वासुदेव महादेव अभ्यंकर

पंडित वासुदेवशास्त्री अभ्यंकर (१८६२ - १९४३) हे पुण्यात राहणारे एक संस्कृत विद्वान व वैयाकरणी होते. त्यांचे शिक्षण साताऱ्यातील विद्वान पंडित राजारामशास्त्री गोडबोले यांच्या देखरेखीखाली झाले. संत वाङ्मयाचे अभ्यासक शंकर अभ्यंकर हे वासुदेवशास्त्र्यांचे चिरंजीव होत.

वासुदेवशास्त्री अभ्यंकर यांनी प्रतिभा वेदान्त, मीमांसा, साहित्य, न्याय, ज्योतिष या क्षेत्रांत लेखन केले. त्यांनी अनेक संस्कृत ग्रंथांवर टीका लिहिल्या. त्यांच्या विद्वत्तेने प्रभावित झालेल्या महादेव गोविंद रानडे यांनी त्यांना पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजात प्राध्यापकपदासाठी बोलावले.

निवडक पुस्तके संपादन

  • अद्वैतामोद
  • कायशुद्धि
  • धर्मतत्त्व निर्णय
  • ब्रह्मसूत्र शांकर भाष्य आणि पंतजलि महाभाष्य यांचे मराठी अनुवाद
  • सूत्रांतर परिग्रह विचार

पुरस्कार आणि सन्मान संपादन

  • १९२१ साली महामहोपाध्याय ही उपाधी
  • संकेश्वरच्या शंकराचार्यांकडून ’विद्वद्रत्न' ही मानाची उपाधी.