डेव्हिड बेन-गुरियन (हिब्रू: דָּוִד בֶּן-גּוּרִיּוֹן; १६ ऑक्टोबर, १८८६ - १ डिसेंबर, १९७३) हा इस्रायल देशाचा संस्थापक व पहिला पंतप्रधान होता. बेन-गुरियन कट्टर ज्यू राष्ट्रीयवादी होता व त्याने १४ मे १९४८ रोजी पॅलेस्टाइन भूभागावर स्वतंत्र इस्रायल देशाची घोषणा केली.

डेव्हिड बेन-गुरियन

इस्रायलचा पंतप्रधान
कार्यकाळ
२ नोव्हेंबर १९५५ – २१ जून १९६३
मागील मोशे शॅरेड
पुढील लेव्हि एश्कॉल
कार्यकाळ
१७ मे १९४८ – ७ डिसेंबर १९५४
पुढील मोशे शॅरेड

जन्म १६ ऑक्टोबर १८८६ (1886-10-16)
पॉइन्स्क, रशियन साम्राज्य (आजचा माझोव्येत्स्का प्रांत, पोलंड)
मृत्यू १ डिसेंबर, १९७३ (वय ८७)
इस्रायल
धर्म ज्यू
सही डेव्हिड बेन-गुरियनयांची सही

विसाव्या शतकात कार्यरत असलेल्या जगातील १०० सर्वात महत्त्वाच्या व्यक्तींमध्ये त्याची गणना केली जाते. बेन-गुरियनच्या स्मरणार्थ तेल अवीवमधील बेन गुरियन विमानतळ तसेच इस्रायलमधील असंख्य महत्त्वाच्या इमारती व वास्तूंना त्याचे नाव दिले गेले आहे.

बाह्य दुवे संपादन