फ्लायदुबई (अरबी: فلاي دبي‎‎) ही संयुक्त अरब अमिराती देशातील कमी दरात विमानसेवा पुरवणारी एक विमान वाहतूक कंपनी आहे. दुबई शहरामध्ये मुख्यालय व दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर वाहतूकतळ असलेली फ्लायदुबई दुबई सरकारच्या मालकीची आहे. २००८ साली स्थापन झालेल्या फ्लायदुबईद्वारे एकूण ९५ शहरांना विमान सेवा पुरवली जाते. फ्लायदुबईच्या ताफ्यात बोइंग ७३७ बनावटीची ५१ विमाने आहेत. दुबईतील एमिरेट्स ह्या प्रमुख कंपनीसोबत स्पर्धा न करता फ्लायदुबई नवनव्या मार्गांवर वाहतूक करण्याचा प्रयत्न करते.

फ्लायदुबई
आय.ए.टी.ए.
FZ
आय.सी.ए.ओ.
FDB
कॉलसाईन
SKY DUBAI
स्थापना १९ मार्च २००८
हब दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळ
अल मख्तूम आंतरराष्ट्रीय विमानतळ
विमान संख्या ५१
गंतव्यस्थाने ९५
ब्रीदवाक्य Get Going
पालक कंपनी दुबई सरकार
मुख्यालय दुबई, संयुक्त अरब अमिराती
संकेतस्थळ http://www.flydubai.com/
ढाक्यच्या शाहजलाल आंतरराष्ट्रीय विमानतळाहून निघालेले फ्लायदुबईचे बोईंग ७३७ विमान

जुलै २०१६ मध्ये भारतामधील अहमदाबाद, दिल्ली, हैदराबाद, कोची, लखनौ, मुंबईत्रिवेंद्रम ह्या शहरांमधून फ्लायदुबईची सेवा उपलब्ध आहे.

बाह्य दुवे संपादन