प्रयाग म्हणजे दोन नद्यांचा संगम.

उत्तराखंड राज्यामध्ये असलेल्या पुढील पाच संगमांना पंचप्रयाग म्हणतात.

  1. देवप्रयाग - अलकनंदा आणि भागीरथी या नद्यांचा संगम
  2. रुद्रप्रयाग - अलकनंदा आणि मंदाकिनी या नद्यांचा संगम
  3. नंदप्रयाग - अलकनंदा आणि नंदावती या नद्यांचा संगम
  4. कर्णप्रयाग - अलकनंदा आणि कर्णावती या नद्यांचा संगम
  5. विष्णूप्रयाग - अलकनंदा आणि विष्णू या नद्यांचा संगम

उत्तर प्रदेशातल्या अलाहाबाद येथे गंगा यमुना आणि गुप्त रूपात असलेली सरस्वती यांचा त्रिवेणी संगम होतो, म्हणून अलाहाबादलाच प्रयाग म्हणून ओळखले जाते. पंचप्रयागात या प्रगागचा समावेश होत नाही.

बाह्य दुवे संपादन

  • www.hisalu.com/258