निवडणूक युती ही निवडणुकीत जिंकण्यासाठी करण्यात आलेले राजकीय पक्षांचे अथवा उमेदवारांचे एक प्रकारचे संघटन असते. यातील घटक राजकीय पक्ष आपापली नीती ठरवितात. ते आपसातील मतभेद अथवा आदर्शवाद तात्पुरता बाजूस ठेवतात. प्रसंगी, निवडणुकीचा फायदा लक्षात घेऊन, बिलकुल विपरीत विचारसरणी असलेले राजकीय पक्षही सत्ता उपभोगण्यासाठी युती करू शकतात. एखादा उमेदवारही सत्ता प्राप्तीसाठी किंवा विरोधी उमेदवारास परास्त करण्यासाठी अशा प्रकारची युती करू शकतो. युती झालेले राजकीय पक्ष सहसा युतीतील दुसऱ्या राजकीय पक्षाचे विरोधात आपला उमेदवार उभा करीत नाहीत. याने मते विभागण्याची व उमेदवार पडण्याची शक्यता अधिक असते.

दोन प्रकार संपादन

अशा प्रकारच्या युतीचे दोन प्रकार आहेत. एक निवडणूक-पूर्व व दुसरा निवडणुकीनंतर. सहसा, अशी दोन्ही प्रकारे युती करण्यात येते. लोकांचे कमी पाठबळ असणाऱ्या राजकीय पक्षास ही युती फायद्याची ठरते. सत्ता मिळाल्यास, जनतेचे कमी पाठबळ असूनदेखील अशा राजकीय पक्षाचे उमेदवार राजकीय पटलावर दिसू शकतात.