विल्यम पिट, चॅटहॅमचा पहिला अर्ल (इंग्लिश: William Pitt, 1st Earl of Chatham; नोव्हेंबर १५, इ.स. १७०८ - मे ११, इ.स. १७७८) हा ब्रिटिश राजकारणी व युनायटेड किंग्डमचा पंतप्रधान होता.

विल्यम पिट(थोरला)

कार्यकाळ
३० जुलै १७६६ – १४ ऑक्टोबर १७६८
राजा तिसरा जॉर्ज
मागील चार्ल्स वॉटसन-वेंटवर्थ
पुढील ऑगस्टस फिट्झरॉय

जन्म १५ नोव्हेंबर १७०८ (1708-11-15)
लंडन
मृत्यू ११ मे, १७७८ (वय ६९)
केंट
सही थोरला पिटयांची सही

या विल्यम पिटने फ्रेंच व इंडियन युद्धादरम्यान परराष्ट्रसचिवपदावर असताना कीर्ती मिळवली.अमेरिकेतील पेनसिल्व्हेनिया राज्यातील पिट्सबर्ग शहराला याचे नाव आहे. याशिवाय न्यू हॅम्पशायरमधील पिट्सबर्गव्हर्जिनियातील पिट्‌सिल्व्हेनिया काउंटीलाही याचेच नाव आहे. चॅटहॅमचा पहिला अर्ल असल्याने ते नाव न्यू जर्सीतील चॅटहॅम गावाला व चॅटहॅम विद्यापीठाला देण्यात आले.

या विल्यम पिटच्या मुलाचे नावही विल्यम पिट होते व तोही युनायटेड किंग्डमचा पंतप्रधान होता, म्हणून वडिलांना थोरला पिट तर मुलास धाकटा पिट म्हणतात.

विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत