बोल-आउट हा मर्यादित षटकांच्या क्रिकेट सामना बरोबरीत सुटला तर दोन प्रतिस्पर्ध्यांमधील विजेता ठरविण्यासाठी उपयोगात आणला जाणारा उपाय आहे. या प्रत्येक संघातील गोलंदाज सहा चेंडू यष्टिंवर टाकतात. ज्या संघाचे गोलंदाज अधिकवेळा यष्टिभेद करतील तो संघ विजयी ठरतो. जर सहा चेंडूंमध्ये दोन्ही संघातील गोलंदाजांनी समान वेळा यष्टिभेद केला तर एकआड एक असे गोलंदाज चेंडू टाकतात. जो संघ दोन यष्टिभेदांची चढत आधी मिळवेल तो संघ विजयी ठरतो.