तुपोलेव तू-१४४ (रशियन: Туполев Ту-144) हे सोव्हिएत संघाच्या तुपोलेव कंपनीने बनवलेले सुपरसॉनिक (ज्याचा कमाल वेग आवाजाच्या वेगापेक्षा जास्त आहे) जेट विमान होते. ह्या प्रकारचे ते जगातील पहिलेच व्यावसायिक विमान होते. आजवर केवळ दोन सुपरसॉनिक विमाने बनवली गेली ज्यामधील तू-१४४ हे एक होय (दुसरे: कॉंकोर्ड). तुपोलेव तू-१४४ बनावटीची केवळ १६ विमाने उत्पादित केली गेली व एकूण ५५ प्रवासी उड्डाणे पार पडली ज्यानंतर सुरक्षेच्या कारणावरून ह्या विमानाचा प्रवासी वाहतूकीसाठी वापर कायमचा बंद करण्यात आला. मिग-२१च्या धर्तीवर बनवण्यात आलेल्या ह्या विमानाचा साधारण वेग २,००० किमी प्रति तास (१,२०० मैल/तास) असून ते समुद्रसपाटीपासून १६,००० मीटर (५२,००० फूट) उंचीवर उडत असे.

तुपोलेव तू-१४४

मॉस्कोच्या झुकोव्स्की आंतरराष्ट्रीय विमानतळावर थांबलेले एरोफ्लोतचे तुपोलेव तू-१४४ विमान

प्रकार सुपरसॉनिक विमान
उत्पादक देश सोव्हिएत संघ
उत्पादक तुपोलेव
पहिले उड्डाण ३१ डिसेंबर १९६८
समावेश १ नोव्हेंबर १९७७ (एरोफ्लोत)
सद्यस्थिती मर्यादित सेवेत
मुख्य उपभोक्ता एरोफ्लोत
सोव्हिएत हवाई दल
नासा
उत्पादन काळ १९६३-१९८३
उत्पादित संख्या १६

१९६८ साली मॉस्कोजवळ पहिली यशस्वी उड्डाण चाचणी झाल्यानंतर १९७३ सालच्या पॅरिस हवाई सोहळ्यात तू-१४४ कोसळले ज्यामध्ये एकूण १४ लोकांचा मृत्यू झाला. ह्यामुळे तू-१४४चा प्रवासी वापर सुरू होण्यास विलंब झाला. १ नोव्हेंबर १९७७ रोजी ह्या विमानाचे पहिले प्रवासी उड्डाण मॉस्को ते अल्माटी दरम्यान पार पडले. परंतु केवळ ५५ सेवांनंतर तू-१४४ च्या वापरामध्ये अनेक संकटे येऊ लागली व १ जून १९७८ रोजी ह्या विमानाद्वारे अखेरची प्रवासी विमानसेवा दिली ज्यानंतर त्याचा वापर केवळ मालवाहतूकीसाठी व संशोधनासाठीच मर्यादित करण्यात आला. अमेरिकेच्या नासा संस्थेने तू-१४४ वर अनेक चाचण्या केल्या.

बाह्य दुवे संपादन

 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:

संदर्भ आणि नोंदी संपादन