दख्खन बंध ही मध्य भारतातील भूस्तर प्रणाली आहे. याला डेक्कन ट्रॅप संज्ञेने संबोधले जाते. ट्रॅप हा स्विडिश शब्दापासून आलेला शब्द असून स्विडिश भाषेत त्याचा अर्थ जिन्याच्या पायऱ्या असा होतो.[१]ज्वालामुखीय निक्षेपणाने तयार झालेला हा भूस्तर आणि त्याच्या बाजू तीव्र उताराच्या असून दूर अंतरावरून महाकाय पायऱ्यांसारख्या दिसतात म्हणून त्यास ट्रॅप असे संबोधले जाते.

माथेरानजवळील डेक्कन ट्रॅप

निर्मिती संपादन

 
पुण्याजवळील डेक्कन ट्रॅप

भारतीय द्वीपकल्पात क्रेटेशस कल्पाच्या शेवटच्या कालखंडापासून इओसीनच्या प्रारंभकाळापर्यंत ज्वालामुखीचा विस्फोट होऊन लाव्हारस पसरला. प्रवाही बेसाल्ट लाव्हा पूर्वीच्या अस्तित्वात असलेल्या १० लाख किमीच्या विस्तीर्ण प्रदेशावर पसरत गेला.यामुळे हजारो मीटर जाडीच्या लाव्हाचे निक्षेपण झाले. ही प्रक्रिया भूशास्त्रीयदृष्ट्या प्रदीर्घकाळापर्यंत चालू होती.

प्रदेश संपादन

डेक्कन ट्रॅपने गुजरात (कच्छकाठियावाडचा काही भाग), महाराष्ट्र, मध्य प्रदेश (माळव्याचे पठार), छत्तीसगड, झारखंड आणि वायव्य कर्नाटकाचा प्रदेश व्यापलेला आहे. याशिवाय विलगपणे आंध्र प्रदेशात राजमुंद्री, उत्तरप्रदेश आणि तामिळनाडूमध्येही डेक्कन ट्रॅप आढळतो.

विभागणी संपादन

ऊर्ध्व ट्रॅप संपादन

महाराष्ट्र आणि गुजरातमधील काठियावाड भागात हा ऊर्ध्व ट्रॅप आढळतो. या भागात ज्वालामुखी राखेचे थर आहेत. या प्रदेशाची सरासरी जाडी ४५० मीटर आहे.

मध्य ट्रॅप संपादन

मध्य भारत आणि माळव्याच्या पठारावर मध्य ट्रॅप पसरलेले आहे. त्याची जाडी १२०० मीटरपर्यंत आहे.

निम्न ट्रॅप संपादन

मध्य भारत आणि तामिळनाडूत निम्न ट्रॅप आढळतात. त्याची जाडी १५० मीटरपर्यंत आहे.

खडक आणि खनिजे संपादन

डेक्कन ट्रॅप प्रामुख्याने बेसाल्ट खडकांचा आहे. याशिवाय डोलोमाइट, र्हायोलाइट, गॅब्रो आणि इतर खडक आढळतात. या खडकात क्वार्टझ, अगेट, कॅलसाइट व बांधकामाचे दगड प्राप्त होतात.

संदर्भ आणि नोंदी संपादन

  1. ^ "ट्रॅप" (इंग्रजी भाषेत). डिक्शनरी.रेफरन्स.कॉम. १३ नोव्हेंबर २०१३ रोजी पाहिले.