विकिपीडिया:चावडी/जुनी चर्चा १०


(सर्व चावड्यातील बदल | मुख्य चावडीतील अलीकडील बदल | सर्व चावड्या एकत्र पहा)
चावडी विभागवार:

चर्चा
(विपी इतर चर्चा)

इतर विभागात समाविष्ट न होणारे चर्चा विषय नवी चर्चा जोडा | वाचा

वादनिवारण
वादांवर उहापोह करण्यासाठी नवीन विषय जोडा | वाचा

साहाय्य | मदतकेंद्र
नवागतांसाठी मदतकेंद्रनवाप्रश्न जोडा | वाचा

दूतावास
(Embassy)

नवी चर्चा जोडा
(Start new discussion)

प्रचालकांना निवेदन
प्रचालकांना निवेदन देण्यासाठीनिवेदन जोडा | वाचा


प्रचालकांचे मूल्यांकन
प्रचालकांचे कार्य आणि कृतींबद्दल उहापोह करण्यासाठीनवीन विषय जोडा | वाचा


तांत्रिक
तांत्रिक मुद्दयांवर चर्चा.
विपी आज्ञावलीच्या त्रुटी अहवाला साठी बगझीला वापरा.
नवीचर्चा जोडा | वाचा

ध्येय आणि धोरणे
सद्द आणि प्रस्तावित ध्येय आणि धोरणे, नीती-संकेत इत्यादींबाबत चर्चेसाठी नवीचर्चा जोडा | वाचा

प्रगती
मराठी विकिपीडियाच्या प्रगती बाबत चर्चा
नवीचर्चा जोडा | वाचा


सोशल मीडिया
मराठी विकिपीडियाचे सोशल मीडिया बाबत नवीन विषय जोडा | वाचा
चावडी (सुचालन)

स्थापना
___

स्वागत आणि साहाय्य चमू ,आलेले सदस्य,विकिभेट,कळपट हवा,सुलभीकरण,लेख/मजकुराची दखल पात्रता? चर्चा








नवीन लेख - ईगल वॉरिअर

मी तेथे ३ चित्रे जोडली आहेत. परंतु codeच्या घोटाळ्याने ते दिसत नाही, म्हणून मला मदत हवी आहे. Aniruddha Paranjpye

Wiktionary:प्रस्तावित वर्गशाखाविस्तार

मराठी विक्शनरीकरिता वर्ग शाखाविस्तार wikt:Wiktionary:प्रस्तावित वर्गशाखाविस्तार सुचवण्याचा प्रयत्न केला आहे, तो व्यवस्थीत व यशस्वी व्हावा म्हणून सर्वांनी सूचना आणि जमेल तेथे Wikt:Wiktionary:प्रस्तावित वर्गशाखाविस्तार लेखात योग्य बदल / संपादन साहाय्य द्यावे ही नम्र विनंती,

Mahitgar १६:०२, २ ऑगस्ट २००७ (UTC)

देवनागरी अंकांचे गणितीय स्थान व पर्याय

मराठी विकिपीडिया तसेच मराठी विक्शनरी मध्ये जवळपास सगळ्या सादरीकरणाचे मराठीकरण प्रबंधकांनी अतिशय उत्कृष्ट रीतीने केले आहे. त्यात त्यांनी वेळ, दिवस, तसेच पानांचा बाइट्स मधील आकार हे देखील मराठीत मांडले आहेत. मला स्वतःचा मराठीत अनेक साचे करायचा संकल्प असल्याने या संदर्भात एक सल्ला हवा आहे.

मराठीच्या देवनागरी लिपीतील अंकांना (०,१,२,३,४,५,६,७,८,९ अशा), किंबहूना एकंदरीतच सर्व संख्यांना, इंग्रजी संख्यांप्रमाणे आकडे म्हणून वापरता येते का? म्हणजे मी एखाद्या साच्यामध्ये बेरजेची गरज असल्यास १००+८ असे मांडून उत्तर १०८ येईल अशी अपेक्षा ठेवू शकतो का? माझ्या माहितीप्रमाणे केवळ इंग्रजी आकडे हे आकडे समजले जातात व इतर भाषेतील आकड्यांसोबत गणितीय कामे करता येत नाहीत. त्यामुळे सध्या मी ज्या साच्यांची निर्मिती केली आहे, त्यात जवळपास सर्व ठिकाणी मला देवनागरीतील संख्या इंग्रजीत भाषांतरीत करून काम करावे लागत आहे, व परत काम झाल्यावर त्या इंग्रजी संख्यांना देवनागरीत बदलून घ्यावे लागत आहे. त्यासाठी मी मराठीत इंग्रजी संख्या असा साचा लिहीला असून तो इंग्रजी संख्यांना शेवटी केवळ मराठीत बदलून देतो. मात्र सध्या माझी सर्व गणिते इंग्रजी संख्यांवरच चालू आहेत. याला एरवी हरकत नव्हती; परंतु शेवटी मराठी संख्या बदलण्यासाठी साचा वापरावा लागतो व मागच्या माझ्या चावडीचर्चेमध्ये मी सांगितल्याप्रमाणे वापरता येणार्‍या साच्यांच्या संख्येला मर्यादा लागू आहे. तेव्हा सध्या मी प्रबंधकांकडून मार्गदर्शन अपेक्षितो की, त्यांनी मराठीकरण कसे साध्य केले आहे ते सांगावे व इतर सोपा मार्ग असल्यास त्याबाबत चर्चा व्हावी.

थोडक्यात देवनागरी संख्यांना गणितीय स्थान सध्या देण्यास विकिप्रणाली समर्थ आहे का आणि नसल्यास ते साध्य करण्यासाठी काय करता येईल. किंबहूना, मर्यादित विचार करण्यापेक्षा, कोणत्याही भाषेतील लिपीतील संख्यांना गणितीय स्थान देण्यास विकिप्रणाली समर्थ करण्यास आपण काही करू शकतो का, याबाबत जरूर विचार व्हावा.

श्रीहरि ११:२६, ६ ऑगस्ट २००७ (UTC)

देवनागरी अंक हे फ्क्त frontend वर वापरले जातात. ज्यावेळी विकि इंजीनला आकडे छापायचे असतात त्यावेळी ते भाषांतर करणारे function वापरून हे काम करते. थोडक्यात विकिला मराठी आकडे कळत नाहीत. सर्व आकडेमोड इंग्रजी आकडे वापरूनच केली जाते. हे बदलायचे असल्यास विकि इंजीनाच्या कोडमध्ये काहीतरी बदल करावा लागेल. ---- कोल्हापुरी ०६:१८, ७ ऑगस्ट २००७ (UTC)

सप्टेंबर महिन्यासाठी मुखपृष्ठ सदर

विकिकरहो, जुलै आणि ऑगस्ट महिन्यांकरता मुखपृष्ठ सदर प्रकाशित होऊ शकले नाही. सप्टेंबर महिन्याकरता मुखपृष्ठ सदर निवडण्यासाठी कृपया उमेदवार लेखांची विकिपीडिया:कौल येथे शिफारस करा. जुलै महिन्याकरता शिफारस केलेल्या लेखांची पुन्हा शिफारस करण्यास हरकत नाही.

