रंग दे बसंती

२००६ मधील हिंदी चित्रपट
(रंग दे बसंती (चित्रपट) या पानावरून पुनर्निर्देशित)

रंग दे बसंती हा २००६ साली प्रदर्शित झालेला भारतीय हिंदी चित्रपट आहे. राकेश ओमप्रकाश मेहराने लिहिलेल्या व दिग्दर्शन केलेल्या ह्या चित्रपटामध्ये आमिर खान, सिद्धार्थ नारायण, शर्मन जोशी, आर. माधवन, सोहा अली खान, कुणाल कपूर, अतुल कुलकर्णी तसेच ब्रिटिश अभिनेत्री ॲलिस पॅटन ह्यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

रंग दे बसंती
दिग्दर्शन राकेश ओमप्रकाश मेहरा
निर्मिती युटीव्ही मोशन पिक्चर्स
कथा कमलेश पांडे
पटकथा राकेश मेहरा, रेंजील डिसुझा
प्रमुख कलाकार आमिर खान
सिद्धार्थ नारायण
शर्मन जोशी
आर. माधवन
सोहा अली खान
कुणाल कपूर
ॲलिस पॅटन
अतुल कुलकर्णी
वहिदा रेहमान
अनुपम खेर
कला समीर चंदा, चेतन पाठक
गीते प्रसुन जोशी
संगीत ए.आर.रहमान
पार्श्वगायन चित्रा, मोहम्मद अस्लम, लता मंगेशकर
वेशभूषा लवलीन भैंस
देश भारत
भाषा हिंदी
प्रदर्शित २६ जानेवारी २००६
अवधी १५७ मिनीटे



कथानक संपादन

भारतीय स्वातंत्र्यलढ्यामध्ये सिंहाचा वाटा उचलणारे चंद्रशेखर आझाद, भगत सिंग, शिवराम हरी राजगुरू, अशफाक उल्ला खानराम प्रसाद बिस्मिल ह्या थोर स्वातंत्र्यसेनान्यांवर एक चित्रपट काढण्याचे स्वप्न घेऊन एक ब्रिटिश तरुणी नवी दिल्लीमध्ये येते. तेथे तिची गाठ कॉलेजात शिक्षण घेणाऱ्या व वैचारिक दृष्ट्या भरकटलेल्या काही तरुणांशी पडते.

पुरस्कार संपादन

फिल्मफेअर पुरस्कार संपादन

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार संपादन

बाह्य दुवे संपादन

इंटरनेट मुव्ही डेटाबेस वरील रंग दे बसंती चे पान (इंग्लिश मजकूर)