बागेरहाटचे मशिदी शहर


बागेरहाट मशिदी शहर बांगलादेशच्या बागेरहाट जिल्ह्यात वसलेले जागतिक वारसा स्थान आहे. १५व्या शतकाच्या दरम्यान बंगाल सल्तनतच्या काळात येथे अनेक मशिदी बांधल्या गेल्या असून त्यापैकी साठ घुमट मशिद सर्वात मोठी आहे. इतर मशिदींमध्ये नऊ घुमट मशिद, चूना खोला मशिद, रोनविजयपुर मशिद, बीबी बेगनी मशिद आणी सिंगैर मशिद यांचा समावेश आहे. उलूग खान जहां उर्फ ​​खान जहां अलीच्या कारकिर्दीत या मशिदी बांधल्या गेल्या. बंगालच्या सुलतान महमूद शहा यांनी सुंदरबनमध्ये शासक म्हणून नेमलेला तो एक तुर्क सैन्य अधिकारी होता.[१]

बागेरहाटचे मशिदी शहर
वरून घड्याळाच्या दिशेने: साठ घुमट मशिद, नऊ घुमट मशिद, चूना खोला मशिद, रोनविजयपुर मशिद, बीबी बेगनी मशिद आणी सिंगैर मशिद
स्थान बांग्लादेश

भूगोल संपादन

दक्षिण बंगालमधील गंगा त्रिभूज प्रदेशाच्या विशाल तोंडाजवळ खुलनाच्या दक्षिणेस बागेरहाटचे हे मशिदी शहर आहे. हे बंगालच्या उपसागराच्या किनाऱ्यापासून ६० किलोमीटर (३७ मैल) अंतरावर आहे. हे शहर ५० चौरस किलोमीटर (१९ चौरस मील) क्षेत्रामध्ये पसरलेले आहे. हे भैरब नदीच्या मोरीबंड शाखे पासुन ६ किलोमीटर (३.७ मैल) (पूर्व-पश्चिम दिशा) आणि सुमारे २५ किलोमीटर (१६ मैल) पसरले आहे. हे सुंदरबन जंगलांचा एक भाग होता. सल्तनत युगानुसार, हे १५व्या शतकात बांधले गेले होते आणि १७व्या शतकात खलीफाबाद म्हणून ओळखले जात असे. जंगलातील वस्तीचे स्वरूप आणि वाघांचा अधिवास असल्याने, शहरास रहिवासी बनवण्यासाठी शहर अनन्य पायाभूत सुविधांनी विकसित केले गेले होते. आज सर्व स्मारके पाम वृक्षांनी वेढलेल्या शेतीच्या वातावरणात बसविली आहेत.[२]

इतिहास संपादन

सुलतान महमूद शहांच्या कारकिर्दीत इ.स. १४५० ते १४५९ दरम्यान ह्या मशिदी बांधल्या होत्या. महमूद शहाच्या कारकिर्दीत महत्त्वपूर्ण वास्तूंचा विकास झाला. दक्षिण बंगालमध्ये, बागेरहाट हे मशिदी शहर बंगाली इस्लामिक वास्तुविद्याची सरलीकृत "खान जहान" शैली दाखवते. रस्ते, पूल, पाण्याची टाकी आणि बरीच मशिदी आणि समाधी असलेल्या नियोजित शहर स्थापनेची जबाबदारी उलुग खान जहां यांच्यावर होती. उलुग खान जहां या शहरात राहत होता आणि तो एक सूफी परोपकारी नागरिक होता.

इ.स्. १८९५ मध्ये, ब्रिटीश भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण संस्थेने भारतामध्ये या क्षेत्राचा सर्वसमावेशक सर्वेक्षण केला आणि इ.स्. १९०३-०४ मध्ये साठ घुमट मशिदीच्या दुरुस्तीचे काम सुरू केले. इ.स्. १९०७-०८ मध्ये छताचा काही भाग आणि २४ घुमट्या पुनर्संचयित करण्यात आल्या. इ.स्. १९८२-८३ मध्ये, युनेस्कोने बागेरहाट प्रांतासाठी एक योजना बनविली आणि १९८५ मध्ये ते जागतिक वारसा बनले.

संग्रहालय संपादन

बंगलादेशच्या पुरातत्त्व संचालनालयाने युनेस्कोच्या सहकार्याने शैत घुमट मशिदीसमोर एक छोटेसे संग्रहालय स्थापन केले आहे, जिथे ऐतिहासिक स्थळ परिसरातून गोळा केलेल्या पुरातन वस्तू बागेरहाटच्या इतिहासावर ज्ञान प्रदान करतात. यात पुरातन वस्तूंच्या तीन प्रदर्शन गॅलरी आहेत ज्यात शिलालेख, भांडी, टेराकोटा फलक आणि शोभेच्या विटांचा समावेश आहे. बांगलादेशातील महत्त्वाच्या ऐतिहासिक इमारतींची चित्रेही या प्रदर्शनांचा भाग आहेत.[३][४]

संदर्भ संपादन

  1. ^ "Historic Mosque City of Bagerhat". UNESCO World Heritage Site. 12 नवम्बर 2019 रोजी पाहिले. |accessdate= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  2. ^ Morgan Brennan, Michelle Cerone (५ अप्रैल २०११). "In Pictures: 15 Lost Cities Of The World". Forbes. 12 नवम्बर 2019 रोजी पाहिले. |accessdate=, |date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  3. ^ "Bagerhat Museum". Lonely Planet.com. 15 May 2011 रोजी पाहिले.
  4. ^ "Bagerhat Museum, Bagerhat". Tour to Bangladesh.com. Archived from the original on 2018-09-17. 15 May 2011 रोजी पाहिले.