नताशा झ्वेरेव्हा

बेलारुसची टेनिसपटू

नताशा झ्वेरेव्हा (बेलारूशियन: Наталля Маратаўна Зверава; १६ एप्रिल १९७१) ही एक निवृत्त बेलारूशियन टेनिसपटू आहे. प्रामुख्याने दुहेरी टेनिसवर लक्ष केंद्रित करणाऱ्या झ्वेरेव्हाने आपल्या १४ वर्षांच्या कारकिर्दीदरम्यान १८ महिला दुहेरी तर २ मिश्र दुहेरी अशी एकूण २० ग्रॅंड स्लॅम अजिंक्यपदे पटकावली. तिने महिला दुहेरीमध्ये एकूण ८० डब्ल्यू.टी.ए. स्पर्धा जिंकल्या. ह्यांपैकी बहुतेक स्पर्धांमध्ये तिची जोडीदार अमेरिकेची जिजी फर्नांडेझ राहिली होती. एकूण महिला दुहेरी विजेतेपदांमध्ये ह्या दोघींचा मार्टिना नवरातिलोवापाम श्रायव्हर ह्या जोडगोळीच्या खालोखाल दुसरा क्रमांक आहे.

नताशा झ्वेरेव्हा
देश Flag of the Soviet Union सोव्हियेत संघ (१९८८ - १९९१)
बेलारूस ध्वज बेलारूस (१९९२ - )
वास्तव्य मिन्स्क, बेलारूस
जन्म १६ एप्रिल, १९७१ (1971-04-16) (वय: ५२)
मिन्स्क, बेलारूशियन सोसाग, सोव्हिएत संघ
सुरुवात १९८८
निवृत्ती २००२
शैली उजव्या हाताने, दोन-हाती बॅकहॅंड
बक्षिस मिळकत $७७,९२,५०३
एकेरी
प्रदर्शन ४३४ - २५२
अजिंक्यपदे
क्रमवारीमधील
सर्वोच्च स्थान
क्र. ५
ग्रँड स्लॅम एकेरी
ऑस्ट्रेलियन ओपन उपांत्यपूर्व फेरी (१९९५)
फ्रेंच ओपन उपविजयी (१९८८)
विंबल्डन उपांत्य फेरी (१९९८)
यू.एस. ओपन उपांत्यपूर्व फेरी (१९९३)
दुहेरी
प्रदर्शन ७१४ - १७०
अजिंक्यपदे ८०
क्रमवारीमधील
सर्वोच्च स्थान
क्र. १
ग्रँड स्लॅम दुहेरी
ऑस्ट्रेलियन ओपन विजयी (१९९३, १९९४, १९९७)
फ्रेंच ओपन विजयी (१९८९, १९९२, १९९३, १९९४, १९९५, १९९७)
विंबल्डन विजयी (१९९१, १९९२, १९९३, १९९४, १९९७)
यू.एस. ओपन विजयी (१९९१, १९९२, १९९५, १९९६)
शेवटचा बदल: एप्रिल २०१५.


ऑलिंपिक पदक माहिती
एकत्रित संघएकत्रित संघ या देशासाठी खेळतांंना
महिला टेनिस
कांस्य १९९२ बार्सिलोना महिला दुहरी

बाह्य दुवे संपादन