी २०१० (UTC)

स्थानांतरण संपादन

विकिपीडियावर नवीन तयार केले जाणारे अनेक लेख प्रबंधकांद्वारे स्थानांतरित केले जातात. अनेक पौर्वात्य व पश्चिमात्य शब्दांचे मराठीकरण "Highly subjective" आहे. त्यामूळे हे स्थानांतरण किती वेळा योग्य आहे हे वादातीत आहे. पण त्याच बरोबर लेखाचे स्थानांतरण केल्यानंतर त्यालेखाचे वर्णन सुद्धा बदलणे आवश्यक आहे. उदा. चेंगदू, कॉर्पस क्रिस्टी हे दोन लेख मुळच्या नावापासून स्थानांतरित केले गेले आहेत पण लेखातील माहिती मात्र बदलली गेलेली नाही. I think whoever moves articles should make sure these changes are reflected in the actual article also, not just the title.
अभिजीत साठे १२:२१, २४ फेब्रुवारी २०१० (UTC)

मूळ शीर्षक निराळ्या शीर्षकाने हलवले जात असताना त्यातील मजकूरदेखील बदलला जावा, हे आपले म्हणणे रास्त आहे. परंतु पौर्वात्य शब्दांचे मराठीकरण 'सापेक्ष' असल्याचे म्हणणे तितकेसे पटत नाही; कारण चिनी संज्ञांसाठी अधिकृत रोमनीकरणाची पद्धत - अर्थात Pinyin - उच्चार समजायला बर्‍याच अंशी उपयोगी पडते.
--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) ०१:५५, २५ फेब्रुवारी २०१० (UTC)

मराठी भाषा दिवस आणि मुखपृष्ठ संपादन

नमस्कार मंडळी!
आज २७ फेब्रुवारी हा दिवस मराठी भाषा दिवस म्हणून जागतिक पातळीवर पाळला जातो. त्यानिमित्त सर्व मराठीभाषिकांचे व मराठी विकिकरांचे अभीष्टचिंतन! :)
आजच्या दिवसाचे औचित्य साधून मराठी विकिपीडियावरील उगवत्या व आश्वासक दर्जाच्या लेखांना प्रकाशझोतात आणण्यासाठी मुखपृष्ठावर उदयोन्मुख लेख हे नवीन सदर चालू करण्यात आले आहे. हे सदर सध्य दर आठवड्यास शनिवारी बदलण्याचे नियोजन असून आगामी आठवड्यांसाठी लेखांची निवड करायला विकिपीडिया:उदयोन्मुख लेख नामनिर्देशन येथे नामनिर्देशने व मते मांडण्याची व्यवस्था योजली आहे. मराठी विकिकरांनी या उपक्रमास भरघोस पाठबळ द्यावे, अशी सादर विनंती आहे.

--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) ०८:४६, २७ फेब्रुवारी २०१० (UTC)

मुखपृष्ट पुनर्रचना संपादन

पुनर्रचित मुखपृष्ठ छान दिसत आहे. जागेचा अधिक चांगला उपयोग होण्यासाठी दोन छोटे बदल केले आहेत.

अभय नातू २१:२९, २७ फेब्रुवारी २०१० (UTC)

जागतीक मराठी भाषा दिवस चिरायु होवो. संपादन

सर्व मराठी प्रेमी वाचक लेखक विकिकरांना जागतीक मराठी दिवसाच्या अनेक शुभेच्छा . मराठी विकिपीडियाच्या माध्यमातून विकिपीडियाची त्यावरील सर्व विकिकरांची तसेच मराठी भाषा ,मराठी संस्कृती आणि मराठी माणूस ह्यांची अशीच उत्तरोत्तर प्रगती होवो हिच ईच्छा.वर उल्लेख केलेल्या "उदयोन्मुख लेख" ह्या अभिनव उपक्रमास भरघोस प्रतिसाद मिळो हि सदिच्छा.

  • माझे मत शंका सूचना सहाय्य विनंती:
वाय्केपिद्य्याच्हि सन्कल्पना भन्नात् आहे

आज् माझे नविन् जग् सुरु झाले

  1. ...
  2. ...





धन्यवाद!
माझे सदस्य नाव/टोपण नाव:
Shyamyande १३:२७, ६ मार्च २०१० (UTC)~~

५ लाख संपादने संपादन

आज (मार्च १६, २०१०, भाप्रवे) मराठी विकिपीडियावर ५ लाखावे संपादन झाले. Arthurbot या सांगकाम्याने मॅसेच्युसेट्स लेखात आंतरविकि दुवा घालताना हा पल्ला गाठला. ५ लाखावे संपादन

ही पाच लाख संपादने होण्यास जवळपास ५ वर्षे (जास्त?) लागली. पुढील ५ लाखास इतका वेळ लागू नये ही आशा.

अभय नातू ०३:३७, १६ मार्च २०१० (UTC) आहो नातू', नववर्षाभिनंदन मराठी विकिपीडियाची गुढी अशीच उंची गाठो हि सदिच्छा आणि त्या साठी अनेक शुभेच्छा. Prasannakumar ०५:०९, १६ मार्च २०१० (UTC)

सर्वांचे अभिनंदन
मराठी विकिपीडियाची स्थापना १ मे २००३ ला झाली. अजून साधारणतः दिड महीन्याने मराठी विकिपीडिया १ मे २०१० ला सातवर्षे पूर्ण करेल माहितगार ०७:४९, २१ मार्च २०१० (UTC)