--संकल्प द्रविड २२:४५, ९ ऑगस्ट २००७ (UTC)

ई.स. च्या दुरुस्ती

नमस्कार मंडळी,

मी एक शुद्धीकरणाचे मोठे काम हाती घेण्याच्या विचारात आहे. दिनदर्शिकेतील सर्व ई.स. चे चुकीचे लेख इ.स. च्या बरोबर पानांकडे पुनर्निर्देशित करण्याचे काम पूर्ण करण्याचा मानस आहे. यात मी ई.स. च्या पानावरील सर्व मजकूर संबंधित इ.स. च्या पानावर घेऊन जाऊ इच्छितो. ई.स. वर येण्यार्‍या इतर विकिपीडियांच्या दुव्यांसह सर्वच मजकूर सरकावयाचा विचार आहे.

तिथपर्यंत ठीक आहे. पण मुख्य प्रश्न म्हणजे इतर विकिपीडियांमध्ये मराठीतील अशा लेखांचा दुवा जर ई.स. असा गेला असेल तर तो देखील बदलता आला तर खूप चांगले होईल. सांगकामे हे काम करतील का? नाहीतर मला वैयक्तिकरीत्या निदान इंग्रजी विकिपीडियावरचे दुवे दुरुस्त करावे लागतील. ते देखील एक वेळ करू शकेन पण इतर विकिपीडियावरच्या बदलांचे काय, हा प्रश्न राहातोच. System Tasks चा एखादा भाग इंग्रजी विकिपीडियावरचे बदल पाहून ह्या दुरुस्ती इतर विकिपीडियावर करणारा आहे का?

एकंदरीतच माझ्या या संकल्पित मोठ्या कामाला प्रबंधकांपैकी अभय नातू, संकल्प द्रविड, माहितगार इत्यादींनी हिरवा कंदील दाखवला तर वेळ न दवडता लगेच काम सुरू करायचा विचार आहे. काही सूचना असल्यास त्यांची देखील वाट पाहात आहे. कृपया शक्य तेवढ्या त्वरीत प्रतिक्रिया मांडाव्यात, ही विनंती.

श्रीहरि ०३:१२, १३ ऑगस्ट २००७ (UTC)

पण मुख्य प्रश्न म्हणजे इतर विकिपीडियांमध्ये मराठीतील अशा लेखांचा दुवा जर ई.स. असा गेला असेल तर तो देखील बदलता आला तर खूप चांगले होईल. सांगकामे हे काम करतील का?

हो. सर्व लेख 'ई.स. ---' कडून 'इ.स. ---' कडे पुनर्निर्देशण्याचे हे काम सांगकाम्यांकरवी करणे सोयीचे पडेल. फक्त त्याबाबत तांत्रिक माहिती जाणून घ्यावी लागेल. मला तशी तांत्रिक माहिती नाही; परंतु अभय नातूंनी 'क्रिकाम्या' हा सांगकाम्या बनवून अश्या स्वरूपाच्या काही लेखनदुरुस्त्या केल्या होत्या. त्यांची मदत याबाबत निश्चित होईल.
तसेच, इतर विकिपीडियांवरील लेखांबद्दल कुठल्या स्वरूपात बदल करावे लागतील याबाबत मलाही निश्चित स्वरूपाची माहिती सध्या नाही.
--संकल्प द्रविड ११:१२, १३ ऑगस्ट २००७ (UTC)


तिथपर्यंत ठीक आहे. पण मुख्य प्रश्न म्हणजे इतर विकिपीडियांमध्ये मराठीतील अशा लेखांचा दुवा जर ई.स. असा गेला असेल तर तो देखील बदलता आला तर खूप चांगले होईल. सांगकामे हे काम करतील का? नाहीतर मला वैयक्तिकरीत्या निदान इंग्रजी विकिपीडियावरचे दुवे दुरुस्त करावे लागतील. ते देखील एक वेळ करू शकेन पण इतर विकिपीडियावरच्या बदलांचे काय, हा प्रश्न राहातोच. System Tasks चा एखादा भाग इंग्रजी विकिपीडियावरचे बदल पाहून ह्या दुरुस्ती इतर विकिपीडियावर करणारा आहे का?

एखाद्या पानाचे पुनर्निर्देशन केले की इतर विकिपीडियावरील दुव्यांचेही आपोआप पुनर्निर्देशन होते, त्यासाठी वेगळे काही करावे लागत नाही. उदा. इंग्लिश विकिपीडियावर ई.स. २००७ कडे दुवा असला व ई.स. २००७चे इ.स. २००७कडे पुनर्निर्देशन केलेले असले तर इंग्लिश विकिपीडियावरुन ई.स. २००७कडचे दुवे इ.स. २००७कडे जातात.

एकंदरीतच माझ्या या संकल्पित मोठ्या कामाला प्रबंधकांपैकी अभय नातू, संकल्प द्रविड, माहितगार इत्यादींनी हिरवा कंदील दाखवला तर वेळ न दवडता लगेच काम सुरू करायचा विचार आहे. काही सूचना असल्यास त्यांची देखील वाट पाहात आहे. कृपया शक्य तेवढ्या त्वरीत प्रतिक्रिया मांडाव्यात, ही विनंती.

काम सुरू करण्यात माझ्याकडून हरकत नाही. मात्र एक विनंती आहे की एकदा काम सुरू केले की ते धसास लावून मगच सोडावे म्हणजे अर्धी पाने ई.स. व उरलेली इ.स. अशी राहणार नाहीत. असे राहिल्यास पुढील वाचक/लेखकांचा अधिक गोंधळ होईल.

या कामात सांगकाम्याबद्दल किंवा इतर काही मदत लागल्यास येथे किंवा सदस्य चर्चा पानावर लिहावे.

