वर्षा भोसले (इ.स. १९५६ - ८ ऑक्टोबर, इ.स. २०१२) या मराठी गायिका, पत्रकार होत्या. या मराठी पार्श्वगायिका आशा भोसले यांच्या कन्या होत्या.

वर्षा भोसले
जन्म वर्षा
इ.स. १९५६
मृत्यू ८ ऑक्टोबर, इ.स. २०१२
मृत्यूचे कारण आत्महत्या
राष्ट्रीयत्व भारतीय
टोपणनावे अण्णा
नागरिकत्व भारतीय
पेशा पत्रकार, गायिका
धर्म हिंदू
आई आशा भोसले

कारकीर्द संपादन

वर्षा भोसले यांनी काही हिंदी, तसेच मराठी चित्रपटांतून पार्श्वगायन केले होते. रेडिफ या भारतीय वेबपोर्टलावर इ.स. १९९७-२००३ या काळात त्या लेखन करत. तसेच त्यांनी टाइम्स ऑफ इंडिया या इंग्लिश वृत्तपत्रातून काही काळ स्तंभ लिहिले [१].

मृत्यू संपादन

८ ऑक्टोबर, इ.स. २०१२ रोजी वर्षा भोसले यांनी मुंबईतील आपल्या "प्रभुकुंज" या निवासस्थानी आत्महत्या केली. आपल्या परवानाप्राप्त रिव्हॉल्वरातून त्यांनी स्वतःवर गोळ्या झाडून घेतल्याचे निष्पन्न झाले [१].

संदर्भ व नोंदी संपादन

  1. ^ a b "आशाताईंच्या मुलीची गोळी झाडून आत्महत्या". ८ ऑक्टोबर, इ.स. २०१२ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)