भैदिक कलन, किंवा विकलन [१][२] (इंग्लिश: Differential calculus, डिफरन्शियल कॅल्क्युलस ; अर्थ: भेद -फरक, कलन -कलाचा अभ्यास, कलातल्या भेदांचे शास्त्र ;) ही राशींमधील बदलांचा अभ्यास करणारी कलनाची उपशाखा आहे. कलनाच्या अभिजात दोन उपशाखांमधील ही एक उपशाखा असून संकलन ही दुसरी प्रमुख उपशाखा आहे.

एका गणितीय फलाचा आलेख काळ्या रंगात व त्या फलाच्या एका बिंदूवर काढलेली स्पर्शरेषा तांबड्या रंगात दर्शवली आहे. फलावरील त्या विशिष्ट बिंदूपाशी असलेला फलाचा विकलज स्पर्शरेषेच्या उताराएवढा असतो.

एखाद्या गणिती फलाच्या विकलजाचा व त्याच्या उपयोजनांचा अभ्यास भैदिक कलनात प्रामुख्याने केला जातो. एखाद्या निर्वाचित मूल्यापाशी फलातील बदलाचा दर, म्हणजेच फलाचे त्या मूल्यापाशी आढळणारे विकलज होय. विकलज निश्चित करण्याच्या या गणिती क्रियेला विकलन असे म्हणतात. भौमितिक दृष्ट्या फलाच्या आलेखावरील एखाद्या बिंदूपाशी काढलेल्या स्पर्शरेषेच्या उताराएवढा सदर फलाचा त्या विशिष्ट बिंदूपाशी आढळणारा विकलज असतो.

हे सुद्धा पहा संपादन

संदर्भ संपादन

  1. ^ गणितशास्त्र परिभाषा कोश [[वर्ग:मृत बाह्य दुवे असणारे सर्व लेख]][[वर्ग:मृत बाह्य दुवे असणारे लेख ]][[[Wikipedia:Link rot|मृत दुवा]]]. URL–wikilink conflict (सहाय्य)
  2. ^ वैज्ञानिक पारिभाषिक संज्ञा.