द्नीस्तर (रोमेनियन: Nistru, युक्रेनियन: Дністе́р, रशियन: Днестр) ही पूर्व युरोपामधील एक प्रमुख नदी आहे. ही नदी युक्रेनमध्ये उगम पावते व मोल्दोव्हा देशातून वाहून काळ्या समुद्राला मिळते. ह्या नदीने मोल्दोव्हाच्या पूर्वेकडील ट्रान्सनिस्ट्रिया हा वादग्रस्त भूभाग व स्वयंघोषित देश मोल्दोव्हापासून वेगळा केला आहे.

द्नीस्तर नदी
द्नीस्तर नदीकाठावर वसलेले मोल्दोव्हामधील एक शहर
द्नीस्तर नदीच्या मार्गाचा नकाशा
उगम कार्पाती पर्वतरांग, युक्रेन
मुख काळा समुद्र
पाणलोट क्षेत्रामधील देश युक्रेन ध्वज युक्रेन
मोल्दोव्हा ध्वज मोल्दोव्हा
लांबी १,३६२ किमी (८४६ मैल)
उगम स्थान उंची १,००० मी (३,३०० फूट)
सरासरी प्रवाह ३१० घन मी/से (११,००० घन फूट/से)
पाणलोट क्षेत्राचे क्षेत्रफळ ६८,६२७
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत