वसंत प्रभू

मराठी चित्रपटातील संगीतकार

वसंत प्रभू (१९२२ - १९६८) हे मराठी चित्रपटातील संगीतकार होते. लता मंगेशकरनी गायलेली त्यांची अनेक गीते प्रसिद्ध आहेत. गीतकार पी.सावळाराम सोबत प्रभूंनी विविध चित्रपटात भागीदारी केली.[१] प्रभूनी संगीत दिलेले प्रसिद्ध गीत म्हणजे 'मानसीचा चित्रकार तो', 'चाफा बोलेना','आली हासत पहिली रात', 'गंगा जमुना डोळ्यांत उभ्या' व 'कळा ज्या लागल्या जिवा'.[२]

कारकीर्द संपादन

प्रभू लहानपणापासून कथक शिकलेले प्रशिक्षित नर्तक होते. त्याचबरोबर संगीत आणि तालाची पण त्यांना माहिती होती. आधी प्रभूंनी पुणे आणि कोल्हापूरातील मराठी चित्रपटात एक अभिनेता म्हणून भूमिका मिळविण्याचा प्रयत्न केला. मराठी चित्रपट 'राम राम पाव्हणं' मधे प्रभूंनी काही गाण्यांना संगीत दिले व नृत्य पण दिग्दर्शित केले. पुढे लता मंगेशकर यांच्या 'सुरेल चित्र'या बॅनर निर्मित 'वादळ'चित्रपटात संगीत दिले. त्यातील एका ठुमरीला नागपूर येथील चित्रपटगृहात "पुन्हा एकदा" अशी दाद मिळाल्याने तेवढ्याच गीताची वेगळी रीळ बनवण्यात आली. प्रभूंनी दिनकर पाटील दिग्दर्शित चित्रपट 'तारका'चे नृत्य दिग्दर्शित केले ज्यात अभिनेत्री सुलोचना लाटकर होत्या.[३]

प्रभूंनी पुढील विविध प्रकल्प मंगेशकर आणि गीतकार पी. सावळाराम यांच्यासह केले. यात 'कन्यादान' हा लक्षणीय चित्रपट होता. चित्रपट 'पुत्र व्हावा ऐसा' साठी, तलत मेहमूदयांनी मराठीत प्रथमच दोन गीते गायली. तलत मेहमूद तेव्हा हिंदी सिनेमातील लोकप्रिय गझल गायक होते.[३]

लेखक मधू पोतदार लिखीत 'मानसीचा चित्रकार तो' हे चरित्र मंजुळ प्रकाशनने प्रकाशित केले आहे, ज्याचे नाव प्रभूंनी रचलेल्या एका गीतावर आधारित आहे.[४] ऑक्टोबर २००८ मध्ये, सोहम प्रतिष्ठान व अनुबोधने प्रभूंच्या आठवणीत 'स्वरप्रभू - वसंत प्रभू' कार्यक्रम विलेपार्ले, मुंबईत आयोजित केला होता.[५]

गीते संपादन

गीत चित्रपट गायक गीतकार टिपणी
'आई कुणा म्हणू मी' [६] 'पुत्र व्हावा ऐसा' आशा भोसले पी. सावळाराम
'आली दिवाळी आली दिवाळी' [७] 'बायकोचा भाऊ' आशा भोसले पी. सावळाराम
'आली हासत पहिली रात' [८] 'शिकलेली बायको' लता मंगेशकर पी. सावळाराम राग हंसध्वनी
'अनाम वीरा जिथे जाहला'[९] लता मंगेशकर कुसुमाग्रज
'अपुरे माझे स्वप्न राहिले '[१०] आशा भोसले पी. सावळाराम
'असा मी काय गुन्हा केला'[११] आशा भोसले रमेश अणावकर राग पहाडी
'चाफा बोलेना'[१२] लता मंगेशकर कवी बी राग यमन
'गा रे कोकिळा गा'[१३] बायकोचा भाऊ आशा भोसले पी. सावळाराम राग हमीर, राग केदार
'गळ्यात माझ्या तूच'[१४] आशा भोसले पी. सावळाराम
'गंगा जमुना डोळ्यांत उभ्या'[१५] लता मंगेशकर पी. सावळाराम
'घरात हसरे तारे असता'[१६] लता मंगेशकर दत्ता केसकर
'घरोघरी वाढदिन'[१७] लता मंगेशकर पी. सावळाराम
'घट डोईवर घट कमरेवर'[१८] लता मंगेशकर पी. सावळाराम
'गोड तुझ्या त्या स्वप्नामधली'[१९] 'ग्रुहदेवता' लता मंगेशकर पी.सावळाराम
'का चिंता करिसी'[२०] 'शिकलेली बायको' हृदयनाथ मंगेशकर पी. सावळाराम
'काय करू मी बोला'[२१] आशा भोसले पी. सावळाराम
'कळा ज्या लागल्या जिवा '[२२] लता मंगेशकर भा. रा. तांबे
'कलेकलेने चंद्र वाढतो '[२३] मोहनतारा अजिंक्य पी. सावळाराम
'कल्पवृक्ष कन्येसाठी'ref>"कल्पवृक्ष कन्येसाठी". ३ फेब्रुवारी २०१४ रोजी पाहिले.</ref> लता मंगेशकर पी. सावळाराम राग पहाडी
'कोकिळ कुहुकुहु बोले'[२४] 'कन्यादान' लता मंगेशकर पी. सावळाराम
'कृष्णा मिळाली कोयनेला 'ref>"कृष्णा मिळाली कोयनेला". ३ फेब्रुवारी २०१४ रोजी पाहिले.</ref> लता मंगेशकर पी. सावळाराम
'कुबेराचं धन माझ्या शेतात'[२५] 'शिकलेली बायको' उषा मंगेशकर, हृदयनाथ मंगेशकर पी. सावळाराम
'ओळख पहिली गाली हसते'[२६] आशा भोसले पी. सावळाराम
'रिमझिम पाऊस पडे सारखा'[२७] लता मंगेशकर पी. सावळाराम
'उठा उठा सकल जन'ref>"उठा उठा सकल जन". ३ फेब्रुवारी २०१४ रोजी पाहिले.</ref> पारंपरिक गीत आशा भोसले
'उठी गोविंदा उठी गोपाला'[२८] आशा भोसले पी. सावळाराम राग भूप, राग देशकार

