पीठ (इंग्रजी: Ara; लॅटिन: "The Altar") हा वृश्चिक आणि दक्षिण त्रिकोण यांच्यामधला दक्षिण खगोलातील तारकासमूह आहे. पीठ (ग्रीकः Βωμός) हे दुसऱ्या शतकातील खगोलशास्त्रज्ञ टॉलेमी यांच्या ४८ तारकासमूहांच्या यादीतील एक तारकासमूह होते.

पीठ
तारकासमूह
पीठ मधील ताऱ्यांची नावे
लघुरुप Ara[१]
प्रतीक वेदी[१]
विषुवांश १६h ३४m १६.९४९७s
–१८h १०m ४१.३४०७s[२]
क्रांती −४५.४८५९७३४°–
−६७.६९०५८२३°[२]
क्षेत्रफळ २३७ चौ. अंश. (६३वा)
मुख्य तारे[१]
बायर/फ्लॅमस्टीड
तारे
१७
ग्रह असणारे तारे
३.००m पेक्षा तेजस्वी तारे
१०.०० pc (३२.६२ ly) च्या आतील तारे
सर्वात तेजस्वी तारा β Ara (२.८४m)
सर्वात जवळील तारा ग्लीस ६७४
(१४.८ ly, ४.५४ pc)
मेसिए वस्तू
उल्का वर्षाव नाही
शेजारील
तारकासमूह
+२५° आणि −९०° या अक्षांशामध्ये दिसतो.
जुलै महिन्यात रात्री ९:०० वाजता सर्वोत्तम दिसतो.

गुणधर्म संपादन

खगोलाचा २३७.१ चौ.अंश भाग (०.५७५%) व्यापणारे पीठ आकारमानाने ८८ आधुनिक तारकासमूहांमध्ये ६३व्या क्रमांकावर आहे.[३] याच्या उत्तरेला वृश्चिक, पश्चिमेला अंकनी आणि दक्षिण त्रिकोण, दक्षिणेला कपोत आणि उत्तरेला मयूर आणि दुर्बीण तारकासमूह आहेत. विषुववृत्तीय निर्देशांक प्रणालीमध्ये पीठची सीमा विषुवांश १६ता ३६.१मि ते १८ता १०.४मि आणि क्रांती −४५.४९° ते −६७.६९° मध्ये आहे.[२]

वैशिष्ट्ये संपादन

 
नुसत्या उघड्या डोळ्यांनी दिसणारे पीठ तारकासमूह

तारे संपादन

पीठमध्ये ६.५ आभासी दृश्यप्रतीपेक्षा तेजस्वी ७१ तारे आहेत.[३]

बीटा अरी हा या तारकासमूहातील सर्वात तेजस्वी तारा आहे.[४] हा नारंगी रंगाचा महाराक्षसी तारा असून त्याची दृश्यप्रत २.८ आहे आणि पृथ्वीपासूनचे अंतर ६५० प्रकाश-वर्षे आहे.[५] 

अल्फा अरी हा निळा-पांढरा मुख्य अनुक्रम तारा आहे. पृथ्वीपासून २७० प्रकाशवर्षे अंतरावरील या ताऱ्याची दृश्यप्रत २.८ आहे.[५] या ताऱ्याचे वस्तुमान सूर्याच्या ९.६ पट आहे[६] आणि सरासरी त्रिज्या ४.५ पट आहे.[७] तसेच तो सूर्याच्या ५८०० पट तेजस्वी आहे[६] आणि त्याच्या पृष्ठभागाचे तापमान १८,०४४ केल्व्हिन आहे.[७] बीई तारा, अल्फा अरी भोवती विषुववृत्ताच्या प्रतलामध्ये केप्लरीय कक्षेमध्ये घन चकतीमध्ये काही पदार्थ परिभ्रमण करत आहेत. हा तारा ध्रुवीय वादळामधून वस्तुमान गमावत आहे ज्याचा अंतिम वेग १००० किमी/से आहे.[६][८]

३.१३ दृश्यप्रतीचा झीटा अरी पृथ्वीपासून ४९० प्रकाश-वर्षे अंतरावरील नारंगी राक्षसी तारा आहे.[५]

बीटा अरी जवळ गॅमा अरी तारा आहे. हा निळा महाराक्षसी तारा आहे. हा पृथ्वीपासून १११० प्रकाश-वर्षे दूर आहे आणि त्याची दृश्यप्रत ३.३ आहे.[५]

