राजकुमार हिरानी ( २२ नोव्हेंबर १९६२) हा एक भारतीय चित्रपट दिग्दर्शक, निर्माता व लेखक आहे. सिंधी वंशाचा असलेल्या व नागपूरमध्ये जन्मलेल्या हिरानीने विधू विनोद चोप्राचा सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काही चित्रपटांमध्ये भाग घेतला. २००३ साली त्याने स्वतः प्रमुख दिग्दर्शक बनून मुन्ना भाई एम.बी.बी.एस. ह्या चित्रपटाचे दिग्दर्शन केले. हिरानीने त्यानंतर लगे रहो मुन्ना भाई३ इडियट्स ह्या चित्रपटांचे दिग्दर्शन केले असून हे तिन्ही चित्रपट तिकिट खिडकीवर प्रचंड यशस्वी झाले. हिरानीला आजवर फिल्मफेअर पुरस्कारासह अनेक सिने-पुरस्कार मिळाले आहेत.

राजकुमार हिरानी
जन्म २२ नोव्हेंबर, १९६२ (1962-11-22) (वय: ६१)
नागपूर
राष्ट्रीयत्व भारत
कार्यक्षेत्र दिग्दर्शक, निर्माता, कथाकार
कारकीर्दीचा काळ १९९३-चालू

चित्रपट यादी संपादन

दिग्दर्शक संपादन

वर्ष चित्रपट पुरस्कार
२००३ मुन्ना भाई एम.बी.बी.एस. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, सर्वोत्कृष्ट सर्वांगीण मनोरंजक चित्रपट
फिल्मफेअर सर्वोत्तम चित्रपट समीक्षक पुरस्कार
२००७ लगे रहो मुन्ना भाई राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, सर्वोत्कृष्ट सर्वांगीण मनोरंजक चित्रपट
फिल्मफेअर सर्वोत्तम चित्रपट समीक्षक पुरस्कार
२००९ ३ इडियट्स राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, सर्वोत्कृष्ट सर्वांगीण मनोरंजक चित्रपट
फिल्मफेअर सर्वोत्तम दिग्दर्शक पुरस्कार
२०१४ पी.के.

बाह्य दुवे संपादन