रसायनशास्त्रानुसार एकसंध रासायनिक संघटन व वैशिष्ट्यपूर्ण गुणधर्म असलेले पदार्थाचे रूप म्हणजे रासायनिक पदार्थ (इंग्लिश: chemical substance, केमिकल सबस्टन्स) होय. रासायनिक क्रिया झाल्यामुळे मूळ घटक पदार्थांपेक्षा रासायनिक पदार्थांचे गुणधर्म निराळे असतात. भौतिक क्रिया वापरून रासायनिक पदार्थांचे त्यांच्या मूळ घटक पदार्थांत पृथक्करण करता येत नाही. पृथक्करण करण्यासाठी त्यांच्यामधील रासायनिक बंध तोडावे लागतात. रासायनिक पदार्थ घन, द्रव वा वायुरूपात असू शकतात.

पाणीवाफ ही त्याच रासायनिक पदार्थाची दोन वेगवेगळी रुपे आहेत.

रासायनिक पदार्थ यांचे औद्योगिक दृष्ट्या फार महत्त्व आहे. औषधी, रंग, अन्न, अत्तर, इत्यादी गोष्टी बनविण्यासाठी रासायनिक पदार्थांचा उपयोग होतो.