मतदान प्रणाली किंवा निवडणूक प्रणाली अथवा 'निवडणूक प्रक्रिया' यात मतदान वैध ठरविण्यासाठी एक नियमांचा संच असतो. त्यात मतदान कसे करावे, मत कसे टाकावे, याबाबत वर्णन केलेले असते. त्याने निवडणुकीचे निकाल तयार करण्यात मदत होते. सर्वसामान्यपणे कोणत्याही मतदान प्रणालीत बहुमत ग्राह्य धरण्यात येते. त्याव्यतिरिक्त प्रमाणशीर प्रतिनिधित्वअनेकता मतदान या ही काही प्रणाली आहेत. अधिमान्य मतदान ही पण एक पद्धत वापरण्यात येते. या सर्व निवडणूक पद्धतींच्या अभ्यासास सामाजिक निवड उपपत्ती किंवा मतदान उपपत्ती असेही संबोधण्यात येते. ही राज्यशास्त्राची, अर्थशास्त्राचीगणिताची उपशाखा आहे.

ऑस्ट्रेलियात मतदानासाठी असलेले एक मतदानकेंद्र

जे कोणीही मतदान उपपत्तीशी अभ्यस्त नाहीत, त्यांना इतक्या पद्धती अस्तित्वात असतात हे बघुन आश्चर्य वाटते. त्यांचा साधारणत: असा समज असतो कि, बहुमत पद्धतीशिवाय इतर कोणतीच मतदान पद्धती अस्तित्वात नाही.असे बघण्यात आले आहे कि बहुमत प्रणाली वापरून मिळालेले निवडणूक निकाल हे खरेखुरे बहुमत म्हणुन नसतात. एखाद्या निवडणुकीत फक्त दोनच पर्याय असतील तर मग, कोणी निवडणूक जिंकली हे ठरवितांना बहुमताचा नियम योग्य आहे. तरीही, जेंव्हा मतदानासाठी दोन किंवा त्यापेक्षा अधिक पर्याय असतील तर, 'सर्वमान्यपणे आवडणारा असा एकमेव पर्याय' किंवा 'सर्वमान्यपणे नावडणारा एकमेव पर्याय' असू शकत नाही. सरळसोट निवडीमध्ये किंवा अनुक्रमित निवड या पद्धतीद्वारे मतदात्यास त्याच्या भावनांची तीव्रता चांगल्या प्रकारे प्रगट करता येत नाही. वेगवेगळ्या निवडणूक पद्धती वापरल्यास वेगवेगळे निकाल मिळू शकतात, विशेषतः तेथे, जेथे स्पष्ट बहुमत निवड पद्धती नाही.