त्रायन बसेस्कू (रोमेनियन: Traian Băsescu; २९ नोव्हेंबर १९५८ - ) हा मध्य युरोपाच्या रोमेनिया देशामधील एक राजकारणी व माजी राष्ट्राध्यक्ष आहे. २००० ते २००४ दरम्यान बुखारेस्टच्या महापौरपदी असणारा बसेस्कू २००४ साली राष्ट्राध्यक्षपदावर निवडुन आला. २००७ व २०१२ मध्ये आपल्या सत्तेचा गैरवापर तसेच असंविधानिक कृत्ये केल्याबद्दल बसेस्कुला रोमेनियन संसदेने निलंबित केले होते परंतु दोन्ही वेळा रोमेनियन जनतेने हे निलंबन नाकारून बसेस्कुला पुन्हा राष्ट्राध्यक्षपदी आणण्याचा कौल दिला. त्याच्या आजवरच्या कारकिर्दीत तो एक वादग्रस्त व्यक्ति राहिला आहे.

त्रायन बसेस्कू

रोमेनियाचा राष्ट्राध्यक्ष
कार्यकाळ
२० डिसेंबर २००४ – २१ डिसेंबर २०१४
पंतप्रधान व्हिक्तोर पोंता
मागील इयोन इलेस्कु
पुढील क्लाउस योहानिस

कार्यकाळ
२६ जून २००० – २० डिसेंबर २००४

जन्म ४ नोव्हेंबर, १९५१ (1951-11-04) (वय: ७२)
मुर्फात्लार, रोमेनिया
राजकीय पक्ष अपक्ष (२००४ - )
सही त्रायन बसेस्कूयांची सही

२१ डिसेंबर २०१४ रोजी बसेस्कू राष्ट्राध्यक्ष्पदावरून पायउतार होईल.

बाह्य दुवे संपादन