दागिने म्हणजे स्त्रियांचे सर्वात प्रिय आणि मौलिक अलंकार. अर्थात, पुरुषांचे आणि मुलांचेही काही खास दागिने असतात. दागिने हे सर्वसाधारणतः विशेष दुर्मीळ (आणि अर्थात किंमती) धातूंपासून केलेले असतात आणि त्यांत बरेचदा विविध सुंदर हिरे बसवलेले असतांत.

कानांतल्या वलयांवरील कारागिरी

घडण संपादन

सूचनेनुसार एखादा तसाच्या तसा दागिना तयार करायला खूप कौशल्य लागते. हे काम हाताने करावे लागते. टिकल्या पाडणे, तार तयार करणे, जोडकाम करणे, तासकाम करणे अशा वेगवेगळ्या टप्प्यांमधून धातू जातो आणि मग दागिना घडतो. काही दागिने साच्यातून दाब देऊन बनवले जातात. सोन्याच्या पत्र्यावर ठसा उमटवूनही दागिने घडवले जातात. त्यावर जोडकाम, तासकाम आणि चमक आणणे यासारख्या प्रक्रिया हाताने केल्या जातात. डाग दिल्यावर जो जाड भाग तयार होत जातो भाग म्हणजे बिरडे. बिरड्या म्हणजे अलंकराचे निर- निराळे पदर जेथें एकत्र करतात तें टोपण, जाड तुकडा. हे काहीवेळा गोल कडे स्वरूपात असू शकते. कधीकधी या कड्यावर एक धातूचा ठिपकाही असते. दागिने घडवताना सोन्याचा वापर अधिक होतो. तसेच बांगड्या, अंगठ्या हे प्रकार मुशीत धातू ओतूनही तयार केले जातात. धातूवर नक्षीकाम तयार करणे ही एक कला आहे. यासाठी पूर्वी पारंपरिकरित्या प्रशिक्षित कारागीर असत. परंतु नवीन तंत्रज्ञानुसार आता हे काम संगणकावरही केले जाते. त्यासाठी कॅड (CAD) कॉम्प्युटरएडेड डिझायनिंग या संगणक प्रणालीद्वारा दागिन्यांच्या नक्षीचे काम केले जाते. ही बनवलेली नक्षी कॉम्प्युटर एडेड मॅन्युफॅक्‍चरिंग मशिनमध्ये फीड करून त्यातून एक प्रतिकृती बनवली जाते. ही काहीवेळा मेणातही बनवली जाते. त्यात योग्य त्या सुधारणा करून मग दागिना घडवला जातो.

प्रकार संपादन

दागिन्यांमध्ये अनेक प्रकार आहेत.

लहान मुलांचे दागिने संपादन

  • कडे
  • कमर साखळी
  • कांडवळे (कांडोळे)
  • कुयरी
  • घुंगरू
  • सुंकले
  • चुटक्या
  • डूल
  • ताईत
  • तांबोळे
  • दसांगुळे
  • बिंदल्या
  • बेडी
  • मनगट्या
  • वाकडा ताईत
  • वाघनखे
  • वाळा (दागिना)
  • साखळी
  • हंसळी

प्रशिक्षण संपादन

  • इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ जेम्स अँड ज्वेलरी

या संस्थेत तीन वर्षांचा डिझायनिंगचा डिप्लोमा कोर्स उपलब्ध आहे.

चित्र दालन (दागिन्यांचे वैविध्यपूर्ण प्रकार) संपादन

बाह्य दुवे संपादन