भाषिक नावे:

  • मराठी- ब्राम्ही, कारिवणा,
  • हिंदी- ब्रम्हमाण्डुकी, ब्राम्हीभेद, ब्रम्हो, ब्रम्ही,
  • गुजराती- ब्राम्हो, खडब्राम्ही, ब्राम्ही,
  • इंग्रजी- इंडियन पेनीवर्ट
ब्राम्हीची पाने
  • संस्कृत नावः मण्डुकपर्णी, माण्डुकी
  • लॅटिन नावः Centella asiatica, Hydrocotyle asiatica
  • कूळः Apiaceae, Umbelliferae

लागवड संपादन

  • ब्राम्ही पसरत वाढते.
  • ज्या भागात ऊन असेल तिथे ब्राम्ही लावतात.
  • संपूर्ण वाफा थोडेच दिवसात हिरवा गार दिसतो.
  • ब्राम्हीच्या झाडाला भरपूर पाणी लागते.
  • ब्राम्हीची पाने किडनीच्या आकाराची, हृदयाकृती असतात.

उपयोग संपादन

  • याचा जत्रुवर (मानेच्या वरील रोग) फारच उपयोग होतो.
  • मेंदुला शांत ठेवायचे कार्य ब्राम्ही कडून फार चांगल्या तऱ्हेने होते.
  • ब्राम्ही मेंदुसाठी पुष्टीदायक आहे.डोक्यास लावावयाचे तेलात याचा वापर करतात.
  • केंसांच्या वाढीसाठी ब्राम्हीचा उपयोग होतो.पानांचा रस तेलात घालून लावल्यास** केसांना चमक येते, केस वाढतात.
  • स्मरणशक्ती सुधारण्यासाठी रोज पाच-सहा पाने खावीत. अपस्मार, फिट्स येणे किंवा झोप येत नसेल तर ब्राम्हीची पाने किंवा रस घ्यावा.