पुणेरी मिसळ

लोकप्रिय पुणेरी पदार्थ

पुणेरी मिसळ हा महाराष्ट्राच्या पुणे शहरात मिळणारा एक खास आणि लोकप्रिय खाद्यपदार्थ आहे. ही डिश मध्यान्हीच्या उपाहारासाठी खातात. मिसळ ही नुसतीच चमच्याने खाता येते, किंवा तिच्याबरोबर दही किंवा पाव खातात. अशावेळी मिसळ ही मिसळपावचा भाग म्हणून खाल्ली जाते. मिसळ बनवणे सोपे असले तरी काही खास दुकाने मिसळपावासाठी प्रसिद्ध आहेत. मिसळीला पौष्टिक मूल्य असल्याने ते एक अतिशय लोकप्रिय स्नॅक आहे. पुण्याखेरीज कोल्हापुरी मिसळही प्रसिद्ध आहे. [१] [२] पुणेरी मिसळ ही कोल्हापुरी मिसळीसारखी तिखट आणि मसालेदार नसते. पुण्यात वैयक्तिक आवडीनुसार मिसळ तयार करून दिली जाते.

मिसळ

पुण्यात मिसळीसाठी प्रसिद्ध ठिकाणे संपादन

  • अतिथी मिसळ हाऊस
  • काटा कीर
  • खासबाग मिसळ
  • निसर्ग मिसळ हाऊस
  • बापट उपहार गृह
  • बेडेकर मिसळ [३]
  • मस्ती मिसळ
  • मिसळ कट्टा
  • वाडेश्वर भुवन
  • श्री उपहार गृह
  • श्रीकृष्ण भुवन
  • सर मिसळ

संदर्भ संपादन

  1. ^ Roday, S. (1999). Hygiene and Sanitation in Food Industry. Tata McGraw-Hill. p. 110. ISBN 0-07-463178-0. 2009-02-09 रोजी पाहिले.
  2. ^ "Puneri Misal". Archived from the original on 2019-09-02. 2019-09-13 रोजी पाहिले.
  3. ^ "Bedekar Misal". Archived from the original on 2016-02-19. 2019-09-13 रोजी पाहिले.