डॉनल्ड मॅके, ११वा लॉर्ड रे

डॉनल्ड मॅके, ११वा लाॅर्ड रे (२२ डिसेंबर, १८३९:हेग, हाॅलंड - १ ऑगस्ट, १९२१) हे सन १८८५ ते १८९० या काळात ब्रिटिशकालीन मुंबई प्रांताचे गव्हर्नर होते. यानंतरच्या काळात ते ब्रिटिश सरकारमध्ये अंडर सेक्रेटरी ऑफ स्टेट फॉर इंडिया (भारतविषयक उपराज्यमंत्री) पदावर होते. हेग कन्व्हेन्शन या बहुराष्ट्रीय सभेत हे युनायटेड किंग्डमच्या तीन प्रतिनिधींपैकी एक होते.

भारतातील संस्था संपादन

पुण्यातील महात्मा फुले संग्रहालयाचे नाव लॉर्ड रे म्युझियम होते. हे संग्रहालय सुरुवातीला पुण्यातील भाजी मंडईच्या वरच्या मजल्यावर होते. नंतर ते घोले रोडवर हलविण्यात आले.

मुंबईतील हार्बर लाईन या लोकल रेल्वे मार्गावरील डाॅकयार्ड रोड आणि काॅटन ग्रीन या स्थानकांच्या मधल्या रे रोड रेल्वे स्थानकाला यांचे नाव दिले आहे.