पोप ग्रेगोरी सोळावा (लॅटिन: Gregorius XVI), जातनाम बार्तोलोम्यो आल्बेर्तो काप्पेल्लारी (इटालियन: Bartolomeo Alberto Cappellari) (सप्टेंबर १८, इ.स. १७६५; बेलुनो, इटली - जून १, इ.स. १८४६; रोम, इटली), हा इ.स. १८३१ ते इ.स. १८४६ सालांदरम्यान कॅथॉलिक चर्चाचा पोप होता. युरोपातील व विशेषतः कॅथॉलिक युरोपातील आधुनिकतावादी चळवळी मूलतः डाव्या क्रांतिकारक चळवळी असल्याचा ग्रेगोरीचा दृष्टिकोन होता. त्यामुळे परंपरावादी व स्थितिप्रियवादी व्यवस्थेच्या रक्षणासाठी त्याने युरोपातील आधुनिकतावादी चळवळींना विरोध केला.

पोप ग्रेगोरी सोळावा
मागील:
पोप पायस आठवा
पोप
फेब्रुवारी २, इ.स. १८३१जून १, इ.स. १८४६
पुढील:
पोप पायस नववा