बाळकृष्ण शिवराम मुंजे

बाळकृष्ण शिवराम मुंजे (डिसेंबर १२, इ.स. १८७२ - मार्च ४, इ.स. १९४८) भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एक पुढारी व काँग्रेसमधील लोकमान्य टिळकांच्या जहाल विचारसरणीचे समर्थक होते. पेशाने डॉक्टर असलेल्या मुंज्यांनी उत्तरायुष्यात हिंदू पुनरुत्थानाकरता हिंदू महासभेच्या माध्यमातून प्रयत्न केले. त्यांनी नाशकातील 'भोंसला मिलिटरी स्कूल' ही सैनिकी शाळेच्या स्थापण्याकरता पुढाकार घेतला; तसेच देहरादून येथील 'इंडियन मिलिटरी अकॅडमी' या सैनिकी प्रशिक्षणसंस्थेच्या स्थापनेतही पुढाकार घेतला.

बाळकृष्ण शिवराम मुंजे
जन्म: डिसेंबर १२, इ.स. १८७२
बिलासपूर, छत्तीसगड, भारत
मृत्यू: मार्च ४, इ.स. १९४८
नाशिक, महाराष्ट्र, भारत
चळवळ: भारतीय स्वातंत्र्यलढा
हिंदू पुनरुत्थान
धर्म: हिंदू
प्रभाव: बाळ गंगाधर टिळक
प्रभावित: केशव बळीराम हेडगेवार