मोहसीना किडवई

भारतीय राजकारणी

मोहसीना किडवई ( जानेवारी १, इ.स. १९३२- हयात) या काँग्रेस पक्षाच्या नेत्या आहेत. त्या इ.स. १९७७च्या लोकसभा निवडणुकांमध्ये उत्तर प्रदेश राज्यातील आझमगढ लोकसभा मतदारसंघातून तर इ.स. १९८० आणि इ.स. १९८४च्या लोकसभा निवडणुकांमध्ये उत्तर प्रदेश राज्यातील मेरठ लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेल्या. तसेच इ.स. २००४ पासून त्या राज्यसभेच्या सदस्या आहेत.