धुके हे एक दृश्य ढगासमान असते, ज्यात पाण्याचे अथवा बर्फाचे सुक्ष्म बिंदू असतात.पृथ्वीच्या पृष्ठभागावर किंवा त्याजवळ हे हवेत लटकलेले असतात.त्यास एक निम्न पातळीवर असणारा एक प्रकारचा ढग असेही म्हणता येते. नजिकच्या पाण्याच्या स्रोतांचा, उंचसखलतेचा व वाऱ्याच्या वेगाचा यावर फार जास्त असर पडतो.

धुके
धुके

धुक्याद्वारे जहाज वाह्तूक, प्रवास, विमानोड्डाण व युद्धे यावरही बराच प्रभाव पडतो.दृश्यता कमी असल्यामुळे अनेक विमानोड्डाणे रद्द केल्या जातात तसेच महामार्गावरील वाहतूकीत यात अडथळा निर्माण होतो वाहने हळू चालवावी लागतात व प्रसंगी अपघातही घडतात.सहसा थंड वातावरण असतांना धुक्याचे प्रमाण वाढते.

हवेच्या व ड्यु-पॉइंट[मराठी शब्द सुचवा] या दरम्यानचे तापमानाचा फरक २.५ o सेल्सियस अथवा ४ o फॅरनहाइट पेक्षा कमी असल्यास धुक्याची निर्मिती होते.

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: