फ्लोरेन्सचे प्रजासत्ताक


फ्लोरेन्सचे प्रजासत्ताक (मराठी नामभेद: फ्लोरेन्साचे प्रजासत्ताक, फ्लोरेंटाइन प्रजासत्ताक ; इटालियन: Repubblica Fiorentina, रिपब्लिका फ्योरेंतिना ;) हे इटलीच्या टस्कनी प्रदेशातील फ्लोरेन्स शहरात राजधानी असलेले प्रजासत्ताक राज्य होते. हे प्रजासत्ताक इ.स. १११५मध्ये स्थापन झाले. त्यावर्षी टस्कनीची राज्यकर्ती मटिल्डाचा मृत्यू झाल्यावर फ्लोरेन्समधील जनतेने तेथील मार्ग्रेव्हची हुकुमत झुगारून देउन प्रजासत्ताक राज्यव्यवस्था सुरू केली.[१]

फ्लोरेन्सचे प्रजासत्ताक
Repubblica Fiorentina
(रेपुब्लिका फ्योरेंतिना)

इ.स. १११५इ.स. १५३२
ध्वज चिन्ह
राजधानी फ्लोरेन्स
शासनप्रकार प्रजासत्ताक
अधिकृत भाषा तोस्काना, लॅटिन
राष्ट्रीय चलन फ्लोरिन (इ.स. १२५२ - इ.स. १५३३)

दर दोन वर्षांनी फ्लोरेन्समधील व्यक्ती एका नाममात्र राजाची (गोनाफॅलोनियेरे) निवड करीत. हा राज मग एका समितीची (सिग्नोरिया) स्थापना करून त्यावर फ्लोरेन्सच्या लोकांमधून नागरिकांची नेमणूक करीत असे. ही समिती रोजचा राज्यकारभार पहात असे. इ.स. १४३४मध्ये कोसिमो दे मेदिचीने या समितीवर नियंत्रण मिळवले. यानंतर इ.स. १९४९पर्यंत या कुटुंबाच्या व्यक्तींनी या समितीद्वारे फ्लोरेन्सवर शासन केले. इ.स. १५१२मध्ये जियोव्हानी दे मेदिचीने (नंतरचा पोप लिओ दहावा) परत समितीवर ताबा मिळवला. लीग ऑफ कॉन्याकच्या युद्धा दरम्यान इ.स. १५२७मध्ये मेदिची कुटंबाची सत्ता फ्लोरेन्सवरून निसटली पण नंतर अकरा महिने शहराला वेढा घालून इ.स. १५३१मध्ये मेदिची कुटुंब परत सत्तेवर आले.

आता नाममात्र प्रजासत्ताक राहिलेल्या या राज्याच्या शासक अलेस्सांद्रो दे मेदिचीला पोप क्लेमेंट सातव्याने फ्लोरेन्सच्या प्रजासत्ताकचा ड्यूक असा खिताब देउन मेदिचींना तेथील वंशपारंपारिक राजेपद बहाल केले. इ.स. १५३२मध्ये ४२० वर्षांनंतर या प्रजासत्ताकाचे राज्यात रूपांतर झाले.[२]

संदर्भ संपादन

  1. ^ "फ्लोरेन्सचा इतिहास" (इंग्लिश भाषेत). 2009-05-26 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
  2. ^ स्ट्रेथर्न, पॉल. मेदिची: "गॉडफादर्स ऑफ द रेनेसॉं" (इंग्लिश भाषेत). p. ३२१. Unknown parameter |आयएसबीए= ignored (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)