नयना आपटे

मराठी चित्रपट अभिनेत्री

नयना आपटे या मराठी नाटके आणि चित्रपटांत काम करणाऱ्या एक सुप्रसिद्ध अभिनेत्री आहेत.

नयना आपटे
जन्म २२ फेब्रुवारी १९५०
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय
भाषा मराठी
प्रमुख टीव्ही कार्यक्रम वागले की दुनिया, चुकभुल द्यावी घ्यावी, सुखाच्या सरींनी हे मन बावरे
पुरस्कार पद्मश्री, जीवनगौरव
आई शांता आपटे

शिक्षण संपादन

  • बी.ए. (साहित्य); संगीत विशारद.

संगीत शिक्षण संपादन

नयना आपटे यांनी आई शांता आपटे, इंदिराबाई केळकर, यशवंतबुवा जोशी, यांच्याकडून शास्त्रीय संगीतीचे शिक्षण घेतले आहे. याशिवाय गोविंदराव पटवर्धन, अण्णा पेंढारकर, नारायण बोडस आणि अरविंद पिळगावकर यांच्याकडूनही नयना आपटे यांनी नाट्यसंगीताचे शिक्षण घेतले आहेत.

नृत्य शिक्षण संपादन

नयना आपटे रोहिणी भाटे यांच्याकडे पाच वर्षे कथ्थकचे शिक्षण घेत होत्या.

अभिनयाची कारकीर्द संपादन

वयाच्या चौथ्या वर्षापासून नयना आपटे मराठी, हिंदी आणि गुजराती चित्रपटांतून कामे करीत आहेत. वयाच्या ७ व्या वर्षी शांता आपटे यांच्या चंडीपूजा या चित्रपटात त्यांनी एक महत्त्वाची भूमिका केली होती. १९६५ सालापासून नयना आपटे यांची व्यावसायिक अभिनेत्री म्हणून कारकीर्द सुरू झाली.

नयना आपटे यांनी आजवर १००हून अधिक विनोदी, पौराणिक, ऐतिहासिक, सामाजिक, संगीत आणि काही गुजराती नाटकांतून भूमिका केल्या आहेत. त्यांचे २५ मराठी, ४ हिंदी आणि ६ गुजराती चित्रपट आहेत.

नयना आपटे यांनी १६ हिंदी-मराठी दूरचित्रवाणी मालिकांत कामे केली आहेत. ’शांती’, ’वक़्त की रफ़्तार’, 'एक चुटकी आसमान' आणि ’डोन्ट वरी हो जायेगा’ या त्यांच्या हिंदीतल्या गाजलेल्या मालिका आहेत. तसेच चूकभूल द्यावी घ्यावी, सुखाच्या सरींनी हे मन बावरे या मराठी मालिकाही गाजलेल्या आहेत.

अन्य माहिती संपादन

त्यांची अनेक रेडिओ मुलाखती आणि भाषणे झाली आहेत. त्या नवोदित कलावंतांना संगीत शिकण्यास मदत करतात. सामाजिक कार्यातही त्यांचा गरीब आणि होतकरू लोकांना मदतीचा हात असतो.

नाटके संपादन

  • अंमलदार
  • एकच प्याला
  • करायला गेलो एक
  • देव नाही देव्हाऱ्यात
  • दैवे लाभला चिंतामणी
  • नवरा माझ्या मुठीत
  • पुण्यप्रभाव
  • मानापमान
  • मूकनायक
  • संशयकल्लोळ
  • या घर आपलंच आहे
  • लग्नाची बेडी
  • वरचा मजला रिकामा
  • शारदा
  • श्री तशी सौ
  • सौजन्याची ऐशी तैशी
  • स्वयंवर
  • हनिमून एक्सप्रेस
  • हा स्वर्ग सात पावलांचा
  • टिळक आणि आगरकर
  • दिनूच्या सासूबाई राधाबाई
  • सुनेच्या राशीला सासू
  • फॅमिली नंबर १
  • वासूची सासू

चित्रपट संपादन

  • चुपके चुपके (हिंदी, १९७५)
  • जावईबापू झिंदाबाद
  • मिली (हिंदी, १९७५)

पुरस्कार संपादन

  • भारत सरकारचा 'पद्मश्री' पुरस्कार
  • महाराष्ट्र शासनाचा 'कै. अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी जीवनगौरव' पुरस्कार
  • मराठी नाट्य परिषदेचे चार पुरस्कार
  • कुमार कला केंद्राचे २ पुरस्कार
  • महाराष्ट्र कला केंद्राचे २ पुरस्कार
  • चित्रपटातील भूमिकेबद्दल महाराष्ट्र सरकारचा एक पुरस्कार
  • मुंबई मराठी संग्रहालयाचा एक पुरस्कार
  • मुंबई मराठी साहित्य संघाकडून ५ पुरस्कार
  • स्त्रियांच्या सामाजिक संस्थांकडून ६ पुरस्कार