डेल्टा अरी पृथ्वीपासून १९८ प्रकाशवर्षे अंतरावरील ३.६ दृश्यप्रतीचा निळा-पांढरा तारा आहे.[५]

या तारकासमूहातील सात ताऱ्यांभोवती परग्रह आढळले आहेत. म्यू अरी हा तारा खगोलशास्त्रज्ञांसाठी महत्त्वाचा आहे, कारण या सूर्यासारख्या ताऱ्याभोवती चार परग्रह परिभ्रमण करताना आढळले आहेत. त्यातील तीन गुरू ग्रहासारखे वायू-राक्षस आहेत आणि चौथा ग्रह पृथ्वी किंवा मंगळासारखा खडकाळ असण्याची शक्यता आहे. एचडी १५२०८९ या सूर्यासारख्या ताऱ्याभोवती एक परग्रह आहे.

दूर अंतराळातील वस्तू संपादन

पीठच्या वायव्य टोकावरून आकाशगंगेचे प्रतल जाते. त्यामुळे त्यामध्ये अनेक खुले तारकागुच्छ (एदा. एनजीसी ६२००) आणि तेजोमेघ आहेत. सर्वात तेजस्वी गोलाकार तारकागुच्छांपैकी एक सहाव्या दृश्यप्रतीचे एनजीसी ६३९७, पृथ्वीपासून फक्त ६,५०० प्रकाश-वर्षे अंतरावर आहे, ज्यामुळे ते सूर्यमालेपासून सर्वात जवळील तारगुच्छांपैकी एक आहे.[20]

पीठमध्ये  वेस्टरलुंड १, हा महातारकागुच्छ आहे ज्यामध्ये वेस्टरलुंड १-२६ हा लाल महाराक्षसी तारा आहे जो ज्ञात असलेल्या सर्वात मोठ्या ताऱ्यांपैकी एक आहे.

खुले तारकागुच्छ संपादन

  • एनजीसी ६१९३ हा एक खुला तारकागुच्छ  आहे. याच्यामध्ये ३० तारे आहेत ज्यांची सरासरी दृश्यप्रत ५.० आहे. त्याचा आकार ०.२५ चौ.अंश म्हणजे पौर्णिमेच्या चंद्राच्या अर्धा आहे. तो पृथ्वीपासून ४२०० प्रकाश-वर्षे अंतरावर आहे. 
  • एनजीसी ६२००
  • एनजीसी ६२०४
  • एनजीसी ६२०८
  • एनजीसी ६२५०
  • एनजीसी ६२५३
  • आयसी ४६५१

गोलाकार तारकागुच्छ संपादन

  • एनजीसी ६३५२
  • एनजीसी ६३६२
  • एनजीसी ६३९७ हा ६.० दृश्यप्रतीचा गोलाकार तारकागुच्छ आहे. त्याचे पृथ्वीपासूनचे अंतर १०,५०० प्रकाश-वर्षे आहे.[1]

ग्रहीय तेजोमेघ संपादन

  • स्टिंगरे तेजोमेघ (एचईएन ३-१३५७) हा एक तरुण ग्रहीय तेजोमेघ पीठमध्ये आहे. त्याच्या निर्मितीचा पहिला प्रकाश १९८७ मध्ये पाहण्यात आला.
  • एनजीसी ६३२६ एक ग्रहीय तेजोमेघ आहे. त्याच्या केंद्रस्थानी द्वैती ताऱ्यांची प्रणाली असण्याची शक्यता वर्तवली जाते.

संदर्भ संपादन

  1. ^ a b c Ridpath & Tirion 2001, पाने. 82–83.
  2. ^ a b c "Ara, constellation boundary". The Constellations. International Astronomical Union. 14 February 2014 रोजी पाहिले. चुका उधृत करा: अवैध <ref> tag; नाव "boundary" वेगवेगळ्या मजकूराशी अनेकदा जोडलेले आहे
  3. ^ a b Ridpath, Ian.
  4. ^ Thompson, Mark (2013).
  5. ^ a b c d e van Leeuwen, F. (November 2007).
  6. ^ a b c Meilland, A.; et al.
  7. ^ a b Meilland, A.; Stee, Ph.; Chesneau, O.; Jones, C. (2009).
  8. ^ Chesneau, O.; Meilland, A.; Rivinius, T.; Stee, Ph.; Jankov, S.; Domiciano de Souza, A.; Graser, U.; Herbst, T.; Janot-Pacheco, E.; Koehler, R.; Leinert, C.; Morel, S.; Paresce, F.; Richichi, A.; Robbe-Dubois, S. (2005).