पूढील वाचन संपादन

संदर्भ संपादन

  1. ^ Mujawar, Isak (1969). "Maharashtra: birthplace of Indian film industry" (इंग्रजी भाषेत). p. 147. ४ जून २०१५ रोजी पाहिले.
  2. ^ "Stalwarts of Marathi Cinema:". Archived from the original on 2013-04-01. 2017-02-24 रोजी पाहिले. Unknown parameter |अ‍ॅक्सेस दिनांक= ignored (सहाय्य)
  3. ^ a b "दिग्गज कलाकार - भाग (२)". Archived from the original on 2011-07-13. ४ जून २०१५ रोजी पाहिले.
  4. ^ कुलकर्णी, धनंजय. "भारतीय सिनेमाचा मराठीतला 'अक्षर'वेध!". Archived from the original on 2014-09-22. ८ जून २०१५ रोजी पाहिले.
  5. ^ "संगीतकार वसंत प्रभूंना सांगीतिक आदरांजली". ४ जून २०१५ रोजी पाहिले.
  6. ^ "आई कुणा म्हणू मी". ३ फेब्रुवारी २०१४ रोजी पाहिले.
  7. ^ "आली दिवाळी आली दिवाळी". ३ फेब्रुवारी २०१४ रोजी पाहिले.
  8. ^ "आली हासत पहिली रात". ३ फेब्रुवारी २०१४ रोजी पाहिले.
  9. ^ "अनाम वीरा जिथे जाहला". ३ फेब्रुवारी २०१४ रोजी पाहिले.
  10. ^ "अपुरे माझे स्वप्न राहिले". Unknown parameter |अ‍ॅक्सेस दिनांक= ignored (सहाय्य)
  11. ^ "असा मी काय गुन्हा केला". ३ फेब्रुवारी २०१४ रोजी पाहिले.
  12. ^ "चाफा बोलेना". ३ फेब्रुवारी २०१४ रोजी पाहिले.
  13. ^ "गा रे कोकिळा गा". ३ फेब्रुवारी २०१४ रोजी पाहिले.
  14. ^ "गळ्यात माझ्या तूच". ३ फेब्रुवारी २०१४ रोजी पाहिले.
  15. ^ "गंगा जमुना डोळ्यांत उभ्या". ३ फेब्रुवारी २०१४ रोजी पाहिले.
  16. ^ "घरात हसरे तारे असता". ३ फेब्रुवारी २०१४ रोजी पाहिले.
  17. ^ "घरोघरी वाढदिन". ३ फेब्रुवारी २०१४ रोजी पाहिले.
  18. ^ "घट डोईवर घट कमरेवर". ३ फेब्रुवारी २०१४ रोजी पाहिले.
  19. ^ "गोड तुझ्या त्या स्वप्नामधली". ३ फेब्रुवारी २०१४ रोजी पाहिले.
  20. ^ "का चिंता करिसी". ३ फेब्रुवारी २०१४ रोजी पाहिले.
  21. ^ "काय करू मी बोला". ३ फेब्रुवारी २०१४ रोजी पाहिले.
  22. ^ "कळा ज्या लागल्या जिवा". ३ फेब्रुवारी २०१४ रोजी पाहिले.
  23. ^ "कलेकलेने चंद्र वाढतो". ३ फेब्रुवारी २०१४ रोजी पाहिले.
  24. ^ "कोकिळ कुहुकुहु बोले". ३ फेब्रुवारी २०१४ रोजी पाहिले.
  25. ^ "कुबेराचं धन माझ्या शेतात". ३ फेब्रुवारी २०१४ रोजी पाहिले.
  26. ^ "ओळख पहिली गाली हसते". ३ फेब्रुवारी २०१४ रोजी पाहिले.
  27. ^ "रिमझिम श्रावण". ८ जून २०१५ रोजी पाहिले.[permanent dead link]
  28. ^ "उठी गोविंदा उठी गोपाला". ३ फेब्रुवारी २०१४ रोजी पाहिले.