प्रशांत दामले

एक मराठी अभिनेते

प्रशांत पुरुषोत्तम दामले [१] हा मराठी अभिनेता आहे. त्याने मराठी नाटके, चित्रपट व दूरचित्रवाणी मालिकांमधून अभिनय व सूत्रसंचालन केले आहे.

प्रशांत दामले
जन्म प्रशांत पुरुषोत्तम दामले
०५ एप्रिल १९६१
मुंबई
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र मराठी चित्रपट, मराठी रंगभूमी, मराठी दूरचित्रवाणी, हिंदी दूरचित्रवाणी
कारकीर्दीचा काळ इ.स. १९८३ - चालू
भाषा मराठी, हिंदी
प्रमुख नाटके चार दिवस प्रेमाचे, जादू तेरी नजर, गेला माधव कुणीकडे
प्रमुख चित्रपट वाजवा रे वाजवा, सवत माझी लाडकी, पसंत आहे मुलगी, तू तिथं मी
प्रमुख टीव्ही कार्यक्रम काय पाहिलंस माझ्यात, घरकुल, बे दुणे तीन
पुरस्कार लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स महाराष्ट्र राज्य पुरस्कार नाट्यदर्पण अखिल भारतीय नाट्य परिषद

सूत्रसंचालन संपादन

  1. आम्ही सारे खवय्ये, झी मराठी
  2. आज काय स्पेशल, कलर्स मराठी
  3. सिंगिग स्टार, सोनी मराठी (परीक्षक)

जीवन संपादन

मराठी चित्रपटातील आणि रंगभूमीवरील प्रशांत दामले यांची कारकीर्द इ.स. १९८३मध्ये सुरू झाली. 'टूरटूर' या मराठी नाटकापासून श्री. दामले सर्वप्रथम विनोदी अभिनेता म्हणून प्रसिद्ध झाले. त्यानंतर 'मोरूची मावशी' या नाटकापासून त्यांची व्यावसायिक रंगभूमीकडे वाटचाल सुरू झाली. या प्रदीर्घ कारकिर्दीत त्यांनी ३७ उत्तमोत्तम चित्रपटांत आणि २६ नाटकांत अभिनय केला. यातील चार दिवस प्रेमाचे, एका लग्नाची गोष्ट, जादू तेरी नजर, गेला माधव कुणीकडे ही नाटके आणि वाजवा रे वाजवा, सवत माझी लाडकी, पसंत आहे मुलगी, तू तिथं मी हे चित्रपट विशेष प्रसिद्ध झाले. छोटा पडदा अर्थात दूरचित्रवाणीवरही त्यांनी २४ मराठी मालिकांत भाग घेतला. यातील काय पाहिलंस माझ्यात, घरकुल, बे दुणे तीन या मालिका आणि झी मराठी या वाहिनीवरील आम्ही सारे खवय्ये ही पाककृतींविषयीची मालिका फार लोकप्रिय झाली.

पुरस्कार (३२हून अधिक) संपादन

  • प्रशांत दामले यांना महाराष्ट्र राज्य पुरस्कार, नाट्यदर्पण पुरस्कार तसेच अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या विविध पुरस्कारांनी सन्मानित केले गेले आहे.
  • प्रशांत दामले यांना रोटरी क्लब ऑफ चिंचवडकडून कलागौरव पुरस्कार प्रदान झाला आहे. (२०-१-२०१६)

कार्य संपादन

लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स मध्ये प्रशांत दामले यांच्या नावावर तब्बल पाच रेकॉर्ड्‌स नोंदली गेली आहेत. त्यांमध्ये २४ डिसेंबर १९९५ रोजी एकाच दिवशी तीन वेगवेगळ्या नाटकांचे ४ प्रयोग, १९९५ साली ३६५ दिवसांत ४५२ प्रयोग, १९९६ साली ३६५ दिवसात ४६९ प्रयोग व १८ जानेवारी २००१ रोजी एकाच दिवशी केलेले तीन नाटकांचे पाच प्रयोग समाविष्ट आहेत.

प्रशांत दामले यांनी आतापर्यंत (६ नोव्हेंबर २०२२) एकूण १२,५०० नाट्यप्रयोग केले आहेत. ५ जानेवारी २०१३ रोजी प्रशांत दामले यांनी ’गेला माधव कुणीकडे’ या नाटकाचा केलेला प्रयोग अनुक्रमाने १७४६ वा होता.

प्रशांत दामले फॅन फाऊंडेशनच्या माध्यमातून अनेक समाजोपयोगी उपक्रम राबवीत असतात. त्यांच्या www.prashantdamle.com या संकेतस्थळाला १ जानेवारी २००५ पर्यंत तब्बल एक लाख लोकांनी भेट दिली आहे. प्रशांत दामले यांनी २७हून अधिक नायिकांबरोबर काम केले आहे.

नाटक संपादन

  • आम्ही दोघं राजा राणी
  • एका लग्नाची गोष्ट
  • ओळखना पाळख
  • कार्टी काळजात घुसली (सहअभिनेत्री तेजश्री प्रधान)
  • गेला माधव कुणीकडे (>१७४६ प्रयोग)
  • चल काही तरीच काय
  • चार दिवस प्रेमाचे (>१०२६ प्रयोग)
  • जादू तेरी नजर
  • टुरटूर
  • नकळत दिसले सारे
  • पाहुणा
  • प्रियतमा
  • प्रीतिसंगम
  • बहुरूपी
  • ब्रह्मचारी
  • बे दुणे पाच
  • माझिया भाऊजींना रीत कळेना
  • मोरूची मावशी
  • लग्नाची बेडी
  • लेकुरे उदंड झाली
  • व्यक्ती आणि वल्ली
  • शूsss कुठं बोलायचं नाही
  • श्री तशी सौ
  • संशयकल्लोळ (सहअभिनेता राहुल देशपांडे)
  • साखर खाल्लेला माणूस (सहअभिनेत्री शुभांगी गोखले)
  • सासू माझी ढासू
  • सुंदर मी होणार
  • एका लग्नाची पुढची गोष्ट
  • सारखं काहीतरी होतय

चित्रपट संपादन

  • अक्का
  • आई पाहिजे
  • आत्मविश्वास
  • आनंदाचे झाड
  • आम्ही दोघे राजा राणी
  • आयत्या घरात घरोबा
  • इना मिना डिका
  • एकदा पहावं करून
  • एक रात्र मंतरलेली
  • खुळ्यांचा बाजार
  • गोळा बेरीज
  • घरंदाज
  • चल गंमत करु
  • चार दिवस सासूचे
  • तू तिथं मी
  • धडकमार
  • पसंत आहे मुलगी
  • पुढचं पाऊल
  • फटफजिती
  • बंडलबाज
  • बाप रे बाप
  • मधुचंद्राची रात्र
  • माझा छकुला
  • मुंबई-पुणे-मुंबई (भाग १,२,३)
  • रेशीमगाठी
  • वाजवा रे वाजवा
  • विधिलिखित
  • वेलकम जिंदगी
  • सगळीकडे बोंबाबोंब
  • सगळे सारखेच
  • सवत माझी लाडकी

अभिनयाची शाळा संपादन

  • पुण्यात प्रशांत दामले यांची अभिनय शिकवण्याची एक प्रशिक्षण संस्था आहे.

संदर्भ संपादन

  1. ^ "प्रशांत दामले याच्या अधिकृत संकेतस्थळावरील प्रोफाइल". Archived from the original on 2014-11-29. 2011-07-16 रोजी पाहिले.

बाह्य दुवे संपादन