वाडिया हिमालयीन भूशास्त्र संस्था

वाडिया हिमालयीन भूशास्त्र संस्थान ही डेहराडून स्थित भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग अंतर्गत एक हिमालयाचा भूशास्त्रीय अभ्यास करणारी स्वायत्त संशोधन संस्था आहे. जून १९६८ मध्ये दिल्ली विद्यापीठाच्या वनस्पतिशास्त्र विभागात याची स्थापना झाली, एप्रिल १९७६ मध्ये ही संस्था उत्तराखंडच्या डेहराडून येथे स्थलांतरित करण्यात आली. संस्थेची तीन क्षेत्र शोध केंद्रे, नड्डी -धर्मशाला, डोक्रियानी बामक ग्लेशियर स्टेशन आणि अरुणाचल प्रदेशमध्ये इटानगर येथे आहेत.