अभय नातू १३:१७, १३ ऑगस्ट २००७ (UTC)

ई.स. कडून इ.स. कडे

ही दुरुस्ती व्हावी ही श्रीहरीच्छा लवकरात पूर्ण होवो असे इच्छिणारा --J---J १५:१०, १३ ऑगस्ट २००७ (UTC)

श्रीहरीच्या इच्छेविरुद्ध काही घडते काय? त्याची इच्छा पूर्ण झाली नाही असे कधी झाले आहे काय?
अभय नातू २२:१२, १३ ऑगस्ट २००७ (UTC)
"असेल हरी तर देईल खाटल्यावरी" या म्हणीवर माझा विश्वास असल्यामुळे मी काही न करता फक्त वाट बघत आहे.
Shantanuo ११:३०, १५ ऑगस्ट २००७ (UTC)

नवे लेख

मी नवे लेख तयार केलेत. जसे ईगल वॉरिअर, जाग्वार वॉरिअर इ. परंतु त्याबरोबरच मी Eagle Warrior, Jaguar Warrior असे लेख तयार करून ते मूळ मरठी लेखांकडे पुनर्निर्देशित केले आहे, हेतू हा की search eangine मध्ये मराठी अkshaरे टाकणे कठीण जाते, अशा वेळी ही इंग्लिश अkshaरे टाकून सहज मूळ मराठी लेखाकडे जाता येईल. पण, माझ्या मनात एक किंतु उभा राहिला आहे, की अशामुळे काही गैरसोय, किंवा विकिपीडियावर काही अडथळे, जसे की, उगीच अनावश्यक लेखांची भर पडणे, इ. होणार नाही काय? याबाबत मला सल्ला द्या.

Aniruddha Paranjpye

There's no harm done in adding appropriate redirects to articles. It does not add any overhead to Wikipedia.
अभय नातू २२:०२, १५ ऑगस्ट २००७ (UTC)

हे ऐकून आनंद वाटला. मी अलीकडील बदलामध्ये डोकवलो, तेव्हा असे आढळले की, तुम्ही वॉरिअर हे बदलून वॉरियर केलेत. परंतु, मूळ उच्चाराप्रमाणे मूळ शब्द ठेवणे योग्य नव्हे का?

Aniruddha Paranjpye

त्याचप्रमाणे माझ्या लेखामध्ये मी Classical Nahuatl असा उल्लेख केला आहे, त्याबद्दल म्ररठीत कुठला योग्य शब्द असेल, हे कोणी सांगू शकेल काय?

Aniruddha Paranjpye

परंतु, मूळ उच्चाराप्रमाणे मूळ शब्द ठेवणे योग्य नव्हे का?

Warrior या शब्दाचा उच्चार वॉरियर असा होतो (उच्चारणाचा दुवा)

Classical Nahuatl - Classical या शब्दाचा एक अर्थ पारंपारिक होतो. हाच अर्थ तुम्हाला अभिप्रेत आहे का?

अभय नातू ०५:५९, १६ ऑगस्ट २००७ (UTC)

Warriorचा उच्चार

अनिरुद्ध, अभय म्हणतात ते बरोबर आहे. मराठीमध्ये सर्वसाधारणतः इकारानंतर 'अ' हा स्वर आल्यास त्याचा 'य' असा ध्वनी होतो. आधीच्या अक्षरातला 'इ'/'ई' हा स्वर(जसा 'वॉरियर' मधल्या 'रि' मधला 'इ' स्वर) पुढच्या 'अ' स्वराशी जोडला जाऊन 'इय'/'ईय' असा ध्वनी निघतो.

बाकी तुम्ही लिहीत असलेल्या लेखांची बरीचशी नावे इंग्लिश दिसताहेत.. त्यांना मराठी शीर्षके देणे बरे ठरेल असे माझे मत आहे; उदा.: 'ईगल वॉरियर', 'जाग्वार वॉरियर' या शीर्षकांऐवजी 'ईगल योद्धे'/'गरूड योद्धे', 'जाग्वार योद्धे'. एकतर हे शब्द मूळच्या दक्षिण अमेरिकी जमातींच्या स्थानिक भाषांतून स्पॅनिश-इंग्लिश असा प्रवास करत इंग्लिश भाषांतरित स्वरूपात आपल्यापर्यंत आलेत. मग आपण त्यांचे सुयोग्य भाषांतर करायला काय हरकत आहे? 'जाग्वार' वगैरे आपल्याकडे जसेच्या तसे उसने आलेले शब्द वगळता बाकी ठिकाणी हा नियम लागू व्हायला हरकत नाही.

Classical Nahuatl हे भाषेचे नाव या अर्थाने वापरायचे असल्यास 'अभिजात नहुआटल्‌' हा शब्द बरोबर ठरेल.

--संकल्प द्रविड ०८:४२, १६ ऑगस्ट २००७ (UTC)

मला "अ" नंतर "इ" आल्यास "य" होते, हे माहित आहे. तरीसुद्धा Warrior चा उच्चार करताना त्यात थोडासा "अ" जणवत नाही का? कदाचित, म्हणून मी वॉरिअर लिहीले असावे. मी लेखात वॉरियर असा बदल करतो.

संकल्प द्रविड लिहितात -

१. बाकी तुम्ही लिहीत असलेल्या लेखांची बरीचशी नावे इंग्लिश दिसताहेत.. त्यांना मराठी शीर्षके देणे बरे ठरेल असे माझे मत आहे; उदा.: 'ईगल वॉरियर', 'जाग्वार वॉरियर' या शीर्षकांऐवजी 'ईगल योद्धे'/'गरूड योद्धे', 'जाग्वार योद्धे'. एकतर हे शब्द मूळच्या दक्षिण अमेरिकी जमातींच्या स्थानिक भाषांतून स्पॅनिश-इंग्लिश असा प्रवास करत इंग्लिश भाषांतरित स्वरूपात आपल्यापर्यंत आलेत. मग आपण त्यांचे सुयोग्य भाषांतर करायला काय हरकत आहे? 'जाग्वार' वगैरे आपल्याकडे जसेच्या तसे उसने आलेले शब्द वगळता बाकी ठिकाणी हा नियम लागू व्हायला हरकत नाही.

Eagle Warrior, Jaguar Warrior ह्यांसारखे शब्द सतत वापरले जात आहेत. तेव्हा आपण तसाच शब्द ठेवावा असे मला वाटते. बर्याच भाषांत जरी सुयोग्य भाषांतर केले असले तरी शेवटी मूळ इंग्लिश शब्दच वापरले जातात. त्याचप्रमाणे गरूड योद्धे हा शब्द विचित्र वाटत नाही काय? कुठलाही शब्द अथवा गोष्ट सतत वापरल्यानंतर सवयीची झाल्यानंतर ती विचित्र वाटत नाही हे खरे, पण दुसर्या बाजूने विचार करता ती संस्कृती पार टोकाला आहे. त्या मेसोअमेरिकन संस्कृतीचा पार्श्वभूमी पहाता, त्यांचे साहित्य ज्ञान इ. स्पॅनिश आक्रमणात नष्ट झाले. परंतु काही त्यांचे ग्रंथ आणि त्यांच्या संस्कृतीबद्दल युरोपियन प्रवाशांनी लिहून ठेवले आहे. तेव्हा बरेच शब्द त्यांनी स्थानिक भाषेतीलच ठेवले. पहा - . त्यांच्या भाषा चित्रलिपीत असे. आणि स्पॅनिशांना सोन्याखेरीज दुसर्यात रस नसल्याने त्यांनी सोने शोधण्यासाठी कशाशीही पर्वा केली नाही. त्यातच अझ्टेकांचे बरेच साहित्य, कला (मूर्ती, प्रेक्षणीय स्थाळे इ.) त्यांनी नष्ट केले. त्यांच्या साहित्यात इजिप्तप्रमाणेच बरेच ज्ञान(खगोलशास्त्र, गणित इ.) होते. म्हणून आज त्यांच्या संस्कृतीबद्द्ल शोध चालू आहेत. दुसरे असे की, आपल्या देशात त्यांच्याबद्दल शाळेत अथवा कुठेही माहिती मिळ्त नसते. अशा वेळी मराठीत ही माहिती वाचल्यानंतर इंग्लिशमध्ये जर कोणी माहिती पहायला गेले तर त्यांना लगेच संदर्भ मिळू शकतो, कारण मराठीत माहिती मूळ इंग्लिश नावासहित असते (विकिपीडियावर). म्हणूनच मी खाली सूची मध्ये मराठी नावसहित इंग्लिश नावे दिली आहेत. नाहीतरी मी कंसात मराठीत शब्दशः अर्थाने जसे Eagle Warrior - गरूड योद्धे दिले आहेच.

२. अभिजात नहुआटल्‌

ह्या शब्दातून माझ्या काहीच लक्षात येत नाहीये.

ह्यांना - संकल्प द्रविड, अभय नातू

Classical Nahuatl हे Nahuatl भाषेचे एक अंग आहे. मला संदर्भानुसार असे वाटते की, Nahuatl भाषेचा जसा विकास होत गेला, आणि त्यात बरेच शब्द, व्याकरण, वाक्प्रचार निर्मित होहून आपली प्रगली चालू ठेवत आहे, त्यावेळेबाबत Classical हा शब्द वापरलेला वाटतो. तसेच, International Phonetic Alphabet - त्यास काय म्हणावे? इंग्लिश विकिपीडियावर पहा - International Phonetic Alphabet. Classical Nahuatl - Classical Nahuatl तेथे काही अक्षरे आहेत, त्याचे भाषंतर कसे करावे?

Aniruddha Paranjpye

काही मते

  1. अभिजात नहुआटल्‌ विषयी: 'अभिजात' हा शब्द मराठी (आणि अर्थात संस्कृतातही) 'classical', 'refined' अशा अर्थाने वापरतात. उदा. 'Indian Classical Music' करता 'अभिजात भारतीय संगीत'(आणि 'शास्त्रीय भारतीय संगीत' अशीही संज्ञा) वापरतात.
  2. 'बर्याच भाषांत जरी सुयोग्य भाषांतर केले असले तरी शेवटी मूळ इंग्लिश शब्दच वापरले जातात. त्याचप्रमाणे गरूड योद्धे हा शब्द विचित्र वाटत नाही काय?': तुमचे म्हणणे पूर्णांशाने बरोबर नाही. बहुतांश स्पॅनिश-इंग्लिशेतर युरोपीय भाषा आणि जपानी/चिनी या भाषा त्यांचे-त्यांचे शब्द अशा दक्षिण अमेरिकी संज्ञांमध्ये वापरतात(उदा.: इटालियन भाषेतील it:Guerrieri aquila हा गरुड योद्ध्यांबद्दलचा लेख). आणि साध्यासाध्या शब्दांची उसनवारी करून इंग्लिश संज्ञाच टिकवणार्‍या भाषा (उदा.: बहासा इंडोनेसिया, बहासा मलायसिया) खरंतर फारच उसनवारी केल्यामुळे धेडगुजरी वाटतात. मला वाटते 'ईगल', 'जाग्वार' या शब्दांमधून त्या-त्या प्राण्याचा पोशाख/तशी वेशभूषा अभिप्रेत आहे. त्यामुळे त्याकरता अस्स्ल मराठी असलेला 'गरूड' आणि मराठीत थेट उचलला गेलेला 'जाग्वार' हे शब्द योजणे समर्पक आहे. आपल्याच भाषेतली त्या-त्या संज्ञेत 'फिट' बसणारी आणि संज्ञेचा अर्थ आपल्या भाषेत सांगणारी शब्दयोजना शीर्षकांत वापरणे मला विचित्र वाटत नाही. बाकी 'ईगल वॉरियर' या श्ब्दावरून कोणी शोध घेतला, तर त्याला तो लेख सापडावा म्हणून 'ईगल वॉरियर' पासून 'गरूड योद्धे' हा शब्द पुनर्निर्देशावा.
  3. 'मेसोअमेरिकन' करता 'मध्य अमेरिकन' हा शब्द कसा वाटतो? भौगोलिक अर्थाने मेसोअमेरिकन वापरला जात असल्यामुळे 'मेसो' = 'मध्य' अशी शब्दयोजना सोपी वाटेल.
--संकल्प द्रविड १३:३६, १६ ऑगस्ट २००७ (UTC)

अझ्टेक, ऍझटेक, ऍझ्टेक

वरील पैकी कोणता उच्चार बरोबर? मी ऍझ्टेक/एझटेक असे ऐकलेले आहे.

अभय नातू १४:१५, १६ ऑगस्ट २००७ (UTC)

@ अभय नातू

ऍझ्टेक हा खरा उच्चार आहे.

तुम्ही भाषंतरीत केलेले Conquistador - कॉँकिस्तादोर हे चूक असून ते कॉंकुसिडोर असा उच्चार आहे.

Aniruddha Paranjpye

According to Webster -
Main Entry: con·quis·ta·dor
Pronunciation: kän-'kEs-t&-"dor, k&n- also -'kwis-, -'kis-
Link to pronunciation
Remember that in spanish, portuguese and many european languages (I believe all except English, German, Dutch and their derivatives,) soft t, d do exist. In some cases, such as spanish, protuguese, the harsh T, D do *not* exist. So for example, Pedro is really pronounced as पेद्रो and not पेड्रो.


