माउंटस्टुअर्ट एल्फिन्स्टन

(माऊंटस्टुअर्ट एल्फिन्स्टन या पानावरून पुनर्निर्देशित)

माऊंटस्टुअर्ट एल्फिन्स्टन हे ब्रिटिश भारतातील मुत्सद्दी, गव्हर्नर व इतिहासकार होते. ते पेशव्यांच्या पुणे येथील दरबारातील ब्रिटिश रेसिडेंट होते व नंतर ते ब्रिटिश भारतातील मुंबई इलाख्याचे गव्हर्नर झाले. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी मुंबईमध्ये भारतीय लोकांसाठी विविध शिक्षण संस्था स्थापन केल्या. तसेच त्यांनी भारतअफगाणिस्तान येथील आपल्या अनुभवांवर पुस्तके लिहिली.

माऊंटस्टुअर्ट एल्फिन्स्टन
गव्हर्नर
अधिकारकाळ १ नोव्हेंबर इ.स. १८१९ ते १ नोव्हेंबर इ.स. १८२७
पूर्ण नाव माऊंटस्टुअर्ट एल्फिन्स्टन
जन्म ६ ऑक्टोबर, इ.स. १७७९
डुंबार्टनशायर, स्कॉटलंड
मृत्यू २० नोव्हेंबर, इ.स. १८५९
सरे, इंग्लंड

सुरुवातीचे जीवन संपादन

माऊंटस्टुअर्ट एल्फिन्स्टन यांचा जन्म स्कॉटलंडमधील डुंबार्टशायर येथे ६ ऑक्टोबर, इ.स. १७७९ रोजी झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण एडिनबरो येथील रॉयल हायस्कूलमध्ये झाले. शिक्षण पूर्ण झाल्यांनतर माऊंटस्टुअर्ट एल्फिन्स्टन ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनीमध्ये नोकरीला लागले. तिथे त्यांचे काका संचालक होते. इ.स. १७९६ साली ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनीने माऊंटस्टुअर्ट एल्फिन्स्टन यांना भारतात कोलकाता येथे दुय्यम पदावर नियुक्त केले. बनारसचे (आताचे वाराणसी) मॅजिस्ट्रेट डेव्हिस याचा सहाय्यक म्हणून त्यांनी काम केले. इ.स. १७९९ मध्ये कंपनी सरकारने अवधचा नवाब वाजीर अली खान याला पदच्युत केल्याने तिथे दंगल उसळली व त्यात ब्रिटिश लोकांची कत्तल करण्यास सुरू झाली यातून एल्फिन्स्टन वाचले.

इ.स. १८०१ मध्ये पुणे येथील दुसऱ्या बाजीराव पेशवेच्या दरबारातील ब्रिटीश रेसिडेंट बॅरी क्लोज याचा सहाय्यक म्हणून एल्फिन्स्टन यांची नेमणूक झाली.[१]

संदर्भ संपादन

  1. ^ टीम, लोकसत्ता. "जे आले ते रमले.. : माऊंटस्टुअर्ट एल्फिन्स्टन (१)". Archived from the original on 2019-12-23. 2019-12-23 रोजी पाहिले.