मल्लाप्पा धनशेट्टी

भारतीय कार्यकर्ता
(मल्लप्पा रेवणसिद्धप्पा धनशेट्टी या पानावरून पुनर्निर्देशित)

मल्लाप्पा रेवणसिद्धप्पा धनशेट्टी (१८९८ - २९ जुलै, १९३१) हे भारतीय स्वातंत्र्यसैनिक आणि क्रांतिकारक होते. ते महाराष्ट्रातील सोलापूरचे होते.[१]

मल्लाप्पा धनशेट्टी
जन्म मल्लाप्पा धनशेट्टी
१८९८
सोलापूर, महाराष्ट्र
मृत्यू १२ जानेवारी १९३१
मृत्यूचे कारण फाशी
राष्ट्रीयत्व भारतीय
ख्याती स्वातंत्रसैनिक
धर्म हिंदू

स्वातंत्र्य चळवळ दडपण्यासाठी ब्रिटिश सरकारने 1930 मध्ये सोलापूरमध्ये मार्शल लॉ अंतर्गत "दिसल्याबरोबर गोळी मारण्याचा" आदेश लागू केला होता. अब्दुल रसूल कुर्बान हुसेन आणि जगन्नाथ भगवान शिंदे, श्रीकिसन सारडा यांच्यासह मल्लापा यांनी लष्करी कायद्याचे उल्लंघन केले. स्वातंत्र्य चळवळ शमवण्यासाठी सरकारने चौघांना फाशीची शिक्षा सुनावली.[२]



८ मे १९३० रोजी जमनालाल बजाज आणि नरीमन यांच्या अटकेची बातमी आली. 'युवक संघाने' महामिरवणूक काढली. मिरवणुकीत धनशेट्टी यांचा देखील सहभाग होता. मिरवणुकीची व्यवस्था केल्यानंतर तुळजापूर वेशीकडे गडबडीमधून त्यांनी अत्यंत बिकट परिस्थितीत कलेक्टर नाईट आणि डीएसपी प्लेफेअर यांना वाचविले. ७-८ हजारांचा जमाव फक्त एक लाठी हाती घेऊन पांगवला. कलेक्टर नाईट आणि डीएसपी प्लेफेअर यांना हा प्रसंग मानहानीकारक वाटला. त्यांनी मार्शल कायदा लादून तेथे अत्याचार केले. ८ मे १९३० रोजीच्या गोळीबारामुळे बेभान झालेल्या जमावाने केलेल्या कृत्याबद्दल सर्वस्वी धनशेट्टी, जगन्नाथ नारायण शिंदे, सारडा आणि कुर्बान हुसेन याना जबाबदार धरून त्यांचे अमानुष हाल केले. पण त्यांनी त्याबद्दल तक्रार केली नाही. त्यांचे मनोधैर्य देखील खचले नाहीत. १२ जानेवारी १९३१ रोजी धनशेट्टी,शिंदे,सारडा आणि कुर्बान हुसेन यांना फाशी देण्यात आली.

संदर्भ संपादन

  1. ^ "History | District Solapur, Govt. of Maharashtra, India | India" (इंग्रजी भाषेत). 2022-01-15 रोजी पाहिले.
  2. ^ "4 दिवसांचं स्वातंत्र्य, 4 हुतात्म्यांना फाशी, सोलापूरच्या 'मार्शल लॉ'चा हा इतिहास माहिती आहे का?".