संकल्प द्रविड लिहितात - १. अभिजात नहुआटल्‌ विषयी.........वापरतात. परंतु माझा मुद्दा हा आहे की, अभिजात मधून काय सूचित होते? तसेच मी नक्की काय लिहावे? तुम्ही Classical Nahuatl हा इंग्लिश विकिपीडियावर लेख पाहिला का?

२. 'बर्याच भाषांत जरी सुयोग्य भाषांतर केले असले तरी शेवटी मूळ इंग्लिश शब्दच वापरले जातात. त्याचप्रमाणे गरूड योद्धे हा शब्द ................. बाकी 'ईगल वॉरियर' या श्ब्दावरून कोणी शोध घेतला, तर त्याला तो लेख सापडावा म्हणून 'ईगल वॉरियर' पासून 'गरूड योद्धे' हा शब्द पुनर्निर्देशावा. तुम्ही उल्लेखिलेल्या भाषा केवळ विकिपीडियावरील आसून, ते केवळ ३-४ आहेत. मूळ इंग्लिश नाव ठेवण्याचे कारण, त्या संस्कृतीबद्दलचे बरेच शोध इंग्लिश भाषेत उपलब्ध आहेत. जर आपल्या देशातून कोणी तेथे नव्या शोधासाठी गेल्यास गोंधळ होणार नाही. १ली ते १०वी पर्यंत मराठी शिकणार्या विद्यार्थाला ११वीत गणित शिकतना त्रास होतो, ह्याचे कारण बरेच इंग्लिश शब्द मराठीत भाषांतरीत परंतु कठीण शब्दात जसे प्रतल - Plane, शंकू - Cone, इष्टिकाचिती असे क्लिष्ट भाषांतरे आहेत. जर ते सोप्या भाषेत किंवा मूळ इंग्लिश शब्द ठेवले तर सोपे जणार नाही काय? तसेच इंग्लिश विकिपीडियावर अझ्टेकांसंदर्भात राज्यकर्तेऐवजी त्यांच्या भाषेत (Nahuatl) ह्युयी ट्लाटोनी असेच ठेवून त्यावर एक लेख निर्मिला आहे. "आणि साध्यासाध्या शब्दांची उसनवारी करून इंग्लिश संज्ञाच टिकवणार्‍या भाषा (उदा.: बहासा इंडोनेसिया, बहासा मलायसिया) खरंतर फारच उसनवारी केल्यामुळे धेडगुजरी वाटतात" ह्यातून तुम्हाला काय सुचवायचे ते मला समजले नाही. ३'मेसोअमेरिकन' करता 'मध्य अमेरिकन' हा शब्द कसा वाटतो? भौगोलिक अर्थाने मेसोअमेरिकन वापरला जात असल्यामुळे 'मेसो' = 'मध्य' अशी शब्दयोजना सोपी वाटेल. मेसोअमेरिका आणि मध्य अमेरिका हे भौगोलिकदृष्ट्या एकच भूभाग असला तरी त्यांचा अर्थ वेगळा आहे. मध्य अमेरिका हे उत्तर अमेरिका खंडाच्या दक्षिण भागाशी संबंधित आहे. तर मेसोअमेरिका किंवा मेसोअमेरिकन हे मध्य अमेरिकेतील प्री-कोलंबियन संस्कृतीसाठी वापरला जातो. तसे पाहिले तर इंग्लिश विकिपीडियावरही मेसोअमेरिका आणि मध्य अमेरिका असे दोन लेख आहेत. ह्यातून हे दोन भिन्न शब्द आहे, आणि प्रत्येक शब्द भिन्न अर्थांनी अभिप्रेत आहे हे समजून येईलच.

@ 199.239.101.125 (Ip Address?) I played Age of Empires II: Age of Kings & The Conquerors Expansion many time. In game Computer opponent speaks as message and voice. I heard, they spoke for conquistador - कॉंकुसिडोर. And I belives Pedro is पेड्रो.

Age of Empires has anglicized pronunciations. Marathi Wikipedia's policy is to preserve native pronunciations as far as possible and practical. In their native language (spanish), conquistador *is* pronounced as given by Webster's dictionary. Per the rules, while the article must be named according to the native pronunciation, there is no harm in creating redirects with all variations of a word, as long as there is no conflict with another article.
As for veracity of pronunciation given by Webster, I asked a native spanish speaking person a few minutes ago and he confirmed that it is either कॉँकिस्तादोर or कॉँक्विस्तादोर.
Regards,
199.239.101.125 १८:२३, १६ ऑगस्ट २००७ (UTC)

@ अभय नातू मी मेसोअमेरिकन आणि प्री-कोलंबियन संदर्भात विविध लेख लिहू इच्छितो. म्हणून मी आपणांस विनंती करतो की आपण Francisco Pazarro व Mesoamerica असे लेख लिहिले आहे ते लिहू नये. म्हणजे असे अर्धवट लेख नकोत. तसेच, मी लेखांत दुवे जोडून लेख पूर्ण केल्यावर लाल रंगातील अ रांवरून तो लेख आहे की नाही हे माझ्या लक्षात येते. कुठलाही लेख अर्धवट असला तरी तो निळ्या रंगात दिसतो. असा वेळी तो लेख अर्धवट आहे हे समजणे कठीण जाते.

Pre-Columbianचा अर्थ असा आहे की युरोपियनांचा अमेरिकेवरील आक्रमणपूर्व संस्कृती होय. मला वाटते की, जसे रसायनशास्त्रातील शब्द आपण जसेच्या तसे घेतले आहे (फॉस्फरस, इ.) तसे ह्या सखोल अभ्यासपूर्ण शोधांमधील शब्द जसेच्या तसे ठेवावे. तसेच Conquistador हा स्पॅनिश शब्द असून त्याचा अर्थ जेता होय. परंतु नवीन जगासंदर्भात (अमेरिका) हा शब्द जे स्पॅनिश लोक (नवे भूभाग शोधून काढतात ~ Explorer) त्याचबरोबर तो प्रदेश आपल्या देशाच्या नावे जिंकत, त्यांना कॉंकुसिडोर म्हणतात.

@ All परंतु, International Phonetic Alphabet आणि Classical Nahuatl ह्या लेखतील विशिष्ट अरांचे काय? ह्याबद्दल कोणी सांगितले नाही.

