दामोदर ही भारताच्या झारखंडपश्चिम बंगाल राज्यांमधील एक प्रमुख नदी आहे. प्रामुख्याने छोटा नागपूर पठारामधून वाहणारी दामोदर ५९२ किमी लांबीची असून ती हुगळी नदीला मिळते. दामोदर नदीला बहुतेक दरवर्षी पूर येतो. पश्चिम बंगालच्या मैदानी भागात आलेल्या भीषण पूरांमुळे याला बंगालचे दुःख म्हणूनही ओळखले जाते.

दामोदर
पश्चिम बंगालच्या बर्धमान शहराजवळील दामोदरचे पात्र
दामोदर नदीच्या मार्गाचा नकाशा
पाणलोट क्षेत्रामधील देश झारखंड, पश्चिम बंगाल
लांबी ५९२ किमी (३६८ मैल)
ह्या नदीस मिळते हुगळी नदी