Aniruddha Paranjpye

१ली ते १०वी पर्यंत मराठी शिकणार्या विद्यार्थाला ११वीत गणित शिकतना त्रास होतो, ह्याचे कारण बरेच इंग्लिश शब्द मराठीत भाषांतरीत परंतु कठीण शब्दात जसे प्रतल - Plane, शंकू - Cone, इष्टिकाचिती असे क्लिष्ट भाषांतरे आहेत.: अनिरुद्ध, मुळात आपण १०वी नंतरच्या विद्यार्थ्यांना सोपे सोपे घास करून भरवायचा मुख्य उद्देश ठेवलाय का? मराठी विकिपीडिया मराठी भाषेत (१००% असा आग्रह नाही, पण शक्य तितके जास्त मराठी वापरून) विश्वकोश लिहिण्याचा प्रकल्प आहे. तशा अर्थाने आपला उद्देश व्यापक आणि दूरदृष्टीचा असला पाहिजे. मी जी भाषांतराची अपेक्षा करतोय त्यात 'गरूड' हा त्या सैनिकांचा पोशाखदर्शक शब्द वापरण्याचीच सामान्य अपेक्षा करतोय. त्याची अणि इष्टकाचितीची एकाच पारड्यात तुलना होऊ शकत नाही.
दुसरा मुद्दा असा की मुळातच इंग्लिश लोकांनी वेगवेगळ्या विषयांमध्ये संशोधन करताना स्वतःच्या भाषेत नवनवीन पारिभाषिक संज्ञा(म्हणजे आपल्या १०-१२ वीच्या लोकांच्या भाषेत terminology :)) घडवत नेल्या आहेत. त्या करताना त्यांनी आपल्यासारखा सोप्पं-सोप्पं-सोप्पं असा बाऊ केल्याचे अजिबात वाटत नाही. माझ्या म्हणण्याची खात्री करून घेण्याकरता तुम्ही 'Gray's Anatomy' वगैरे ग्रंथ, जीवशास्त्र, वैद्यकशास्त्र यांमधील लॅटिनमिश्रित परिभाषा पाहा. (आता ते शब्द इंग्लिशमधून शिकलेल्या भारतीय मुलांचीही (आणि मराठी मुलांची .. माझं स्वानुभवजन्य निरीक्षण :P) बोबडी वळते/दांडी उडते.. त्याला काय करणार!) आपण भारतीय विविध ज्ञानशाखांच्या संशोधनाकडे दुर्लक्ष करतो आहोत, कॉपी-पेस्ट धोरण राबवतो आहोत ही वस्तुस्थिती स्वीकारली तरीही स्वभाषेत वेगवेगळ्या ज्ञानशाखांची मांडणी करण्याचे प्रयत्न आपण सोडून द्यावेत थोडीच!(नाहीतर आपली गत बहासा इंडोनेसिया वगैरेंसारखी होईल म्हणून त्यांचे उदाहरण होते.) असो. मूळ मुद्दा असा की 'गरूड' सारखा साधा शब्दही - जो तिथे सैनिकांचा पोशाख व्यक्त करणारा आहे - वापरणं विचित्र वाटू नये.
तिसरा मुद्दा, मी सांगितलेल्या युरोपीय भाषा केवळ तीन-चार नाहीत. आणि त्या(म्हणजे इंग्लिशेतर युरोपीय भाषा, चिनी/जपानी या भाषा) भाषांची स्वभाषेतील पारिभाषिक संज्ञांची भूमिका केवळ विज्ञान/तंत्रज्ञान या क्षेत्रांपुरतीच सीमित नाही. आपण विज्ञान-तंत्रज्ञानात अगोदरच परधार्जिणे धोरण अवलंबून (आणि आपली 'सोप्पं-सोप्पं-सोप्पं' विचारप्रणाली रेटून) बरीच हानी करवून घेतली आहे. भाषेच्या विकासात विश्वकोशासारख्या ग्रंथांचे, नवीन परिभाषा विकसवून त्या-त्या विषयावर माहितीपूर्ण, संशोधनपर लिखाण करण्याच्या उद्यमशीलतेचे इंग्लिश भाषेच्या विकासात निश्चितच योगदान राहिले आहे. आपण हा मुद्दा दुर्लक्षू नये असे माझे मत आहे. मागे एकदा केदार पाटील यांनी व्यक्तिवाचक लेखांची शीर्षके संपूर्न नावाने लिहावीत याबद्दल असा मुद्दा मांडला होता की व्यक्तीचे पूर्न नाव लेखाचे शीर्षक ठेवल्याने (आणि इतर नावे, टोपणनावे त्याला पुनर्निर्देश म्हणून ठेवल्याने) वाचकांना एका क्लिकसरशी त्या व्यक्तीच्या खर्‍या पूर्ण नावाची माहिती नव्याने कळते. तोच मुद्दा विविध देशांतल्या शहरांच्या स्थानिक भाषांतील नावांबद्दल पुरस्कारला गेला होता. या सर्वांमागे लोकांचा झेपॅबिलिटी वाढवायचा प्रयत्न करणे हा उद्देश आहे. त्या तर्काने एखाद्या शीर्षकाचे सुयोग्य मराठीकरण करणे मला समर्थनीय वाटते. तुम्ही म्हणताय तो इंग्लिश परिभाषेचीही ओळख करवून देण्याचा मुद्दाही वाजवी मर्यादेपर्यंत मला पटतो. म्हणूनच मूळ मराठीकृत शीर्षकाला इंग्लिश संज्ञेवरून पुनर्निर्देश द्यावेत व लेखाच्या सुरुवातीला त्या-त्या इंग्लिश संज्ञाही उल्लेखाव्यात अशी माझी सूचना आहे.
'अभिजात नहुआटल्‌' बद्दल: 'Classical Nahuatl' लेख मी पूर्वीच पाहिला होता. त्या विषयाची पूर्ण कल्पना असल्यानेच मी 'अभिजात नहुआटल्‌' हा शब्द सुयोग्य असल्याचे सांगतो आहे. मूळच्या भाषेत स्पॅनिश शब्द, व्याकरण यांचा प्रभाव पडल्याने ती बरीच बदलत गेली.. सरमिसळ स्वीकारत गेली. त्यामुळे आधीच्या भाषेचा 'retaining the purity/ retaining the original refined flavour' अशा प्रकारचा गुणधर्म व्यक्त करण्यासाठी 'अभिजात' शब्द 'बेष्ट फिट' वाटतो. :) खातरजमेकरता मी इंटरनेटवर शोधल्यावर मला 'Classical' चे हे अर्थ मिळाले: 'Conforming to the best authority in literature and art; chaste; pure; refined; as, a classical style'. या व्याख्यांशीदेखील 'अभिजात' शब्द सुसंगत आहे. मला वाटते आता तुम्हाला माझे स्पष्टिकरण समजले असावे.
--संकल्प द्रविड ०२:२०, १७ ऑगस्ट २००७ (UTC)

हे पहा, मी एक विद्यार्थी आहे. तेव्हा मला काय अडचणी आल्या ते माझे मलाच माहित. खरे तर १०वी मधून ११वी कला किंवा वाणिज्य विभागात जायची ज्यांना इच्छा असते, त्यांना १०वीत Biology, Chemistry सारखे विषय गरजेचे नसते, परंतु त्यांना ते शिकावे लागते, ह्याचे कारण त्यांवर काही महत्त्वाचे गुण राखलेले असतात. "मुळात आपण १०वी नंतरच्या विद्यार्थ्यांना सोपे सोपे घास करून भरवायचा मुख्य उद्देश ठेवलाय का?" नक्कीच नाही, परंतु जर भाषा सोपी असेल तर समजणे सोपे जात नाही काय? मूळात ७वीपासून १० वीपर्यंत मराठीत कठीण शब्द जसे इष्टिकाचिती, वृत्तचिती, ह्यांसारखे शब्द आहेत. जे खालच्या वर्गातून येतात त्यांना हे शब्द समजणे कठीण जाते (माझ्या निरिणावरून). मी विविध पुस्तके वाचत असल्याने ते मला कठीण नाही, पण इतरांचे काय? कोणी शिक्षक ह्या शब्दांचा अर्थ समजावीत नाही. अलीकडे शिक्षक फक्त पुस्तकांप्रमाणे पोपटपंची करून पैसे मिळवत आहेत. जर कोणी शंका विचारायला गेले तर काहीतरी कारण काढून त्यांच्या प्रश्नांना बगल देतात. माझा मुद्दा इतकाच की, ह्या गोष्टी/माहिती क्लिष्ट भाषेऐवजी सोप्या भाषेत किंवा मूळ इंग्लिश संज्ञा वापराव्यात. गरूड योद्धे हा शब्द सोपा आहे खरा पण दुसर्या बाजूने विचार करता (पुढे पहा). (आता ते शब्द इंग्लिशमधून शिकलेल्या भारतीय मुलांचीही (आणि मराठी मुलांची .. माझं स्वानुभवजन्य निरीक्षण :P) बोबडी वळते/दांडी उडते.. त्याला काय करणार!) म्हणूनच मी मूळ इंग्लिश शब्द ठेवले आहे. तुमच्या म्हणण्याप्रमाणे सुरवातीला इंग्लिश शब्द द्यावे हा मुद्दा मला पटतो. जर गरुड योद्धे हा शब्द लेखात लिहिला तर वारंवार हाच शब्द तोंडी बसतो. जर आपल्यापैकी कोणी मेसोअमेरिकन संस्कृतीवर संशोधन करायला किंवा पी.एच.डी मिळवायला गेले तर त्यांना त्रास होणार नाही का? जर ईगल वॉरिअर ठेवल्यास ते तोंडी कायम बसू शकते. अलीकडे जगातील ७ अश्चर्ये ठरवण्यासाठी एका संस्थेने मते मागवलेली. त्यानंतर ७ अश्चर्यांची निवड झाली, त्यात Mayan लोकांचा Temple of Tikkal आणि Inca(s) चा Macchu Picchu शहर होते. अपुर्या माहितीमुळे वृत्तपत्रांनी मायन आणि इंकास् त्याचबरोबर माच्छू पिच्छू असे छापून टाकले. वास्तविक Mayan हे लिहिण्याची पद्धत असल्याचे मला आढळले आहे, जसे Aztecs, Incas. Mayan हा शब्द माया संस्कृतीतील लोकांसाठी वापरला जातो, परंतु काहीकाहीवेळा त्या संस्कृतीसाठीही Mayan हा शब्द वापरतात. पण त्यावेळी तो शब्द मायनऐवजी मायाच असतो. "मागे एकदा केदार पाटील यांनी व्यक्तिवाचक लेखांची शीर्षके संपूर्न नावाने लिहावीत याबद्दल असा मुद्दा मांडला होता की व्यक्तीचे पूर्न नाव लेखाचे शीर्षक ठेवल्याने (आणि इतर नावे, टोपणनावे त्याला पुनर्निर्देश म्हणून ठेवल्याने) वाचकांना एका क्लिकसरशी त्या व्यक्तीच्या खर्‍या पूर्ण नावाची माहिती नव्याने कळते. तोच मुद्दा विविध देशांतल्या शहरांच्या स्थानिक भाषांतील नावांबद्दल पुरस्कारला गेला होता" मला काही कळले नाही.

झेपॅबिलिटी (म्हणजे काय?)

जर तुमचा आग्रह कायम असेल तर मी तसा बदल करीन.

अभिजात:- मी म्हणत होतो की ह्या शब्दाचा अर्थ काय? मला ह्यातून काही समजत नाही. त्या शब्दाचा अर्थ सांगा. पण तुम्ही अर्थ सांगण्याऐवजी दुसरा मुद्दा मांडत आहात.

International Phonetic Alphabet चे काय? Classical Nahuatl लेखात खाली केल्यावर स्वर~व्यंजने ह्यांची यादी आहे. त्या विशिष्ट अक्षरांचे भाषांतर कसे करावे?

@अभय नातू I played Age series as much. They spoke कॉंकुसिडोर for Conquistador. I has Oxford Dictionary (Computer Program) which shows words detailed with Audio. They also spoke कॉंकुसिडोर.

Aniruddha Paranjpye

Hmm...you're basing your conclusions on a commercial *game* that vows no allegiance to truth, while ignoring Webster's reference.
Enough said.
अभय नातू ०७:१८, १७ ऑगस्ट २००७ (UTC)

I am pointing on "Oxford Dictionary" (Computer Program) which shows words detailed with Audio. They speaks कॉंकुसिडोर.

Aniruddha Paranjpye

Where's the link? I gave you an online link.
Provide a verifiable reference.
अभय नातू १४:००, १७ ऑगस्ट २००७ (UTC)

साचा प्रकल्प

कोणी साचा प्रकल्पाबद्दल सविस्तर सांगू शकेल का? मी मेसोअमेरिकनांवर असा एखादा प्रकल्प सुरू करू शकतो का?


Aniruddha Paranjpye

In विकिपीडिया साचे सुसूत्रीकरण प्रकल्पUsers Sankalp,Kedar and shrihari have done some advance work and experimentation some of us including me have tried a few templates.That way there is no restriction in creating new projects , for new projects preferably have common subject of interest to more no of editors for better success . One more option for limited purpose/period projects is to use Category Page itsaelf as a project page.Please consider starting new project pages in "Wikipedia:" name space.

Mahitgar १७:४४, १६ ऑगस्ट २००७ (UTC)

@ Mahitgar

मग मी इतर साचे निर्मित करू शकतो का? की प्रकल्पात सामील व्हावे लागेल? मला विविध विषयांसाठी विविध साच्यांची गरज आहे.

Aniruddha Paranjpye

Answering on behalf of Mahitgar -

It would help if you joined the project as it would allow others to co-ordinate with you. However, it is not necessary to do so. You can create as many templates as you like, as long as they conform to the norms on Marathi Wikipedia. There are no written rules about this (yet) and I believe the project participants have that as part of their agenda.
If you create a template that you believe can be used in multiple places beyond your current realf of edits, be sure to write a note about it here so others can take advantage of it.
Regards,
199.239.101.125 १८:३१, १६ ऑगस्ट २००७ (UTC)

अझ्टेक वॉरियर सोसायटी

अझ्टेक वॉरियर सोसायटी/Aztec Warrior Society ह्याला योग्य शब्द मला कोणी सांगू शकेल काय? Aniruddha Paranjpye

ऍझ्टेक योद्धा गण - A group/formal collection of warriors, e.g. Society of engineers.
ऍझ्टेक योद्धा समाज - A subset of Aztec society, e.g. ब्राह्मोसमाज.
अभय नातू १४:०७, १७ ऑगस्ट २००७ (UTC)

Triple Alliance

Triple Alliance साठी प्रतिशब्द काय असेल? त्रिराष्ट्र मैत्री? की, तिहेरी मित्रराष्ट्र

Aniruddha Paranjpye

तिहेरी संधी, तिहीरी तह.
अभय नातू १४:०३, १७ ऑगस्ट २००७ (UTC)

Aztec Triple Alliance - The Aztec Triple Alliance was formed by Itzcoatl of Tenochtitlan, Nezahualcoyotl of Texcoco, and the smaller city-state of Tlacopan in 1428. Aztec Triple Alliance is also known as Aztec Empire. Later Tenochtitlan overrules on other 2 city-states and they became weak. So, त्रिराष्ट्र मैत्री/तिहेरी मित्रराष्ट्र?

Aniruddha Paranjpye

bhasha badlat rahili pahije, tarach ti jiwant rahate..

badlatach khare jeevan dadle aahe. badalatunach utkranti hote.

विशेष लेखाचे पुनर्निर्देशन करणे आहे!

मंडळी,

ई.स. ४९३ हा लेख इ.स. ४९३ या बरोबर शीर्षकाच्या लेखाकडे पुनर्निर्देशित करायचा आहे. परंतु हा विकिपीडियाच्या इतिहासातील विशेष लेख (८००० वा) आहे. कृपया याचे काय करायचे ते प्रबंधक व इतर विचारवंतांनी ठरवावे. माझा प्रश्न असा आहे की; मी याला पुनर्निर्देशित तर करणार आहेच; तरीही याच्यावर ती विशेष माहितीपेटी (८००० व्या लेखाची) ठेवता येईल का? तसेच त्याचा ८,००० हा वर्ग देखील अबाधित ठेवता येईल का? अर्थात त्याचा काही उपयोग होईल का, कारण त्यावर कोणी जाणे थोडे अवघड आहे.

श्रीहरि १३:२६, २१ ऑगस्ट २००७ (UTC)

ई.स. ४९३वरील मजकूर अबाधित ठेवून त्याचे स्थानांतरण इ.स. ४९३कडे केले असता हेतू साध्य झाला आहे.
अभय नातू १३:५२, २१ ऑगस्ट २००७ (UTC)

Times Express Indian of India

List anonymous wikipedia edits from interesting organizations

wikiscanner.virgil.gr


To read on how Indian news givers had tried to change article about another news giver on en Wikipedia.To know more follow

wikiscanner now on

Mahitgar १०:१०, २६ ऑगस्ट २००७ (UTC)

Examples Wikiscanner

SGGS Result
[ MAEER MIT Result

काय करावे?

मला वाटतं कोणत्याही शब्दाचा दुवा तयार करताना ते नाम मूळ स्व्ररुपात ठेवणे आवश्यक आहे.असे करताना वाक्याची रचना थोडी वेगळी होण्याची शक्यता आहे.तरी चालेल कारण मराठीत नामाला जोडून अनेक प्रत्यय येतात.उदा, प्राणी आणि प्राण्यांच्या असे दोन वेगळे शब्द झाल्याने त्यांची दुव्याची पानं पण वेगळि होत आहेत.इंग्रजी भाषेत असा त्रास होत नाही.तरी यावर काही उपाय काढणे गरजेचे आहे.

There's already a way around this. In your example, use [[प्राणी|प्राण्यांच्या]] to point प्राण्यांच्या link to प्राणी.
MarathiBot १६:३१, ७ सप्टेंबर २००७ (UTC)


सौरभदा, उदाहरणादाखल खालील स्रोत बघा:
[[भारत]] हा दक्षिण आशियाई देश असून महाराष्ट्र [[भारत|भारताच्या]] पश्चिम भागातील राज्य आहे.
वरीलप्रमाणे स्रोत लिहिलेले वाक्य असे दिसते:
भारत हा दक्षिण आशियाई देश असून महाराष्ट्र भारताच्या पश्चिम भागातील राज्य आहे.
--संकल्प द्रविड १७:१९, ७ सप्टेंबर २००७ (UTC)

वर्गांचे स्थानांतरण

नमस्कार मंडळी,

अशुद्ध ई.स.च्या लेखांचे शुद्ध इ.स.च्या लेखांकडे स्थानांतरण वा पुनर्निर्देशन करण्याचे भलेमोठे काम चालूच आहे. परंतु पूर्वी चुकीचे ई.स.चे वर्ग देखील तयार होऊन बसले आहेत आणि त्यांचे स्थानांतरण करू जाता त्याप्रकारचा पर्याय वरती Tabs वर दिसत नाही. कृपया प्रबंधकांनी व माहीतगारांनी(!) मार्गदर्शन करावे की, वर्गांचे स्थानांतरण करण्याची सोय विकि देते का नाही; देत असल्यास ते कसे करावे वा देत नसल्यास अशुद्ध वर्गांची स्थिती काय ठेवावी?

श्रीहरि १३:५०, १० सप्टेंबर २००७ (UTC)


वर्गांचे स्थानांतरण करण्याची सोय विकि देत नाही; I believe one can use #REDIRECT [[Article Name]] option and प्रबंधक has option of deleting the वर्ग page.As a user we can put delet notice. Mr.Sankalp and Mr.Abhay may guide us more in this respect.
Mahitgar १५:०३, १० सप्टेंबर २००७ (UTC)